Friday 7 September 2012

याला जीवन ऐसे नाव !



नेहमीच्या दिवसाप्रमाणे आज माझा दिवस सुरु झाला. सकाळी ऑफिस मध्ये रिपोर्ट देवून मी lcd  led  रिपेअर करायला कस्टमर च्या घरी निघालो. आज मला माझ्या आवडीचा एरिया मिळाला होता कांदिवली वेस्ट. नेहमीप्रमाणे सत्य नगर येथील चप्पल शिवणाऱ्या काकांकडे मी थांबलो. कारण बाजूलाच चहा वाला आहे. मला कांदिवली एरिया मिळाला कि मी तिथे हमखास तिथे चहा पिण्यासाठी थांबलो. मीच नाही त्या एरियात असणारे सारे samsung , LG  चे सारे engineer  थांबतात. त्याला कारण तिथे बनणारी चहा खूप मस्त असते.

मी दोन कटिंग ची ऑर्डर माझ्या बाईक वर बसूनच दिली एक माझ्यासाठी आणि दुसरी त्या चप्पल शिवणाऱ्या काकांसाठी. गरमा गरम चहा आला. मी चहाचा एक घोट घेतलाच असेल इतक्या एक शाळेत जाणारा मुलगा आपली थोडी फाटलेली शाळेची ब्याग त्या चप्पल शिवणाऱ्या काकांकडे घेवून आला. थोडा वेळ तो तिथेच घुटमळला. मी चहा चा दुसरा घोट घेत त्याला निरखून पाहत होतो.

साधारण १२ वर्षाचा तो मुलगा होता. पायात चप्पल नव्हते. अंगावर गणवेश होता पण खूप जुना आणि थोडासा फाटलेला होता. मराठी नव्हता हे मी त्याला पाहताच ओळखले. थोडी हिम्मत करून त्याने चप्पल शिवणाऱ्या काकांकडे ब्याग शिवून देण्याची विनंती केली ब्याग खूप ठिकाणी फाटली होती. काकांनी आपल्या व्यवसायाच्या हिशोबाने त्याला २० रुपये सांगितले. पण तो मुलगा म्हणाला माझ्याकडे फक्त ५ रुपयेच आहेत. काकांनी ब्याग शिवण्यास नकार दिला. तरीही तो मुलगा तिथेच घुटमळला.

मला माझे दिवस आठवले. लहानापासून आजी आजोबांकडे लहानाचा मोठा झालो. माझे आजी आजोबा कोणी श्रीमंत नव्हते. तेही शेती करायचे. हातावर कमावून पोटाला खायचे. मग मुलीच्या एक नव्हे तीन मुलांना सांभाळणे किती अवघड असेल हे मी सांगायला नकोच. मीही मित्रांचे जुने कपडे घालून शाळेत जात असे आणि शनिवार आणि रविवारी हॉटेल मध्ये जाऊन काम करत असे ९वि च्या वर्गात जी पर्यंत माझ्या पायात चप्पल नव्हती हे मला आज हि आठवते. त्या मुलाला पाहून मला माझे दिवस आठवले.

मी हळूच बाईक वरून खाली उतरलो किश्यातील २० रुपये काढून मी काकांकडे दिले म्हणालो " काका द्या त्याला ब्याग शिवून " kakana हि थोडी लाज वाटली असावी त्यांनी माझ्याकडून पैसे घेण्यास नकार दिला. पण मी जबरदस्तीने दिले म्हणालो " तुम्हीही हातावर कमावून पोटाला खाता , २० रुपये माझ्यासाठी मोठी गोष्ट नाही आहे पण तुमच्यासाठी खूप मोठे आहेत नाही म्हणू नका.

काकांनी त्या मुलाची ब्याग शिवून दिली. तसे तो मुलगा म्हणाला " thanku साहब आज अगर आप ब्याग सिलने के पैसे नहीं देते तो आज कचरा जमा करके मिलनेवाले सरे पैसे मुझे ब्याग सिलने के लिए देने पड़ते. और आज भी स्कूल नहीं जा पाता था क्योकि माँ कहती है अगर तू ५० रूपया कामके लायेगा तोही स्कूल जानेका नहीं तो दिन भर कचरा  जमा कर मुझे स्कूल जाना आच्छा लगता है , "

माझ्या डोळ्यात चटकन पाणी आले. मी त्याला म्हणालो " तू जब बड़ा बनेगा तो मेरा एक काम करना." तो म्हणाला " बोलो क्या करना है ?" मी म्हणालो " किसी गरीब को मदत करना "
त्या मुलाने मला आश्वासन देवून हसत हसत अनवाणी पायाने धावत शाळेकडे निघून गेला. हि गोष्ट आज सकाळी घडली. हे सांगून मला माझे मोठेपण सांगायचा अजिबात आवड नाही आहे फक्त एवढेच सांगायचे आहे आपल्या परीने जर एखाद्याचे भले होत असेल तर जरूर करा कारण सार्या सजीव प्राण्यांना मेंदू असतो पण त्यात देवाने अक्कल फक्त माणसालाच दिली आहे. नाहीतर जनावर आणि माणसाच्यात फरक काय ?

2 comments:

  1. खुपच भावनात्मक .......आणि खूप छान विचार
    झकास प्रशांत ......!!

    ReplyDelete