Wednesday 1 February 2012

इतिहासात हरवलेला धारकरी-संताजी जाधव.




              संताजी जाधव बुचकळ्यात पडलात. तुम्हाला माहित आहे संताजी घोरपडे. मग संताजी जाधव कोण ? संताजी घोरपडे यांनी आपला आडनाव तर नाही ना बदलला होता ? असे  प्रश्न तुम्हाला पडले असतील ना. तर मित्रानो असे काही झाले नव्हते. संताजी घोरपडे यांनी भल्या भल्यांना आपले आडनाव बदलायला लावले. ते आपला आडनाव कसे बदलतील. मग कोण आहे हा संताजी जाधव त्याचे इतिहासातील महत्व काय हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. 
              संताजी जाधव हा धनाजी जाधव यांचा सुपुत्र. संताजी हा नाव धनाजीने आपला मित्र संताजी च्या नावावर ठेवला. धनाजी संताजीच्या युद्ध नितेने इतका भारावला होता कि त्याने आपल्या मुलाचे नाव संताजी ठेवले आणि जसा तो वयात आला तसा तो स्वत्त त्याला घेवून संताजीकडे आला आणि म्हणाला " संता सांभाळ तुझ्या भाच्याला, तुझ्यासारखा पराक्रमी बनव त्याला. आणि तुझे सारे गुण त्याच्यात उतरव" " धना बेफिकीर राहा शिहाचा छावा बनवतो त्याला तुलाही बदणार नाही." संताजी त्याला आपल्या उराशी घेत म्हणाले.  संताजी जाधव पिता धनाजी जाधावाप्रमाणे शूर आणि पराक्रमी होता. चंदान्वंदन च्या लढाईत वाघाप्रमाणे लढला मोघलांनी घेरले तरी हत्यार खाली ठेवले नाही अंगावर असंख्य जखमा झाल्या मराठ्यांनी याला कसा- बसा रणांगणातून परत आणले पण अंगावर असंख्य जखमांमुळे याचा मध्यरात्री मृत्यू झाला. साऱ्या रात्रभर संताजी घोरापाद्यानी त्याला आपल्या मांडीवर घेवून काढली.
            सकाळी धनाजी गढ चढून वर आला आणि त्याने पहिला प्रश्न केला "संता माझा पोर वाघासारखा लढला ना? लढाई अर्धवट सोडून पळताना तर मारला नाही ना गेला ?" " अरे धना तुझा पोर वाघच होता रे आणि लढाईत पळून यायला तो काय मोघल होता मराठ्यांचा मर्द बच्चा होता जो जिंकण्यासाठी मेला " संताजी.यानंतर संताजी आणि धनाजीनी खूप लढाया केल्या आणि त्या यशस्वीही करून दाखवल्या नन्तर सेनापती या पदासाठी या दोघांच्यात जेव्हा वाद झाले तेव्हा संताजी एकदा धनाजीला म्हणाला " धनसिंग अरे हे दिवस बघायला तुझा पोर संताजी इथे नाही आहे पण जर तो असता तर तलवार घेवून पहिली तुझी गर्दन छाटली असती कारण स्वराज्या विरोधात वूठणारा प्रत्तेक बोट वेळीच छातावा असे मी शिकवले होते. आज जर तो वरुण बघत असेल तर त्याच्या मनाला काय वाटत असेल धनसिंग "खरेच जर संताजी जाधव शेवटपर्यंत असता तर संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांच्यात झालेले वाद झालेच नसते. आणि त्यामुळे त्या औरंग्याला २७ वर्ष महाराष्ट्रात राहूच दिले नसते. 

3 comments:

  1. बहुत ही ज्ञानवर्धक. आपका प्रयास सराहनीय है. साधुवाद.

    ReplyDelete
  2. खूप छान माहिती आहे. अतिशय मार्मिक शब्दांत माहिती पुरविण्यात आली आहे.

    नमस्कार ,
    '१०० पुस्तकांपेक्षा १ उच्च प्रतिचे माहिती देणारे पुस्तक नेहमीच चांगले' या तत्वांला अनुसरून आम्ही VISION UPSC MPSC PO ह्या संपूर्ण मराठीमोळ्या YouTube चॅनेलची निर्मिती केली आहे.
    गरजू व हुशार विद्यार्थी मित्रांना व मैत्रिणींना Private Classes च्या जाळ्यातून मुक्त करून Quality Free Education देण्याच्या उद्देश्याने तसेच त्यांच्या मूल्यवान वेळात अतिशय महत्वाची माहिती एकत्रितपणे देणे हेच आमचे ध्येय आहे.
    माझ्या चॅनेलच्या काही विडीओची लिंक खाली दिली आहे , एकदा आपण video पाहून स्वतः विडीओमधील माहिती आपणांस किती उपयुक्त ठरणारी आहे हे ठरवावे.
    Telegram Channel name : @visionump
    Youyube channel name : VISION UPSC MPSC PO

    प्राचीन भारताचा इतिहास - कालक्रम https://youtu.be/ozUiFABdydA

    मध्ययुगीन भारताचा इतिहास - कालक्रम : भाग १ https://youtu.be/a67cdfA3Svk

    मध्ययुगीन भारताचा इतिहास- कालक्रम : भाग २ https://youtu.be/wl9Vg5KhvIA

    आधुनिक भारताचा इतिहास- कालक्रम (इ.स.१६००-१८५७) https://youtu.be/h_0syxLPsbw

    आधुनिक भारताचा इतिहास - कालक्रम (इ.स.१८५७–१९४७) https://youtu.be/ee79-cm1_C0

    आधुनिक भारताचा इतिहास - कालक्रम (इ.स.१९४७-२०००) https://youtu.be/rbMQzjLJSIU

    तुमचा मूल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.

    ReplyDelete
  3. बरोबर आहे आपल्या माणसानेच आपला घात केला

    ReplyDelete