Monday 5 December 2011

हिंदू धर्माचा खरा संस्थापक ................



असे म्हणतात महाभारत हे एक काव्यरूपी काल्पनिक कथा आहे जी व्यासांनी लिहिली. ती खरी आहे याचा काही पुरावा नाही. खूप लोक असे म्हणतात. अगदी यात काही हिंदू लोक हि या लोकांची री ओढतात चला मीही हे मानायला तयार होईन पण माझ्या काही प्रश्नांची उत्तरे कुणी पटवून दिली तर!
महाभारतात साऱ्या भारतातील ठिकाणाचा उल्लेख मिळतो त्या कालच्या महाभारतात अफगाणिस्थान च्या गांधार प्रांताचा उल्लेख आहे आज माणूस जर साऱ्या प्रदेशाचा फेरफटका मारायचा ठरवले अत्याधुनिक प्रवाशी साधनांचा उपयोग करून तरीही काही महिने सहज लागतील.मग महर्षी व्यासांना कोणतीही आधुनिक साधन प्रवासाची सामुग्री नसताना त्या काळी दाट अरण्यातून अचूक मार्ग क्रमन करत सारा भारत प्रवास करायला किमान ४० ते ५० वर्ष नक्की लागली असतील.आणि आपल्या आयुष्याची ५० वर्ष शिद्धी मिळवण्याची सोडून एक कथा लिहायला घालवली असतील तेही काही बोटावर मोजणाऱ्या लोकांना सांगण्यासाठी (कारण त्या काळी विशिष्ठ वर्ग सोडला तर कोणी शिक्षण घेत नसे )हे मला पटत नाही आणि महर्षी व्यासांनी हि कथा लिहिली असेल तर त्यांना यात फायदा काय ? कारण ते कोणी एखाद्या राज्याच्या राजवाड्यातील प्रोफेशनल लेखक किवा कवी नव्हते. आज बायबल मध्ये लिहिले आहे पृथ्वी सपाट आहे. आणि कुराणात तर अतिशयोक्तीची हद्द पर केली आहे त्यात लिहिले आहे मी अल्ला ईश्वर आहे आणि मी आकाश तुझ्या अंगावर कोसळू नये म्हणून मी ते पकडून ठेवले आहे त्यामुळे तू माझा शुक्रिया कर. या दोन्ही प्रमुख धर्म ग्रंथातील हि वाक्य पटतात का तुम्हाला?


श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेली गीता जी आज हि आपल्याला जगण्यासाठी लागणारे सारे गुणधर्म तिच्यामध्ये लिहिले आहेत तिची तुलना या कालबाह्य ग्रंथांसोबत होऊ शकते का? मला आपण आपल्या धर्म ग्रंथाला नाव का ठेवतो ?
काही लोकांचा म्हणणे आहे कि हिंदू धर्म हा ब्राम्हणांनी आपल्या फायद्यासाठी बनवलेला धर्म आहे पण आपल्या माहिती साठी सांगतो हिंदू धर्म हा ब्राम्हणांनी बनवलेला नसून हिंदू धर्माचा संस्थापक प्रत्तेक्ष भगवान विष्णू आहेत आणि त्यांनी श्रीकृष्ण बनून माणसाने कसे जगावे याचा सार गीतेत सांगितला म्हणजे हिंदू धर्मालाही संस्थापक आहे आणि त्याचा मानवी अवतार शूद्र कुटुंबात जन्मलेले भगवान श्रीकृष्ण आहेत. ब्राह्मण हे हिंदू धर्मातील धर्मगुरू आहेत ते या धर्माचे संस्थापक नव्हेत.जर आपण गीतेला आपला धर्म ग्रंथ मानतो तर गीता सांगणाऱ्या श्रीकृष्णाला धर्म संस्थापक मानायलाच हवे कर्मठ वृत्तीला आवश्य विरोध असावा. पण मुलगा बेवडा निघाला म्हणून त्याचा बाप ,आजोबा ,पणजोबा आणि त्याचा पुरा खानदान बेवडा असेल असे म्हणू नये. माणसाला जगायला समाजाची आवशकता असते आणि समाजाला आपला अस्तिव टिकवायला धर्माची आवशकता असते जर धर्माचा आधार समाजाला नसेल तर एक सुजन समज घडू शकणार नाही आणि एक सुजाण समज घडला नाही तर एक सुजाण नागरिक बनूच शकणार नाही.त्यामुळे धर्म नाकारून धर्मनिरपेक्ष माणूस नक्की जगात राहू शकतो पण त्या माणसात सु संस्कृत पणाच्या नीती मूल्यांच्या अभाव असेल कारण समाज माणसाला संस्कार शिकवतो आणि धर्म समाजाला नितीमुल्ल्य शिकवतो. माणूस सामाज्यावर अवलंबून असतो आणि समाज धर्मावर.
ब्राह्मण हे हिंदू धर्मातील धर्मगुरू आहेत जसे मुस्लीम धर्मात मौलवी आणि क्रिश्चन धर्मात पाद्री प्रत्तेक धर्मातील लोक आपल्या धर्मातील धर्म गुरूंचा आदर करतात त्यामुळे आपणही आपल्या धर्म गुरूंचा आदर करावा.काही लोकांचे म्हणणे आहे ब्राह्मण पूजा पाठ करून आम्हाला लुटत आहेत पण मला सांगा वर्ष्यात आपण किती सत्यनारायणाच्या पूजा करतो आणि त्यात किती दक्षिणा देतो? आपण ज्या दक्षिणा देतो त्यावर ब्राह्मण नक्की बंगला बंधू शकत नाहीत हे मी ठामपणे सांगू शकतो.त्यामुळे आपल्या मराठा समाजाचा जो काही गैरसमज आहे कि हिंदू धर्माचे संस्थापक ब्राह्मण आहेत ते साफ चुकीचे आहे.

12 comments:

  1. हिंदू धर्म हा कोण्या ब्राह्मणाने वा दुसऱ्या कोणी स्थापन केला असे नसून तो समाजाची गरज म्हणून निर्माण झाला आहे असे उपनिषदांच्या माझ्या अभ्यासावरून वाटते.

    ReplyDelete
  2. हिंदू याचा अर्थ असा होतो की चोर,लुटेरा, वाईट,

    ReplyDelete
  3. हिंदु धर्म हा माणुसकीचा धम्म नाही ़

    ReplyDelete
  4. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  5. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शुद्र,, मानसा मानसा मध्ये उच्च निचतेचा भेद निर्माण करतो.. तो धर्म नसून, अधर्म आहे.

    ReplyDelete
  6. जेव्हा देवाने पृथ्वी बनवली तेव्हा प्रथम भगवान विष्णू प्रगट झाले.म्हणजेच विष्णू चा अवतार भगवान श्रीकृष्ण त्यांनी मानवासाठी कूरुशेत्र येथे भगवतगिता सागीतली म्हणून भगवान श्रीकृष्ण हे हिंदू धर्माचे सस्थापक मानतो.

    ReplyDelete
  7. Mg supreme court कसे सांगते की हिंदू हा धर्म नाही म्हणून....

    ReplyDelete
  8. मला अभिमान आहे आपल्या हिंदु धर्माचा..

    ReplyDelete
  9. मला खूप गर्व आहे मी हिंदू असल्याचा.

    ReplyDelete