Thursday 27 September 2012

वाद शिवरायांच्या स्मारकाचा !


एका परदेशी व्यक्तीने शिवाजी म्हराज्यांचा भव्य स्मारक समुद्रात उभे करायचे ठरवले. त्यासाठी त्याने निधी उभा करायला सुरवात केली. सारी तयारी झाली त्याची प्रतिकृतीही बनवली गेली आणि अचानक त्याला विरोध होऊ लागला. हा विरोध इतर प्रदेशातून नाही तर ज्या प्रदेशात शिवाजी महाराज्याना देव मानले जाते. जिथे माझ्यासारखे शिव भक्त देवाच्या नावाअगोदर शिवरायांचे नाव घेतात त्याच माझ्या महाराष्ट्रातून शिवाजी महाराज्यांच्या स्मारकाला विरोध होत आहे. यात आता राजकीय पक्षांनीही उडी घेतली आहे कारण काय तर म्हणे हा पैसा फुकट जाणार.

मला अश्या लोकांना एक प्रश्न विचारायचा आहे तुम्ही म्हणता स्मारके उभी करून पुतळे बांधून त्या थोर व्यक्तींची कार्ये संपादन होत नाहीत. असे म्हणता मग असे काय कर करावे म्हणजे त्या व्यक्तींची कार्ये संपादन होतील? अहो भविष्यातील तुमच्या पिढीतील लोक शिवाजी महाराज यांना विसरतील आणि उत्तर प्रदेशात जाऊन मायावती च्या पुतळ्यांना हार घालतील तीतच पुतळ्याच्या बाजूला असणाऱ्या हत्तीच्या पुतळ्याला कलियुगातील नंदी समजून पुजतील. बोफार्स घोटाळ्यातील राजीव गांधीला महापुरुष समजतील. कारण इतिहास सांगायला शिवरायांचे गड तर नष्ठ होतच आहेत आता त्यांचा इतिहास एकाद्या शालेय पाठ्य पुस्तकातील कुठल्यातरी शेवटच्या पानावर चार ओळी लिहिलेला असेल.

मला वाटते शिवरायांचे पुतळे स्मारके प्रत्तेक चौकात प्रत्तेक सार्वजनिक ठिकाणी असावेत म्हणजे पुढच्या पिढ्या त्यांना पाहून आपली मान आदराने झुकवतील. आज महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणारे शिवाजी महाराज्यांचा सर्वात मोठा पुतळा गुजरात मध्ये नरेंद्र मोदी यांनी बसवला आहे. काळ पर्यंत शिवाजी महाराज्याना सुरतेचा लुटारू म्हणणारे गुजराती आता त्यांचे आदराने नाव घेवू लागले आहेत.

मला नक्की साल आठवत नाही त्या वेळी मी कांदिवलीत एका गुजराती customar  च्या घरी गेलो होतो. त्या वेळी तो 'राजा शिवछत्रपती' हि मालिका पाहत होता lcd tv  होती ज्यामध्ये तांत्रिक बिघाड झाला होता आणि त्यात अर्धा पिक्चर भुरकट दिसत होता. मी उत्सुकता म्हणून त्यांना याविषयी विचारले त्यावेळी तो माणूस म्हणाला "काही वर्षापूर्वी मीही इतर गुजराती माणसाप्रमाणे शिवाजी महाराजांना सुरात लुटणारा लुटारू समाजात होतो पण एकदा मी नरेंद्र मोदी यांच्या भाषणाला अहमदाबाद ला गेलो होतो त्यावेळी नरेंद्र मोदी नि म्हटले कि राजा असावा तर शिवाजी जैसा, पहले पहले मुझे बहुत गुस्सा आया. पण मला मराठी येत होते मी उत्सुकता म्हणून शिवाजी महाराज्यांवर पुस्तके वाचली. आणि मला शिवाजी महाराज्यांचे असे काही वेड लागले कि मी वेडाच्या भरात  जी पुस्तके मिळाली ती वाचली. आज रस्त्यात कुठेही शिवाजी महाराज्यांचा पुतळा आढळला तर माझी मान आदराने झुकते.

सांगायचे तात्पर्य एवढेच देशात महापुरुषांचे पुतळे नाही बनवायचे तर काय नालायक नेत्यांचे बनवायचे ?

1 comment:

  1. बाकी या साल्यांनी पुतळा बनवला किंवा नाही आम्हा मावळ्यांना काहीच फरक पडत नाही .
    कारण शिवरायांचे कार्य आणि कर्तुत्व इतके उच्च कोटीचे आहे कि त्यांच्या महत्तेला अशा कोण फडतूस राजकारण्यांच्या कृपाप्रसादरूपी पुतळ्याची गरज नाही .
    ( प्रशांत इथे जे व्हेरीफिकेशन द्यावे लागते कमेंट देताना ते बंद कर ..उगी त्रास होतो कमेंट देनारांना ....कसे ते माहित नसल्यास संपर्क साध .)

    ReplyDelete