Saturday 4 August 2012

एक आदर्श देशभक्त खेळाडू - पुलेला गोपीचंद


पुलेला  गोपीचंद आपल्यापैकी खूप लोक या महान खेळाडूला ओळखत असतील. आज सायना  नेहवाल ज्या उंचीवर आहे त्याचे श्रेय या महान देशभक्त  खेळाडूला जाते. प्रत्तेक खेळाडू हा देशभक्त असतोच मग मी देशभक्त हा शब्द  का वापरला याबद्दल तुम्हाला उत्सुकता असेल ना तर त्याचे उत्तर मी खाली सविस्तर देतो

अन्द्रप्रदेशात जन्म झालेल्या गोपीचंद  यांना क्रिकेट खेळायचे खूप वेड !पण नंतर त्यांचा मोठा भाऊ राजशेखर यांनी त्यांना ब्याडमेंटल खेळासाठी प्रेरित केले. वयाच्या तेराव्याच वर्षी ते या खेळत एवढे निपुण झाले कि त्यांना हरवणे कोणत्याही मुलाला अशक्यच वाटे.

राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी खूप नाव कमावले. २००१ साली त्यांना भारतातील सर्वोच्च संम्मान राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने संम्मानीत केले गेले.

या महान देशभक्त खेळाडूची वरील माहिती आपल्यापैकी काही लोकांना असेलच पण आज मी अशी एक गोस्त सांगणार आहे जी कदाचित आपल्याला माहित नाही. २००७ कि २००८ नक्की कोणते साल ते मला माहित नाही. मी सकाळी शाळेत आलो पहिला तास इंग्लिश चा होता. इंगलिशचे शिकवणारे आमचे शिक्षक वर्गात आले. आम्हाला म्हणाले तुमच्यापैकी पुलेला गोपीचंद यांना किती लोक ओळखतात ? वर्गात कोणीही आपला हात वर नाही केला. सर थोडे निराश झाले मग म्हणाले सचिन तेंडूलकर यांना किती मुले ओळखतात वर्गात सार्या मुलांनी हात वर केले. त्यावर ते थोडे गालात हसले. परत म्हणाले सचिन ने केलेली पेप्सी ची जाहिरात कशी वाटली तुम्हाला ? सारी मुले आप आपल्या परीने सांगू लागले. कोणी म्हणाले खूप जबरदस्त ,कोणी म्हणाले सचिन पेप्सी पिताना खूप जबरदस्त दिसतो.

काही vel सर काही बोलले  नाहीत मग म्हणाले हि जाहिरात सचिन ला का मिळाली माहित आहे ? कारण हि जाहिरात पहिली पुलेला गोपीचंद यांना मिळाली होती त्यांनी ती नाकारली . आणि ती जाहिरात गोपिचान्दानी का नाकारली माहित आहे कारण पेप्सी हि एक विदेशी कंपनी आहे. माझ्यामुळे आपल्या देशाचा पैसा बाहेरच्या देशात जावू नये म्हणून गोपिचान्दानी हि लाखो रुपयाची जाहिरात नाकारली.

त्या काळातील एक सामान्य खेळाडूला पैश्या पेक्षा देश मोठा वाटत असेल तर  हेच विचार जर करोडपती सचिन ने केला असता तर आपले अरबो रुपये परकियांच्या घश्यात जाताना वाचले असते.

1 comment:

  1. @प्रशांत - लेख शेयर केल्याबद्दल धन्यवाद. पण एक गोष्ट कळली नाही, ती म्हणजे पेप्सीची जाहिरात केल्यामुळे पैसा परदेशात जातो. हा भांडवलशाहीविरोधी सूर आहे आणि चुकीचा आहे. पेप्सी जरी परदेशी कंपनी असली तरी, ते त्यांचे मार्केटिंग, उत्पादन, वितरण भारतातच करतात. त्यामुळे कित्येक लाखो गेलाबाजार हजारो लोकांना रोजगार मिळतो. ते लोक तो पैसा त्यांच्या रोजच्या गरजांवर खर्च करतात आणि इकोनोमी तयार होते. हा बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या विरोधातील विचार आपण सर्वांनी सोडून दिला पाहिजे. माझ्या मते गोपीचंद हा उत्तम खेळाडू आहे, देशभक्त आहे आणि त्याचप्रमाणे तेंडूलकर हा पण देशभक्त आहे, चांगला खेळाडू आहे, पण तेंडूलकरने देशाच्या आर्थिक परिस्थितीस हातभार लावला आहे, चार लोकांना अन्नाला लावले, नोकर्या मिळवून दिल्या तर गोपीचंदने त्यास विरोध केला आणि चार आणखी लोकांना रोजगार मिळण्यापासून रोखले.

    कोहम

    ReplyDelete