Sunday 28 January 2018

युद्धनीती- कृष्णनीती


इतिहास हा फक्त जेत्याला लक्षात ठेवतो त्यामुळे युद्ध कसा लढला यापेक्षा तो कसा जिंकला याला महत्व आहे.. मुघल आक्रमकांनी या देशावर राज्य केले त्याला कारणीभूत होते त्यांनी जिंकण्यासाठी युद्धनियम मानले नाही किंवा ते धाब्यावर बसवून  फक्त धर्मासाठी लढले आणि जिंकले.. पूर्वीच्या काळात राजपूत राजे हे महाभारतातील धर्मशास्त्राच्या नियमानुसार लढाई करत.. उदारणार्थ सुर्यस्थानंतर शस्त्र उचलायचे नाही, निहत्यावर वार करायचा नाही.. शरण आलेल्याला माफ करायचे..पाठीवरती वार करायचे नाहीत इत्यादी..  मोघलांनी याच धार्मिक पद्धतीचा फायदा घेऊन हिंदू राजांना फसवून हरवले मग ते पृथ्वीराज सिंह असो, महाराणा प्रताप असो किंवा राजा रतनसिंह सगळे युद्धाच्या मैदानात फक्त आपले मुंडके कापून घेण्यासाठी जात असत.. वरील राजे शूर होते निसंदेह पण त्यांनी केलेल्या चुका मोघल आक्रमकांना राज्य करण्यासाठी आणि इथल्या प्रजेवर अत्याचार करण्यासाठी पुरेश्या होत्या. युद्ध संपल्यावर त्याचे परिणाम हा युद्ध हरलेल्या राज्याला भोगावे लागतात. आणि आपल्या राज्यपासून हजारो किलोमीटर लांब आलेले मुघल लुटारू, लिंगपिसाट आणि धर्मवेडे होते हे सांगायला नकोच.. त्यांनी भारतातील अमूल्य हिरे, जवारात, रत्ने,सोने, चांदी लुटली, त्यांनी आया बहिणींवर बलात्कार केले.. धर्मपसारसाठी प्रचंड नरसंहार केला..  याला कारण फक्त आणि फक्त हिंदू राजांचे ' मोडेन पण वाकणार नाही' हा आडमुठेपणा... युद्ध फक्त शहीद होण्यासाठी लढायचे तसेच प्रचंड धार्मिक आस्था ' माझा देव मला तारेल.. मला मृत्यू नंतर स्वर्ग प्राप्त होईल ही खोटी आस्था.. देवाला प्रचंड घाबरणारे राजे .. मग जसा राजा तशी प्रजा .. मोघलांनी याचाच फायदा उचलला... युद्ध लढण्यासाठी आपल्या हिंदू राजांनी फक्त पारंपारिक युद्धाचा आणि धर्माचा आधार घेतला जो युद्ध हरण्यासाठी पुरेसा होता..मोघलांनी याचाच फायदा उचलला त्यांनी सर्वात प्रथम हिंदू मंदिरे तोडली मूर्त्यांवर घणाचे घाव घातले.. त्यांनी हे दाखवले ज्या देवाला तुम्ही घाबरता त्या देवावर आम्ही घणाचे घाव घातले.. त्याची मूर्ती आम्ही आमच्या। मशिदीच्या पायरीला दगड म्हणून लावली .. त्या शक्तिशाली देवाने आमचे काहीही वाकडे केले नाही तर तुम्ही काय करणार?? याचा परिणाम असा झाला की लोकांचे त्या हिंदू राजांचे मानसिक हार होऊ लागली.. ज्यांचा देव काही वाकडे करू शकत नाही त्यांचे आपण काय वाकडे करणार ही भावना वाढू लागली.. पण एक हिंदू राजा यापेक्षा वेगळा होता.. त्यानेही लहानपणी रामायण आणि महाभारताचे धडे घेतले होते ..पण त्याने त्यातील युद्धाचे धर्मशास्त्र किती घेतले ते माहीत नाही पण त्यातली कृष्णनीती नक्कीच आत्मसात केली होती.. त्या हिंदू राजाचे नाव होते छत्रपती शिवाजी महाराज . अफजलखान आपली फौज घेऊन वाईला आला वाटेत त्याने पंढरपूरचा विठोबा आणि तुळजा भवानी चे चिनी आणि हातोडीने तुकडे केले . अपेक्षा  होती शिवाजी महाराज देव वाचवायला बाहेर येऊन युद्ध करतील.. पण महाराज किल्ला सोडून बाहेर आलेच नाही.. मराठा सरदार मात्र घाबरले.. मूर्तीभंजकांना पाहून त्यांचे हौसले फस्त झाले.. धर्माचा आणि देवभोळे पणाचा जबरदस्त पगडा असलेल्या मराठा सरदार मनातून खचले होते..पण महाराजांकडे यावर जालीम उपाय होता ... त्यांनी या मराठा सरदारांचा देवभोळेपणा त्यांच्याच विरोधात वापरला.. त्यांनी दरबार भरवून सांगितले काल साक्षात भवानी मातेचे मला दर्शन दिले आणि विजय तुझाच आहे असे सांगितले तसेच तलवार ही भेट दिली.. सर्वाना खरे वाटले... आता साक्षात भवानी माता महाराजांच्यासोबत असताना आपण हरुच शकत नाही ही भावना त्यांच्या मनात घट्ट झाली त्यानंतर अफजलखानाचे काय झाले हे तुम्हाला सर्वानाच माहीत आहे.. महाराजांनी युद्धात धर्मशास्त्राचे नियम कधीच वापरले नाहीत.. महाराजानी महाभारत अभ्यासाला होता पण त्यातून काय घ्यायचे काय टाकायचे आहे हे महाराजांना परफेक्त माहीत होते. महाराजांनी महाभारतातून काही घेतले असेल तर ते आहे श्री कृष्णनीती..आणि इतिहास साक्षीला आहे ज्यांनी ज्यांनी श्रीकृष्णनीती वापरली तो जिंकला आहे... दुर्दैवाने कोणत्याही हिंदू राजाने श्रीकृष्णनीती फॉलो केलीच नाही.. पारंपरिक कालबाह्य शस्त्राने पारंपरिक पद्धतीने लढले गेलेले युद्ध जिंकणे कठीण च नाही अशक्यच होते.. देशाचा हिंदू इतिहास हा शौर्याचा नक्कीच असेल पण एक शिवाजी महाराज सोडले तर जेत्यांचा नक्कीच नाही आहे हे आपले दुर्दैव आहे. ज्या भगवत गीतेचा दाखला दिला जातो की हिंदू धर्म सहिष्णू आणि सर्व धर्मांचा आदर करणारा आहे त्या भागवतगीतेत धर्माच्या रक्षणाची जबाबदारीही उचलावी हे सांगितले आहे हे दुर्दैवाने आपण विसरलो म्हणूनच धर्मविस्तारासाठी  जेव्हा परकीय आक्रमण झाले तेव्हा तेव्हा धर्मरक्षणासाठी हिंदू राजे एक होऊन लढले नाहीत.. धर्मातून नको ते कर्मकांड घेतले पण हवे ते घेतलेच नाही..
©प्रशांत शिगवण.
8329899545

