Saturday 22 October 2011

शिवाजी महाराजांचे खरे गुरु कोण.....................?

खूप दिवसापासून मला एक प्रश्न सतावतो आहे शिवाजी महाराज्यांचे खरे गुरु कोण? संत रामदास कि संत तुकाराम महाराज कारण ब्राम्हण म्हणतात कि शिवाजी महाराज्यांचे गुरु संत रामदास होते तर मराठे म्हणतात संत तुकाराम हे शिवाजी महाराज्यांचे संत होते. खरे कुणाचे ?खूप दिवस यावर अभ्यास केला खूप पुरावे पडताळले आणि या निकशावर येवून पोचलो आहे पहा तुम्हाला पटते का ते.
शिवाजी महाराज यांचे गुरु ना संत रामदास होते ना संत तुकाराम होते.
हे दोन्ही शिवाजी महाराज्यांच्या जीवनात केवळ राजकीय संत होते मित्रानो मला जेवढे पूजनीय संत रामदास आहेत तेवढेच संत तुकाराम पण हे दोघेही शिवाजी महाराज्यांचे गुरु नक्की नव्हते मी हे कास्यावरून बोलतो आहे हे हि मी आपणास समजावतो पहिला आपण गुरु आणि राजकीय संत यामधला फरक समजून घेवू. गुरु तो असतो जो शिष्याला फक्त डाव पेचाचे शिक्षणच नाही देत तर अडचणीच्या वेळी मार्ग दर्शनही करतो संत रामदास तसेच संत तुकाराम यांनी शिवाजी महाराज्याना कधीही लढाईचे डाव-पेच तसेच अगदी संकटात कसे स्वराज्य वाचवावे हे सांगितल्याचा इतिहासात पुरावा नाही किव्हा तसे अजून तरी माझ्या वाचनात आले नाही आहे.माग हे संत राजकीय संत कसे काय तर शिवाजी महाराज हे उत्तम राजकारणी राजा होते. आणि त्याच्या जीवनात या दोन्ही संतांचे धार्मिक स्राद्धेसाठी महत्व होते म्हणून हे दोन्ही संत राजकीय संत आहेत .मग शिवाजी महाराज्यांचे गुरु कोण हा प्रश्न तुम्हाला पडला असेल नाही तर याचे उत्तर आहे शिवाजी महाराज्यांच्या जीवनात ३ लोक गुरु स्थानी आहेत
१) राजमाता जिजाऊ - हो शिवाजी महाराज्यांच्या माता जिजाऊ या शिवाजी महाराज्यांच्या पहिल्या गुरु आहेत. ज्या मातेने शिवाजी महाराज्याना महाभारत आणि रामायण सांगून आणि तोंडपाठ करून अधर्मा विरुद्ध धर्म शिकवून पहिला पाया घातला कारण याच मोघलांनी जिजाऊ साहेबांचे जाधव घराणे पूर्णपणे निर्बीज केले होते त्या मोघलांना धडा शिकवण्यासाठी जिजाऊ साहेबांनी शिवाजी महाराज्याना धर्माचे बाळकडू पाजून तयार केले आणि वेळो वेळी त्यांना मार्ग दर्शन हि केले.
२) आबा साहेब शहाजी राजे - शिवाजी महाराज्यांचे दुसरे गुरु होते शहाजी राजे ज्यांनी दोन वेळा स्वराज्य स्थापन करायचे प्रयत्न केले पण दोन्ही वेळा त्याच्या पदरात निरास्याच पडली मग त्यांनी आपण केलेल्या चुका परत होवू नये म्हणून शिवाजी राज्यांना भगवा ध्वज आणि राजमुद्र देवून योग्य मार्ग दर्शन केले
३)दादोजी कोंडदेव - हो तिसरे गुरु होते दादोजी कोंडदेव कोणी काही म्हणो दादोजी कोंडदेव यांबद्दल जरी वाद असले तरी शस्त्र शिक्षण आणि पुणे परत बनवण्यास शिवबांना त्यांनी दिलेले मार्ग दर्शन कोणीही नाकारू शकत नाही .
त्यामुळे मित्रानो मराठा ब्राम्हण वादात संत रामदास आणि संत तुकाराम यांना शिव्या देवून आपली जात किती महत्वपूर्ण आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करू नका कारण हे दोन्ही म्हण संत आपल्या जागी बरोबर होते आणि त्यातील दोघांचे शिवाजी महाराज्यांच्या जीवनात जास्थ संबंध आला किवा शिवाजी महाराज त्याचे आदेश मानून शत्रूवर चाल करत असे कुठेही लिहिलेले नाही.आणि कोणत्याही जातीवादी संगठनेच्या नादाला लागून हिंदू धर्मात फुट पाडू नका कारण शिवाजी महाराज असते तर त्यानाही हे आवडले नसते.

7 comments:

  1. Kharech , agadi barobar lihale ahe. Aniket Sonawane

    ReplyDelete
  2. खूप छान माहिती आहे. अतिशय मार्मिक शब्दांत माहिती पुरविण्यात आली आहे.

    नमस्कार ,
    '१०० पुस्तकांपेक्षा १ उच्च प्रतिचे माहिती देणारे पुस्तक नेहमीच चांगले' या तत्वांला अनुसरून आम्ही VISION UPSC MPSC PO ह्या संपूर्ण मराठीमोळ्या YouTube चॅनेलची निर्मिती केली आहे.
    गरजू व हुशार विद्यार्थी मित्रांना व मैत्रिणींना Private Classes च्या जाळ्यातून मुक्त करून Quality Free Education देण्याच्या उद्देश्याने तसेच त्यांच्या मूल्यवान वेळात अतिशय महत्वाची माहिती एकत्रितपणे देणे हेच आमचे ध्येय आहे.
    माझ्या चॅनेलच्या काही विडीओची लिंक खाली दिली आहे , एकदा आपण video पाहून स्वतः विडीओमधील माहिती आपणांस किती उपयुक्त ठरणारी आहे हे ठरवावे.
    Telegram Channel name : @visionump
    Youyube channel name : VISION UPSC MPSC PO

    प्राचीन भारताचा इतिहास - कालक्रम https://youtu.be/ozUiFABdydA

    मध्ययुगीन भारताचा इतिहास - कालक्रम : भाग १ https://youtu.be/a67cdfA3Svk

    मध्ययुगीन भारताचा इतिहास- कालक्रम : भाग २ https://youtu.be/wl9Vg5KhvIA

    आधुनिक भारताचा इतिहास- कालक्रम (इ.स.१६००-१८५७) https://youtu.be/h_0syxLPsbw

    आधुनिक भारताचा इतिहास - कालक्रम (इ.स.१८५७–१९४७) https://youtu.be/ee79-cm1_C0

    आधुनिक भारताचा इतिहास - कालक्रम (इ.स.१९४७-२०००) https://youtu.be/rbMQzjLJSIU

    तुमचा मूल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.

    ReplyDelete
  3. शिवजी महाराजचे आध्यात्मिक गुरु कोण होते

    ReplyDelete
    Replies
    1. संत तुकाराम महाराज व याकुब बाबा

      Delete
  4. कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरू नव्हते. ...कारण त्यांचा शहाजी महाराज यांच्या सोबत असण्याचा एतिहासिक कागदोपत्री पुरावा नाही आहे व बखर हे संषोधनाचे साधन असुच शकत नाही ....
    आम्हाला चुकिचा इतिहास शिकवण्यात आलेला आहे.

    ReplyDelete
  5. छ्त्रपती शिवाजी महाराज

    ReplyDelete
  6. Samadan garole

    ReplyDelete