Wednesday 18 July 2012

अशक्याला शक्य करणारा अजिक्य सेनापती !


वाजल्या कुठे जरी टापा, धुरल्याची दिसली छाया ,

मुघल छावणीत गोंधळ व्हावा ,'संताजी आया संताजी आया'

शस्त्रांची शुद्ध नाही , धडपडती ढाला घ्यायला.

" ज्याला ज्याला म्हणून संताजीशी मुकाबला करण्याचा प्रसंग आला त्याच्या नशिबी खालील तीन पर्याय पैकी एक पर्याय ठरलेलाच असे. १) तो मारला जाई.२) तो जखमी होऊन संताजीच्या हाती सापडे ३) किवा नशीब बलवत्तर असेल तर पराभव होऊन पळून जाई. अश्या वेळी मोघल सरदाराना आपला जीव वाचला हाच पुनर्जन्म वाटे. संताजीचा मुकाबला करण्यासाठी बादशाच्या प्रतिष्ठित सरदारानपैकी कुणीही तयार होत नसे. सार्या मुघल फौजेला शिवाजीचा आत्मा संताजीच्यात संचारला आहे असे वाटे. धडकी भरणारी आपली फौज घेवून तो जर का एखाद्या मुलखात उपटला तर एखाद्या वाघासारखे असणारे मोघल सरदार चाळा चाळा कापत असत. "- मुहमद हाशीम खाफीखान.

  जगातील अजिंक्य योध्याच्या नावामध्ये संताजीचे नाव घेतले तर वावगे ठरणार नाही कारण हा असा एकमेव योद्धा ज्याने फक्त तलवारीच्या जोरावर कासीम खानची ६० हजाराची फौज १५ हजार मराठे घेवून कापली होती. आणि विजय हि मिळवले होते. कासीम खान कोणी साधी सुधी हस्ती नव्हता. खास सास संताजीला संपवायला बादशहा ने त्याला पाठवली होती. दुसरा अफजल खान म्हणालात तरी वावगे ठरणार नाही. त्याची ६०००० ची फौज संताजीने गनिमी काव्याने कापली याच काशीम खानाला त्याने दोद्दरीच्या किल्ल्यात कोंडले. १२ दिवस हल्ला न करता फक्त भीती आणि भुकेने व्याकूळ केले १२ व्या दिवशी स्वत्त काशीम खानाने आत्महत्या केली. संताजीने आयुष्यात कधीच तोफा वापरल्या नाहीत हीच युद्ध नीती पुढे थोरल्या बाजीरावांनी अवलंबली. त्यात सुधारणा करून खुल्या मैदानावर अवलंबली. असे म्हणतात सारे मराठे हे आपल्या शत्रूला माफ करत असत पण संताजीने असे कधीच केले नाही.' माझ्या शंभू महाराज्यांच्या सूडाचा बदला घेण्यासाठी सुडाने पेटलेल्या संताजीने आयुष्यभर एकाच विचार करत आपले आयुष्य घालवले तो विचार म्हणजे 'ज्या औरंग्याने माझा शंभू राजा मारला त्या औरंग्याला मी स्वत्त या हाताने मारणार. त्यासाठी त्याने एक धाडशी बेत आखून आपल्या १००० साथीदारांसह  तुळजापूरच्या औरंगजेबाच्या छावणीवर अचानक हल्ला हि केला. बादशहा जनन खाण्यात पळाला म्हणून वाचला. नाहीतर इतिहास आपल्याला वेगळाच वाचायला मिळाला असता.  या घटनेची आठवण बादशाहाला राहावी म्हणून त्याच्या तंबू वरील सोन्याचे ३ कळस कापून आणले.

जगात सारे सेनापती हे आपल्या सैन्याला लढाईच्या मैदानात सोडून एका उंच टेकडीवर दुर्बीण घेवून विजय कोणाचा होत आहे हे पाहत बसायचे रक्ताचा एकही थेंब आपल्या अंगावर न उडता ते विजयी नायक बनायचे. पण संताजी घोरपडे हे स्वत्त अग्रभागी राहून आपल्या सैन्याचे नेतृत्व्हा करत असत. त्यांना मरणाची भीती कधी वाटलीच नाही अगदी गुल्बार्ग्यातील छावणीवर अचानक छापा टाकताना आपले मरण हे निच्चीत आहे पण जर आपण बादशाहाला मारले तर जीव मुठीत धरून जगणारी प्रजा तरी वाचेल असा विचार फक्त शिवरायांचा मावळाच करू शकतो.

इतिहासात संताजीची ओळख हि फक्त तो हट्टी, शीघ्रकोपी, आपलेच म्हणणे खरे करणारा, कोणालाही फटकन बोलणारा, रागाच्या भरात कुणाचीही भाय भिडा न ठेवणारा असा सेनापती अशीच आहे पण त्याने त्याग केलेले स्वराज्यासाठी आपले आयुष्य कोणीही नाकारू शकत नाही.

घोरपडे घरात एक अमूल्य हिरा जन्म्हला आला होता. पण त्याची खरी किंमत ओळखली ती हंबीररावांनी त्यांनी वेंगुर्ल्यात नवशिक्या संताजीच्या हातात आपली सारी फौज दिली पराभव हंबीर रावांना दिसत होता. पण आपल्या कल्पना शक्तीच्या जोरावर संताजीने पराभवाला विजयात बदलले. त्यावेळी हंबीर रावांनी हि आशार्याने आपली बोटे तोंडात घातली असतील. त्यांनी त्याला ५ जुमाल्याचा सरदार बनवला. पण शिवाजी महाराज्याना हे खटकले त्यांनी एवढ्या लवकर पद उन्नती देण्यास आपण मुघल नाही आहोत असे स्पष्ट शब्दात हंबीर रावांना सांगितले आणि संताजीला परत एकाच जुमाल्याचा सरदार बनवले. दुसरा कोणी असता तर तो फौज सोडून कधीच गेला असता खुद्द हंबीर राव या घटनेनंतर संताजीला तोंड कसे दाखवू म्हणून भेटायचे टाळत होते. पण संताजीची शिवरायांबद्दल असणारे प्रेम तसूभर हि कमी झाले नाही. आपण  शिवरायांचे सैनिक आहोत मनसबी झोडायला मोघल नाही आहोत असे त्यांनी स्पष्ट शब्दात हंबीर रावांना सांगितले तेव्हा हंबीर रावांना हि वाटले घोरपडे घरात कोणत्या मातीच्या गोळ्याने आकार घेतला आहे. मरणाचे भय नाही, कोणत्याही सुखाची अपेक्षा नाही, दिवसरात्र फक्त लढाईचा विचार करणारा या पोराला भीती नावाची चीज द्यायला विसरला तर नाही ना?

जर संताजी आणि धनाजी यांच्यात वाद झाले नसते तर दिल्लीवर भगवा फडकवणाऱ्या बाजीरावांना भगवा उचलून अफगाणीस्थानात फडकवावा लागला असता कारण दिल्लीवर भगवा या अगोदरच फडकला असता.

No comments:

Post a Comment