Friday 9 September 2016

जिद्द


"माला वाटत पोरी तू अजुन विचार करवा"
"माझा विचार झाला आहे बाबा"
"मुंबईत स्वत्तच घर ही नाही आहे त्याच" रमेश तिची समजूत काढत म्हणाला.
"बाबा माझ बोलन झाल आहे त्याच्याशी, घर नसल तरी स्वतःच्या हिमतिवर जग जिंकायाची जिद्द आहे त्याची धडपड पाहिली आहे मी स्वतःच्या डोळ्याने." रिया.
"स्वप्न पैश्याशिवाय पूर्ण होत नसतात." रमेश.
"तो गरीब जन्मला यात त्याच काय दोष? लहानपणी वडिलांचा छत्र हरवले, होटेलमधे काम करुन त्याने आपले शिक्षण पूर्ण केले." रिया.
"त्याला गरीबी मधे जगायची सवय आहे, पण तुझ काय?"रमेश.
"बाबा तुम्हीच म्हणता ना देवाने हात दिले आहेत, पाय दिले आहेत, आणि व्यवस्तित पाहण्यासाठी डोळे दिले आहेत, त्याच्या जग जिंकन्याच्या स्वप्नांना हातभार लावयला खुप आहेत. बाबा तो निर्व्यसनी आहे कोणताही वाइट गुण नाही आहे त्याच्याकडे, मला माहित आहे लाहानापासून लाडात वाढवलेल्या परीची तुम्हाला काळजी वाटतेय. मला एकदम तळहाताच्या फोड़ाप्रमाने जपलित. मला काश्यचिच कमी होउ दिली नाहीत. पण आता वेळ आली आहे की मला स्वतःला शिद्ध करायची. बाबा जस आईने स्वताला सिद्ध केल आणि माझ्या बाबानी जग जिंकल. तो मला गाडी बंगला यातल काही देईल की नाही माहित नाही पण उपाशी कधीच ठेवनार नाही. बाबा मला माझ्या जगण्याच्या संघर्ष करू दे." रिया अस म्हणाली आणि पटकन रमेशच्या पाया पडली. रमेश काहीच बोलला नाही. त्याच्या डोळ्यात फ़क्त अश्रु होते. मुलीच्या भविष्या साठी पाहिलेली स्वप्न पुन्हा एकदा त्याच्या डोळ्यासमोरुन झर झर पुढे सरकत होती. बाहेर रवि रियाची पहात होता. त्याच्याही डोळ्यात स्वप्न होती दोघांच्या संसराची आणि आपल्या करिअरची. रिया एका ठाम निर्णय आणि एक शून्यातुन जग निर्माण करण्याच्या निश्चयाने बाहेर पडली. सर्व भविष्य एका जिद्दिवर अवलंबून होते. अजुन एक कपल स्वप्नांचा खेळ खेळण्यास तयार होते. जिद्द आणि मेहनतीची शिदोरी जोडिला होती.
©प्रशांत शिगवण.
#जिद्द
#स्वप्न

