Friday 3 August 2012

अन्ना हरले कि त्यांच्यातले गांधी हरले?


काल अचानक अण्णांनी आपला उपोषण सोडून मला फार मोठा धक्का दिला. आंदोलनाला चांगला प्रतिसाद नुकताच मिळू लागला होता पण अचानक अण्णांनी आपले पाय मागे घेतले . यावरून मला १ वर्षापूर्वी घडलेला किस्सा आठवला. आंबेडकरवादी लेखक संजय सोनवणी यांच्याशी माझा त्यांनी लिहिलेल्या एका कवितेत सावरकरांना खल नायक आणि गांधीना हिरो केले होते. त्यांच्या या कवितेला मी विरोध केला . मी म्हणालो " गांधींची विचारसरणी त्या काळातही योग्य नव्हती आणि आज हि योग्य नाही आहे. तर संजय सोनवणी यांनी मला अन्ना हजारे यांच्या आंदोलनाला मिळणारा पाठींबा किती आहे यावरून गांधींची विचारसरणी योग्य आहे असे उत्तर दिले. मी त्यांना म्हणालोही जरी आज अण्णांना पाठींबा मिळत असेल तरी त्यांचे आंदोलन यशस्वी होणे शक्य नाही. कारण आंदोलन करून न्याय द्यायला कोन्ग्रेस म्हणजे काही धर्मराजा (युधिष्ठीर ) नाही. तर ती दुर्योधन आहे. आणि अहिंसक मार्गाने जर कौरवांना जिंकता आले असते तर श्री कृष्णाने महाभारत कशाला घडवला असता.

जशी हिंसा सार्या ठिकाणी योग्य नाही तसी अहिन्साही सार्या ठिकाणी योग्य नाही. कुणी आपल्या गालावर एक मारली म्हणून आपण आपला दुसरा गळ पुढे न करता गालावर मारणार्याच्या गालावर आपल्या पायातील बूट काढून मारलं तर तो पुंन्हा तुमच्या वाटेत जाताना १०० वेळा विचार करेल.सृष्टीच्या नियमात अहिंसेला कुठेही थारा नाही. सामान्य जीवनात जो मावळ राहतो त्याचा सारेच फायदा घेतात आणि आपला कोणी फायदा घेवून तो सुखी होतो यातच मला आनंद आहे असा म्हणणारा सर्वात मोठा महामूर्ख असावा असे मला वाटते.


मग हरले कोण गांधी कि अन्ना? तर याचे उत्तर आहे गांधी . अन्ना आता हरले असे म्हणणे घाईचे होईल. गांधी हरणार हि काळ्या दगडावरची रेघ होती. पण आपण गांधींच्या विचाराने देश बदलू शकत नाही हे जेव्हा अण्णांना समजले तेव्हाच अन्ना हरूनही जिंकले.
अण्णांना हि गोष्ट उशिरा कळली याचे मला थोडे दुक्ख झाले. पण देर आये दुरुस्त आये. कोन्ग्रेस ला जर उत्तर द्यायचेच असेल तर राजकारणात उतरून जश्यास तसे उत्तर देणे आवशक आहे .

अण्णांना राजकारणात उतरून खूप काही शिकायचे आहे. खूप लोकांचा म्हणणे आहे जर अन्ना राजकारणात आले तर कोन्ग्रेस ला खूप मोठा नुसकान होईल पण माझे म्हणणे आहे त्यापेक्षा दुप्पट नुसकान बी जे पी ला होईल. कारण कोन्ग्रेस ला जास्त वोट हे मुसलमान , बौद्ध , आणि क्रीच्चन करतात हि लोक अण्णांना कधीच वोट देणार नाहीत. पण जे बी जे पी चे वोटर आहेत ते मात्र नक्की फुटतील कारण अन्नांमध्ये त्यांना एक सच्चा भारतीय हिरो दिसतो.

काहीही असो पण जर अन्ना राजकारणात उतरले तर राजकारणाची समीकरणे बदलतील एवढे मात्र नक्की !

No comments:

Post a Comment