Thursday 27 September 2012

अजितदादा यांना एक पत्र


माननीय उप मुख्यमंत्री ,

अजितदादा पवार यांस

आपल्या राजीनाम्याची बातमी आम्ही काल पहिली. आणि मला धक्का बसला हो. तसा सामान्य माणसाला रोज धक्के खायची सवय असतेच. बस चा धक्का , ट्रेन चा दक्का इतकेच काय रोज महागाईचा धक्का हि आम्ही सहन करत आहोत निमुटपणे. मी शेतकरी आहे त्यामुळे दर वर्षी माझ्याच बांधवांच्या आत्महत्तेचा हि धक्का पचवतो आहे. एवढेच नव्हे पुण्यात झालेल्या माझ्या निशस्त्र शेतकरी बांधवांवर तुमच्याच पोलिसांनी केलेला गोळीबार हि मी पचवला इतक्यावर तुमचे समाधान झाले नाही म्हणून तुमच्याच एका मुस्लीम धर्मानंद नेता नसीम खान आणि रझाकार संगथानेने मुंबईत घातलेल्या हैदोसात आमच्या पोलीस भगिनीवर झालेले अत्याचाराच्या बातम्या हि या कानांनी पचवल्या. त्यावर तुमच्या काकांचे (शरद पवार ) यांचे राजकीय घड्याळी आसू असलेले भाषण हि पाहतो. तुम्ही चालवलेली महाराष्ट्राची लुट हि मी माझ्या डोळ्यांनी पाहत आहे. पण मी काहीच बोलत नाही. कारण तो hakk मी हिरावून बसलो आहे १३ वर्षापूर्वी !

१३ वर्षापूर्वीची राहुल द्रविड ची एक जाहिरात निवडणूक आयोगातर्फे दाखवली जात होती. घरात बसू नका उठा निवडणुकीला मतदान करा नाहीतर उद्या चुकीचा माणूस सत्तेवर आला तर त्याला दोष देण्याचा अधिकार तुम्हाला नसेल. योग्य माणसाला सत्तेवर आणण्यासाठी आपले वोट योग्य माणसाला द्या. तुमचे वोट महत्वाचे आहे. मी त्या वेळी १८ वर्षाचा नव्हतो पण माझ्या घराच्या लोकांनी चुकीच्या माणसाला वोट देवून सत्तेवर बसवले त्यामुळे मी तुम्हाला दोष देण्याचा अधिकार केव्हाच गमावून बसलो आहे.

मी आता दर्शक बनून सारे पाहणार आहे २०१४ पर्यंत तोपर्यंत तुम्ही राजीनामा देवू नये असे मला वाटते. तुम्हाला अजून जेवढी लुट करायची आहे तेवढी करून घ्या. त्यानंतर मात्र मी वोट द्यायला जाणार आहे तुमच्यासारख्या माणसाना घरात बसवायला. तरी आता राजीनामा मागे घ्या हि विनंती.
                                                                                                                                                        कळावे,
                                                                                                                                           मराठी मावळा 

1 comment:

  1. अजित दादांच्या प्रतिक्रियेतला सर्वात विनोदी भाग मला वाटला तो म्हणजे त्यांचे पुढील वक्तव्य ..
    ..
    " मी कोणाच्या पाच पैश्याच्या मिन्ध्यात नाही ."

    ReplyDelete