Friday 2 September 2016

फिजिकल रिलेशन

फिजिकल रिलेशन.
माझा एक मित्र आहे त्याच खर नाव सांगत नाही पण दोन वर्ष्यापूर्वी मला तो भेटायला आला होता. खुप गंभीर आणि अस्वस्थ दिसत होता. चांगल्या कंपनित 50 हजार एवढं मासिक वेतन असताना आर्थिक प्रॉब्लम मधे असेल ही पहिली शंका कधीच दूर झाली होती. नेहमी हसत खेलत असणारा आणि सर्वांची चेष्ठा मस्करी करणारा माझा तो मित्र शांत पाहून मलाच रहावल नाही. खुप वेळ हॉटेलमधे बसल्या नंतर शेवटी मीच विषय काढला "आता सांगणार आहेस काय झाल?" माझ्या या प्रश्नाने त्याच्या डोळ्यात पाणी आल म्हणाला  "खुप मोठ्या प्रॉब्लम मधे फसलो आहे, त्या आरतीने लग्नाच अमिश दाखवून बलात्कार केला अशी केस करेन म्हणून धमकी दिली आहे"
सार प्रकरण लक्षात आल. काही वर्ष्यापूर्वी याच्याच कंपनित याच्या हाताखाली काम करणाऱ्या मुलीशी याच प्रेमप्रकरण झाल होत. कोणत्याही मुलिकडे डोळे वर न करू पहाणारा है महाशय चक्क प्रेमात पडला होता.  पहिला पहिला खुप खुश होता. एखादी मुलगी बाजूने जात असली आणि आम्ही तिच्याकड़े पाहिले तरी म्हणायचा "गर्लफ्रेंड असताना दुसऱ्या मुलिकडे पहायाची इच्छा कशी होते रे तुमची?" एवढं याच त्या आरतीवर प्रेम. याची यापेक्षा सुद्धा तीच्याकडून हीच होती की निदान तिनेही प्रामाणिक राहावे. वर्षभर प्रेमात राहिल्यावर तिचे याला रंगढंग समजू लागले. तिचे फोन दिवसभर चालू असायचे आणि एक दिवस तर हद्द झाली याने तिला बैंडस्टैंड ला दुसऱ्या मुलासोबत फिरताना पाहिले. याने जाब विचारला असता तुहि दुसऱ्या मुलीला घेवून फिर हा तिचा निर्लज उत्तर! मग यानेच ब्रेक अप केल पण तिने ब्रेक अप करायला नकार दिला आणि एक दिवस तिचा मानलेला भाउ(अशी तिने करुन दिलेली ओळख) पोलिस हवालदार होता त्याला घेवून आली. लग्न कर नाहीतर लग्नाचा अमिश दाखवून वर्षभर बलात्कार केलास अशी केस करेन म्हणून धमकी दिली. ती याच्या ऑफिसला डेटा इंट्री करायची. तिला पगार कमी आणि  हा त्या कंपनित मैनेजर महिन्याला याला पगार 50000 घराची परिस्थिति सधन.तिने याच्या पैश्यावर डोळा ठेवून प्रेम केल. याच्या वडिलांची समाजात चांगली ओळख शेवटी तिला 5लाख रुपये देवुन मामला कसाबसा संपवाला.
सांगायचा उद्देश्य हाच की दोघांच्या सम्मतिने फिजिकल रिलेशन आले असतील तर तो बलात्कार कसा होउ शकतो? मी हा उदहारण दिला पण समाजात यापेक्षा खुप वाइट उदाहरणे आहेत. एखाद्या मुलिसमोर आपल्या तोंडातुन शिवी आली की आपण असभ्य पण तिचा मुलगी जेव्हा इतराना शिव्या देते हे चालत.  लग्नाअगोदर येणारे फिजिकल रिलेशनला समाज टॅबू मानत. पण वयात आल्यावर विभिन्नलिंगी आकर्षण आणि नंतर फिजिकल रिलेशन ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. निसर्गाने निर्माण केलेली. फिजिकल रिलेशनशिप ला चूक मि अजिबात म्हणणार नाही. निसर्गाने नर आणि मादी हे दोन जिव निर्माण केले आहेत. नराला आपले जीन्स जास्तीत जास्त माद्यांच्या मार्फ़त पुढे पाठवायचे असतात तर मादिला फ़क्त स्ट्रॉन्ग जीन्स असलेला नर निवडून प्रजनन करायचा असा निसर्गाचा साधा नियम आहे. मादिकड़े चॉइस आहे कारण निसर्गाच्या नियमाप्रमाने फ़क्त स्ट्रॉन्ग जीन्स पुढे न्यायचे आहेत. निसर्गाचा नियम हा सर्वानाच लागू आहे मग तुम्ही कितीही कायदे बनवा नाहीतर समाज बनवून बहिष्कार करा. जर फिजिकल रिलेशन चुकीच असेल तर मग लग्न नावाची विधि करुन त्या चुकीच्या पद्धतिला तुम्ही मान्यता का दिली आहे. मला माहित आहे माझी ही पोस्ट खुप संवेदनशील मुद्दा आहे. अजुनपर्यंत अशी कोणतीही पोस्ट मी लिहली नव्हती त्यामुळे कदाचित माझेच मित्र याला विरोध करतील. पण खर सांगू मित्रानो स्वताला सभ्य समाजनार्या माणसांच्या मोबाईल मधे हिडन अप मधे मी ब्लू फिल्म पहिल्या आहेत.
#सभ्य_समाज
©प्रशांत शिगवण

Tuesday 2 December 2014

शिक्षा

मित्रानो परवा हरियानातील बस मधील दोन मुलींची बहादुरी साऱ्या देशाने पाहिली त्यावरून एक गोष्ट आठवली.

          एका घनदाट जंगलातून माणसांनी भरलेले लग्नाचे वराड निघालेले होते. अचानक त्यांची बस अडवण्यात येते.  तीन डाकू  बस मध्ये चढतात. बस मधील लोकांच्यात दहशत बसावी म्हणून चढल्या-चढल्या बसच्या ड्रायव्हरचा लोखंडी सळी  डोक्यात मरून खून करण्यात येतो. सारा लग्नाचा वराड लुटून ते निघून जावू लागतात. एवढ्यात त्यांच्या मधील एका म्होरक्याचे लक्ष खिडकीच्या बाजूला बसलेल्या सुंदर तरुणीवर जातो.

         तिघंही पुंन्हा बस मध्ये चढतात. तिला ओढत-खेचत बसच्या खाली उतरवता. ती मुलगी बसमधील लोकांना विनवण्या करते पण माणसांनी खचा-खच भरलेल्या लोकांमधील कोणीही तिच्या मदतीला येत नाही.
बस मधील एक तरुण बस मधील लोकांना विनवतो त्यांना सांगतो "ते फक्त तिघे आहेत आणि आपण ४०लोक आपण त्यांना सहज हरवू शकतो" पण तरीही कोणी त्याच्यासोबत मदतीला येत नाही. शेवटी नाईलाजाने तो तरुण त्या तिघांशी एकटाच लढायचे ठरवतो. आणि बसबाहेर पडतो पण त्या तिघांच्या पुढे त्याचा निभाव लागत नाही त्याच्या डोक्यावरच्या एका गंभीर आघाताने तोही तिथेच बेशुद्ध पडतो.

रस्त्याच्या त्या बाजूच्या झाडामागेच त्या मुलीचा बलात्कार होत असतो आणि बसमधील लोक लाचार होऊन तमाशा बघत असतात. काही वेळेतच त्या तीन नराधमांची भूक मिटते. ते निघून जातात. आपले फाटलेले कपडे आणि अर्ध नग्न अवस्थेत ती तरुणी पुंन्हा बसकडे वळते. एवढ्यात बेशुद्ध झालेला तो तरुणही शुद्धीवर येतो. बसमध्ये सारे तिच्याकडे सहानभूतीने पाहत असतात तर काही निर्लज्ज तिच्या शरीराकडे पाहून नयनसुख घेत असतात. 

बसचा ड्रायव्हर मेल्याने बस पुढे कशी न्यावी हा साऱ्या लोकांपुढे पेच पडतो. कारण त्यातील एकालाही बस चालवता येत नसते. ती मुलगी उठते. बसच्या ड्रायव्हर सीटवर बसते. एव्हाना तो मुलगाही बसमध्ये चढू लागतो ती पुन्हा बसमधून दरवाज्या जवळ येते. त्याला बसच्या बाहेर ढकलते. बसचा दरवाजा आतून लॉक करते. सारे वराडी हैराण होतात. ती काय करत आहे हे कोणालाच समजत नाही. ती बसचा स्टार्टर लावून बस चालू करते पुढे उतार असतो बस भरधाव वेगाने पळवते आणि अचानक नुटल करून दरवाजा उघडते आणि बसच्या बाहेर उडी मारते. बस खोल दरीत कोसळते. 

मित्रानो हि गोष्ट आहे. अचानक रात्री सुचली. देशात एका त्रीच्या अब्रू वाचवू न शकलेले नामर्द नसलेलेच परवडले असे माझे स्पष्ट मत आहे.तुम्हाला काय वाटते जरूर कळवा

Thursday 11 September 2014

मला नरेंद्र मोदी का आवडतात.?


एक गोष्ट सांगतो.         


         एका हाय-फाय हॉटेल  समोर एक भिखारी बसत असे. हॉटेल मध्ये येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्तेकाकडून तो भिक मागत असे. पण त्याला शक्यतो कोणी भिक देत नसे. एक चांगल्या कंपनीत काम करणारा एक व्यक्ती रोज त्या हॉटेल मध्ये जेवायला येत असे. नेहमी तो व्यक्ती जेवून झाला कि एक जेवणाची थाली पार्सल घेत असे आणि बाहेर जावून त्या भिखाऱ्याला देत असे. असे कित्तेक दिवस निघून जातात. हॉटेल चा मालक हे दृश नेहमी काचेच्या खिडकीतून पाहत असे. एक दिवस तो व्यक्ती त्या हॉटेल मध्ये जेवायला येतो. आपले जेवण झाल्या नंतर नेहमी प्रमाणे जेवणाची थाली पार्सल घेतो. आणि बाहेर त्या भिखाऱ्याला द्यायला जातो पण आश्यर्य तो भिखारी तिथे नसतो. तो त्याला सगळीकडे शोधतो पण तो भिखारी कुठेच दिसत नाही एवढ्यात त्याचा लक्ष त्या हॉटेलच्या दरवाज्यावर उभ्या असलेल्या वॉचमन कडे जातो. तो त्या वॉचमनला पाहून आश्चर्यचकित होतो कारण तो वॉचमन दुसरा तिसरा कोणी नसून प्रत्यक्ष तो भिखारी असतो. भिखारी त्याला पाहून सलाम ठोकतो.          


          गोष्ट का सांगितली समजली का? नाही समजली? तुम्ही म्हणाल यात नरेंद्र मोदींचा काय संबंध? संबंध आहे. तो माणूस रोज त्या भिकाऱ्याला फुकटचे जेवण देत होता.त्याला फुकट खायची सवय लागली होती. त्याचा आत्मसम्मान मेला होता. पण हॉटेल च्या मालकाने त्याला नोकरी दिली. म्हणजे आता तो रोज सम्मानाने जेवणार होता.                   
     

       
आपल्या लोकांना कोन्ग्रेस सरकारने अनेक स्वस्तातल्या योजना देवून भिकारी बनवले होते. मोदी म्हणतात मी  काहीहि फुकट देणार नाही पण तुम्हला आत्म सन्मान लाभेल येवढा रोजगार जरूर उपलब्ध करेन. आता विधान सभेच्या निवडणुकांची वेळ झाली आहे. कोन्ग्रेस राष्ट्रवादीची अनेक फुकट योजनांचे जाहीरनामे निघतील पण तुम्हाला ठरवायचे आहे भिकारी बनून ते मिळवायचे कि आत्मसन्मानाने आपल्याला आवडलेली वस्तू मिळवायची.      


            बाकी तुम्ही हुशार आहातच    

Tuesday 12 August 2014

Thursday 12 December 2013

तयारी अखंड हिंदूराष्ट्राची- भाग३


हिंदू धर्म हा सहिष्णू आहे. सर्व धर्मांचा आदर करणारा आहे मग हिंदू राष्ट्राचा अट्टाहास का असा प्रश्न पडला असेल ना तुम्हाला ? तुम्हाला आठवतो आहे तो 'वीर सावरकर' चित्रपट ? नाही ना? कसा आठवेल असे चित्रपट पहायची सवयच नाही आम्हाला ठीक आहे मी त्यातला शेवट सांगतो

सावरकर म्हणतात "देश स्वतंत्र झाला देशाच्या नरड्यावर पाय ठेवून कोन्ग्रेस ने फाळणी मंजूर केली. कारण कोणाला आमदार बनायचे होते तर कुणाला खासदार! देशाची कुणाला काय पडली आहे. धर्म निरपेक्ष विचारधारा अशी काही रुजवण्यात आली कि सामान्य माणूस आपला धर्मच विसरून गेला.

धर्म म्हणजे अस्तित्व, धर्म म्हणजे संस्कार, धर्म म्हणजे समाजात जगण्याची एक सुंदर पद्धत! ज्या माणसाला धर्म नसतो त्याच्यात आणि पशुत काय अंतर? स्वत्ताचे अस्तित्व विकून आपण धर्म निरपेक्ष विचार धारणेत वाहून गेलेलो निर्जीव प्राणी आहोत याच्या उलट मुसलमान हे धार्मिक दृष्ट्या एकत्र राहिले. त्यामुळे त्यांच्या एकत्र मतदानावर लालची नेत्यांची नजर राहिली त्यांच्यासाठी लुभावाने वादे केले जावू लागले. सत्तेत आल्यावर त्यावर अंमल हि केला जावू लागला

देशात २०करोड मुसलमान ८० करोड हिंदुंवर भारी पडू लागले याला कारण काय? याला कारण एकच मुसलमान धार्मिक आणि राजकीय दृष्ट्या एक राहिले. आम्ही धार्मिक दृष्ट्या एकत्र येतो पण राजकीय दृष्ट्या विभागले जातो. त्यात आरक्षणाच्या नावाखाली आम्हाला राजकीय दृष्ट्या विभागने सोयीस्कर आहे हे मतलबी राजकारण्यांनी कधीच ओळखले आहे. आपल्या देशाचा बराचसा पैसा यांच्या विकासासाठी वापरला जातो.

जरा विचार करा आपला देश जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा जर धार्मिक तत्वावर जसा पाकिस्तान बनला तसा हिंदुस्तान झाला असता आणि सार्या मुसलमानांना पाकिस्तानात पाठवले गेले असते आणि सार्या पाकिस्तानी हिंदुना हिंदुस्तानात घेतले असते तर? देशाचा वर्तमान आणि भविष्य कसा असता? अल्पसंख्यांक लोकांसाठी वापराला जाणारा करोडो रुपये हे गरीब मागासवर्गीय लोकांच्या कल्याणासाठी वापरले गेले असते. आत्ताच्या वेळी मुसलमान भारतात नसतेच मग राजकारणी गरीब मागासवर्गीय लोकांच्या मतांच्या लालसेने त्यांच्याकडे धावले असते. परिणामी दलित मागासवर्गीय लोकांचा विकास जोमाने झाला असता आणि देशात सार्या पार्ट्या आज जश्या आपण किती धर्मनिरपेक्ष आहोत त्यापेक्षा आपण किती हिंदुत्वादी आहोत हे दाखवण्यासाठी धड-पडल्या असत्या. आज- काळ चे नेते जसे अल्प संख्यांक मतांसाठी लालुचन करतात तसे ते हिंदू राष्ट्रात विकासासाठी केले असते परिणामी देश एक मजबूत महासत्ता असता.

धर्मनिरपेक्षपाणा म्हणजे दोन नावेत पाय ठेवणे आणि असा देश कधीच महासत्ता होऊ शकत नाहीच पण एक मजबूत विदेश नीतीहि वापरू शकत नाही आपल्या देशाची स्तिती हि एका अबले पेक्षा जास्त काही नाही.आता

मी वर दिलेली दोन्ही विधाने १) हिंदू धर्म हा सहिष्णू आहे.२) सर्व धर्मांचा आदर करणारा आहे. हि खोडून काढतो हिंदू धर्माचा धर्मग्रंथ हि भगवत गीता आहे त्यात भगवान श्रीकृष्णांनी सांगितले आहे . धर्माशी धर्माने लढा आणि अधर्माशी अधर्माने लढावे. अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा हा जास्त अपराधी असतो. मला सांगा यात कुठे सांगितले आहे तुम्ही सहिष्णू राहा २) हिंदू धर्म हा सर्व धर्मांचा आदर करणारा आहे. राजकारणी सत्तेसाठी आपली आई हि विकायला कमी करणार नाहीत अहो जेव्हा महाभारत घडले तेव्हा इतर धर्मांचे अस्तित्वच नव्हते मग आपला धर्म इतर जे अस्तित्वात नसलेल्या धर्माचा आदरकर्ता होता हि शुद्ध थाप आहे.आपल्या एकतेची ताकत ओळखलीत तरच हिंदू राष्ट्र निर्मिती शक्य आहे.

Saturday 8 June 2013

औरंग्याला धडकी भरलेला गनिमी कावा !


संभाजी महाराज्यांच्या मृत्यू नंतर राज्य मोडले , सरदार फुटले, फितुरीला चेव आले. हातात सेना नाही राज्याला सेनापती हि तर दूरची गोष्ट त्यात शाही खाजाण्यात खळ-खळाट . आता करायचे काय औरंगजेब तर एखाद्या अजगरासारखा महाराष्ट्राला वेढा देवून होता. दिवसान दिवस त्याच्या वेढ्याचा फास महाराष्ट्राच्या गळ्यात आवळत जात होता. आया बहिणी नागवल्या जात होत्या. मंदिर पडून मशिदी बांधल्या जात होत्या. आता शेवटचे काय ते सोक्ष मोक्ष लावावे म्हणून राजाराम महाराज्यांनी आपल्या विश्वासू सर्दारांसोबत सभा भरवली.

सभेत कुणीच काही बोलत नव्हते. इतक्यात संताजी उठले . " महाराज माझ्या मनाशी एक निर्धार केलाय कदाचित तुम्हास्नी तो वेडेपणा वाटल पण त्यावाचून गत्यंतर नाही." संताजी." काय आहे तुमच्या मनात?" राजाराम महाराज शांतपणे म्हणाले. " इथल्या संकटाचे कारण आहे तो आलमगीर , आणि मी त्या संकटालाच संपवायचे ठरवले आहे.अकस्मात छापा घालून त्याला मारायचे म्हणतो आहे." संताजी निश्चयाने म्हणाले आणि सारे सरदार त्यांच्याकडे पाहू लागले. " छापा घालणार कोण? तुम्ही आणि तुमच्या जीवाला काही बरे वाईट झाले तर ?" राजाराम महाराज ."हो . मी निश्चय आणि मनाची तयारी केली आहे राजे " संताजी ." संताजी राव हा वेडेपणा करण्यापेक्षा त्या शेख निजामाचा बंदोबस्त केले तरी पुरेसे आहे ." धनाजी जाधव त्यांची समजूत काढत म्हणाले. "झाडाच्या फांद्या तोडून उपयोग नाही सारा झाड तोडणे आवशक आहे . आठवा तो छत्रपतींचा शाहिस्ते खानावरचा छापा . तीन वर्ष लागलेला वनवास एका दिवसात महाराजांनी संपवले होते . काबुल आहे हा वेडेपणा आहे पण उरात सुडाची आग असल्यावर हा वेडेपणा करावासा वाटतो. त्या माता भगिनींच्या लुटलेल्या अब्रूची आग, शेकडो मंदिरांच्या विध्वंसाची आग. पराजयाची आग मला स्वस्त बसू देत नाही राजे. धनसिंग वीराचे जीवन म्हणजे अळवावरचे पाणी आज आहे आणि उद्या नाही. जिंकण्यासाठी जीव उधळणे हेच त्याचे आयुष्य अस समजा आम्ही मरणाच्या शोधत आहोत हि नामर्द पानाची जिंदगी आम्हास नकोशी झाली आहे. एक संताजी मेला तर फारसे फरक पडत नाही पण हा संताजी यशस्वी झाला तर या महाराष्टाला लागलेला हा शाप कायमचा संपून जाईल.


धनाजी जाधव आणि राजाराम महाराज आवक होऊन धीरगंभीर संताजीकडे पाहू लागले. महाराज्याना परवानगी देण्यावाचून गत्यंतर नव्हते. धनाजी जाधवांना शाबदि  खान आणि रणमस्त खान हे बादशहा ला पाठवत असलेली रसद तोडायची कामगिरी देण्यात आली १२००० ची फौज घेवून धनाजी जाधव फलटण ला गेले . सोबत फक्त २००० निवडक साथीदार ठेवून संताजीनी आपला मुक्काम शंभू महादेवाच्या डोंगरात हलवला.

तुळापुर च्या छावणीत संताजी घोरपडे यांचे विश्वासू गुप्तहेर कोकानोबा आणि हरबा केव्हाच निघून गेले होते. काही दिवसातच ते बातम्यांचा खजाना घेवून आले. " दाजी बादशहाचा दलाम्बा लय मोठा हाय सहा -सात कोसाचा घेर करून छावणी पसरली हाय. छावणीच्या मध्यभागी गुलालबार तंबू ठोकला हाय .त्याभोवती दोन परस उंचीचे बांबू ठोकून लाकडी फळ्यांचे कुंपण हाय. यावर गुलाबी कापडाची कानात पंघारालीया. तंबूच्या चारी अंगाला लाल निशाण ......"

जावू दे रे मला पहार्याची काय व्यावास्ता हाय ती सांग. "संताजी. " छावणीत पहारा चोख हाय .गुलालबार तंबूच्या मुख्य प्रवेश द्वारावर पहारा करणाऱ्या मुख्य अधिकाऱ्यांची निवास स्थाने आहेत. त्यांचे पहारे रोज बदलतात. खासे आणि जनाना यांची जबाबदारीही त्यांच्यावरच आहे. इथेच बाजाराची जागा आहे. प्रवेश द्वाराच्या दुतर्फा व्यापार्यांनी आपली दुकाने थाटली आहेत. इथेही चोख पहारा आहे. बाजार ओलांडून पुढे आलो कि दिवाने आम चा दरबार लागतो. मग पुढे दिवाने खास चा दरबार त्याला लागुनच जनान खाना हाय. त्याला लागून बादशहाची ख्वाबगहा आहे. तंबूच्या आत बाहेर शेकडो अहादी, शेखजादे यांचा कडक पहारा आहे. झोपण्याच्या जागी पाळलेले गुलाम चेले यांचा खडा पहारा असतो जनान खाण्यात शेकडो शशास्त्र स्त्रियांचा खडा पहारा हाय .संताजी घोर्पद्यानी घनश्याम राम कडून छावणीचा नकाशा तयार करून घेतला. कधी निघायचे, कोणत्या वाटेने जायचे , कुठे मुक्काम करायचे , शेवटच्या मुक्कामापासून तुलापुराचे नेमके अंतर किती तिथे पोहचायला नेमका किती वेळ लागेल या सार्याचा अंदाज बांधला .


प्लान-संताजीनी फलटण च्या बाजूने नीरा नदी ओलांडली. जाजुरीच्या खंडेरायाचे दर्शन घेतले. सासवडच्या दिवा घाटाच्या झाडीत ठरल्याप्रमाणे पहिला मुक्काम झाला . ओल्या रानात सैन्याने पहिली विश्रांती घेतली. संध्याकाळी संताजीनी छावणीचा नकाशा पसरला. " गड्यानो नकाशा नीट पाहून घ्या. हा तंबूचा प्रवेशद्वार इथून आंत घुसायचे पाऊस खूप पडत आहे सारे सरदार दारू पियुन गाढ झोपले असतील याच संधीचा आपल्याला फायदा उचलायचा आहे. " सारे सरदार एक-मेकांकडे भीतीयुक्त नजरेने पाहू लागले संताजींच्या डोक्यात असा आत्महत्या करायचा विचार असेल असे त्यांना मुळीच वाटले नाही. संताजींचा त्यांच्याकडे अजिबात लक्ष नव्हते. ते आपला प्लान पुढे सांगू लागले. " आपण सैन्याचे ५ तुकडीत विभाग करू दोन तुकड्या बाहेर थांबतील तीन तुकड्या छावणीत घुसतील. त्यातले एक एक पाथक बहिर्जी ,मालोजी , विठोजी आणि त्यांच्यासोबत आम्ही स्वत्ता जावू . काम झाले कि चारही तुकड्या वेग वेगळ्या मार्गाने बाहेर एक मेकाला इशारा देत बाहेर पडतील . यात जराशीही चूक जीवावर बेतेल. आम्ही दिलेले हुकुम तुंम्ही आणि तुमची मनसे तंतोतंत पळतील तरच आपण यशस्वी होऊ लक्षात ठेवा.या मोहिमेबद्दल सारे नाखूष असले तरी संताजीना नाही बोलायची कुणाच्यात हि हिम्मत नव्हती.वाघाच्या गुहेत - ठरल्याप्रमाणे दोन तुकड्या बाहेर थांबल्या तीन तुकड्या घेवून संताजी स्वत्त तंबूत जाऊ लागले एवढ्यात छबिन्याच्या पहारेकर्यांनी त्यांना हटकले. " ठहरो, कोण हो तुम लोग?""आम्ही व्हय आपल्याच लष्करातील शिर्के आणि मोहित्यांचे स्वार रातच्या छाबिण्यासाठी बाहेर गेलो होतो. मुबादाल्यासाठी मानसे आली म्हणून परत आलो आहोत. " संताजीनी ठोकलेली थाप वर्मावर लागली. त्यांना आत जावू दिल गेले मोक्याच्या ठिकाणी आल्यावर दोन तुकड्या तिथेच आडोश्याला थांबल्या. ६०० मावळ्यांची निवडक तुकडी घेवून संताजी गुलालबारच्या दिशेने निघाले. जोरदार पावसाने मशाली विझल्या होत्या थंडीने कडाडलेले पहारेकरी आपल्या तंबूत दारू डोसून पडले होते. नगारखाना पार करायला संताजीना कोणतीही अडचण आली नाही ते बाजारातून पुढे जात असताना कुणीतरी त्यांना हटकले "रुक जाव " दुसर्या क्षणाला विठोजीच्या हातातल्या तलवारीने त्याचे मुंडके धडा-वेगळे केले. तंबूच्या मुख्य प्रवेश द्वाराशी असलेल्या पहारेकर्यांना संशय आला ३००-४०० लोक थेट तंबूत घुसत आहेत हे त्यांना जाणवले. त्यांनी गोंधळ सुरु केला. मराठे तयार होतेच गलका वाढायच्या आताच त्यांनी त्यांचे काम तमाम केला. दिसेल त्याला मारत मराठे दिवाने इ आम मध्ये घुसले.


गनीम आया , भागो भागो एकाच गलका झाला. पण याच वेळी निसर्गानेही रौद्र रूप धारण केला विजा आणि ढगांची गडगडाट जोरात सुरु झाली. पाऊस होळी खेळू लागला. गुलाम ,चेले खासे मारून मराठे पत्शाहाच्या शयनगृहा कडे वळले. संताजी संतप्त नजरेने औरंगजेबाला शोधू लागले पण बादशहा कुठे दिसत नव्हता. लपून बसला असेल म्हणून त्यांनी सारा शयनगृह उलटा -पालट केला. पण सारे प्रयत्न व्यर्थ गेले. सर्वांनी आता लवकर निघाले पाहिजे नाहीतर सार्यांच्या प्राणावर बेतेल म्हणून निघू लागले तेवढ्यात कोपर्यात काहीतरी हलले बहिर्जीने हललेल्या जागी हात घालून खसकन ओढून काढले पण तो एक साधा चेला होता. मृत्यूचे थोडे भय दाखवल्यावर त्याने बादशहा जनान खाण्यात पाळला असल्याचे सांगितले " चला जनानखान्यात ' विठोजी पुढे जाऊ लागला संताजीनी त्याला अडवले . " जावू दे वूठू , बादशहा वाचला खरा पण सारा इतिहास बायकांच्या आसर्याला लपला म्हणून त्याची छी थू करेल.


सारे पटकन बाहेर पडले . बाहेर सारे गोंधलेले होते. मराठे त्यात बेमालूम मिसळले. बहिर्जीने तंबूच्या सार्या रस्या कापल्या आणि तो अवाढव्य तंबू एक जोरदार ढगफुटी आवाज करत जमीन-दोस्त झाला. बहिर्जीने त्यावर लावलेले सोन्याचे कळस कापून घेतले. तंबू कोसळतच भगदड  माजली सार्यांना वाटले बादशहा तम्बुखाली मेला असावा. पावसाचा जोर अचानक वाढला. मराठे मोघल सैन्यात घुसून एक मेकांना इशारा देत कधीच निसटले होते.

Saturday 16 February 2013

माझी भटकंती भाग २ ( किल्ले जंजिरा )

माझा मित्र राहुल च्या घराच्या लोनचे काम करण्यासाठी मी आणि राहुल सकाळी माझ्या होंडा स्टनर बाईक ने १० वाजता विरारहून निघालो. तसे जंजिर्याला जाण्याचा आमचा बेत नव्हता. आमचे काम साधारण २ वाजता संपले. दोघे हॉटेल ला बसून जेवत होतो मी राहुल म्हणालो " राहुल कल छुट्टी है क्यो ना हम काही घुमने जाये? " तो म्हणाला "पर किधर?" मी म्हणालो "इधरसे अलिबाग जायेंगे और उधर से जंजिरा किला " त्याने समत्ती दिली आणि  आम्ही निघालो.


अलिबाग ला आम्ही साधारण ५ वाजता पोहचलो. तेथून मुरुड ५५ km आम्ही कोणत्याही तयारीने आलो नव्हतो. आज आंम्हाला इथेच मुक्काम करावा लागणार होता. मला जंजिरा पहायची खूप उत्सुकता होती राहुल उत्तर प्रदेशातील रहिवाशी पण त्याला शिवाजी महाराज्यांविषयी खूप उत्सुकता जेव्हा मी त्याला सांगितले जंजिरा शिवाजी महाराज्याना कधीच जिंकता आले नव्हते तेव्हा तो म्हणाला " जो किला शिवाजी महाराज नही जीत पाये उसे हम क्यो देखे?" मी त्याला समजावले " शिवाजी महाराज ये किला क्यो नाही जीत पाये यहि तो हमे देखना है|"


आम्ही अलिबाग हून मुरुड साठी निघालो. काही ठिकाणी रस्ता खूप खराब होता. तर काही ठिकाणी मुंबई लाही लाजवेल असा सिमेंटचा रोड होता. वाटेत काशीद बीच लागले आणि आम्हाला बीच वर जाण्याचा मोह आवरता आला नाही. बीचवर काही काळ घालवला आणि अंधार पडला. आता आम्ही परत मुरुडकडे निघालो.


मजल दर मजल करत साधारण ७ वाजता मुरुडला पोहचलो. एका लॉजवर मुक्काम केला रात्री घरगुती पद्धतीने बनवलेले चिकन खाताना गावची आठवण आली रात्री परत थोडावेळ मुरुड बीचवर फिरलो. सकाळी ९ वाजता आम्ही जन्जीर्यावर जायला निघालो.

मुरुद्पासून साधारण ५ km वर एका गावातून शिडाच्या बोटीतून आम्ही जंजिरा किल्ल्यावर निघालो. समुद्रात छोटासा दिसणारा हा किल्ला आम्ही जस जसे जवळ जावू लागलो तसे भव्य वाटू लागला किल्ल्याचा दरवाजा जोपर्यंत आम्ही जवळ गेलो नाही तोपर्यंत आम्हाला दिसलाच नाही .लांबहून रोखल्या गेलेल्या तोफा आमच्याकडे संशयाने पाहत आहेत कि काय असे वाटत होते

आम्ही ज्या शिडाच्या बोटीने जात होतो त्या बोटीत शाळेची मुलेही सहलीला आली होती त्यांचे शिक्षक त्यांना जेव्हा सांगत होते कि हा किल्ला शिवाजी महाराज्यांनी बांधला तेव्हा मी त्यावर आक्षेप घेतला मी म्हणालो " सर तुम्ही  मुलांना चुकीची माहिती देत आहात. हा किल्ला शिवाजी महाराज्यांनी बांधला नसून या किल्ल्यावर शिवाजी महाराज्यांचे पाय हि लागले नाहीत इतर कोणी बोलला असता तर ठीक आहे पण तुम्ही शिक्षक असून तुमचे इतिहास एवढे कच्चे असेल असे वाटले नव्हते " त्यावर ते शिक्षक महाशय म्हणाले " मी इतिहासाचा शिक्षक नसून गणिताचा शिक्षक आहे" त्याच्या या वाक्यावर बोटीतील सारी मुले हसू लागली.

आम्ही किल्ल्यात प्रवेश केला. अजस्र प्रवेशद्वार आणि त्यावर सिद्धीची कोरलेली राजमुद्रा आत प्रवेश करताच एक दर्गा लागला इथेच आंम्हाला एक मुस्लीम गाईड मिळाला. सर्वात प्रथम त्याने आंम्हाला ज्या तोफेच्या जोरावर सिद्दी जोहर निर्धास्त किल्ल्यात राहत होता ती तोफ ' कलाल बांगडी ' दाखवली. पंच धातूपासून बनलेली हि तोफ ६ किलोमीटर पर्यंत मारा करू शकत होतीतिच्या जोडीला असणारी सुंदर गायमुख तोफ. किल्ल्याचे बुरुज सुंदर दिसत होते त्यानंतर किल्ल्यातील भुयारी मार्ग, किल्ल्याच्या मध्यभागी असणारे सुंदर तलाव, राजदरबार आणि किल्ल्यावरच्या बालेकिल्ल्यातून दिसणारे सुंदर दृश्य पाहून आम्ही परतीच्या वाटेला लागलो वाटेत मी गाईड ला जंजिरा जिंकण्यासाठी संभाजी महाराज्यांनी ज्या खाडीत भाराव टाकून बुजवण्याचा प्रयत्न केला होता ती खाडी दाखवण्यास सांगितली तर तो म्हणाला " हि अफवा आहे , संभाजी राज्यांनी अशी कोणताच पूल बांधला नव्हता "साधारण दुपारी २ वाजता आम्ही एका हॉटेलात जेवून पुंन्हा मुंबईच्या वाटेला लागलो.