Sunday 10 June 2012

येल्बुर्ग्यातील गनिमी काव्याची चुणूक !

महाराज कर्नाटक स्वारीवर निघाले. का कुणास ठावूक त्यांनी शंभू महाराजांना मोहिमेपासून दूर ठेवले. पाटगाव ला मोनी  बाबाचे दर्शन घेतल्यानंतर  ते हंबीर रवाना म्हणाले "पठाणांचा बंदोबस्त केल्याशिवाय आपले कर्नाटकातले राजकारण साधते दिसत नाही आम्ही भाग नगरीत जाऊन कुतुबशाह ची भेट घेतो तुम्ही पठाण  मारून गर्दीस मिळावा. 

राजांची आज्ञा घेवून हंबीर राव मोहिमेची तयारी करू लागले आपल्याला महाराजनसोबत राहता येणार नाही म्हणून नुकतेच सैन्यात भरती  झालेले संताजी निराश झाले. पौषातल्या थंडीत कुड कुडत मराठी फौजा घट प्रभा, मलप्रभा या नद्या ओलांडल्या. हंबीर राव कोप्पिकडे वळले इथेच मियाना बंधूंची पठाणी फौज झोडायची होती. हंबीररावांनी आपल्या काही फौजा संताजी , बहिर्जी आणि मालोजी या तीन घोरपडे बंधूंच्या हाताखाली दिल्या. आणि त्यांनी मियाना बंधूंच्या ताब्यातील बहादूर वाडा गजेंद्र गड हि दोन स्थळे घ्यायला पाठवली आणि या तीन शूर वीरांनी  पठाणांना काही समजायच्या आत ती हस्तगत केली. तिथे थोडी शिव बंदी ठेवून ते परत हंबीरराव यांना येवून मिळाले.

आपल्या जहागीरीतील मोक्याची ठिकाणे गेल्याचे पाहीन मियाना बंधू भडकले त्यांनी रातो- रात  १२ हजाराच्या फौजेसह  हंबीर रावांचा येलगुर्ब्याच्या तळावर चालून आले.अचानक छाबिण्यासाठी गेलेले स्वार रात्री दौडत आले  ' पठाण आले पठाण आले म्हणून सारी छावणी सावध केली.

हंबीर राव उठले एका उंच टेकडीवर चढून त्यांनी समोर पहिले. समोर अवाढव्य फौज पाहून त्यांनी आपल्या सरदाराना लढायला चला असे आव्हाहन केले. आता आपण सारे मारले जाणार या भीतीने सारे सरदार घाबरले. इतक्यात संताजी पुढे आले  " मामा मी पुढे जाऊ फौज अडवतो तुम्ही तोपर्यंत तयार व्हा." संताजी." वेड लागले आहे का पोर पल्भारात बुका करतील ते तुझा." हंबीर राव म्हणाले.
"पण सारे कुल लष्कर वाचवण्यासाठी कुणा ना कुणाला तरी मारावेच लागेल ना ." संताजी निच्याने म्हणाले आणि हंबीर राव त्याच्याकडे आ वासून पाहू लागले. आता वयात आलेल्या या पोराला मरणाचे जराही भय नाही हे पाहून ते त्यांची छाती भरून आली त्यांनी संताजीला छातीशी पकडले.त्यांच्या मनात विचार आला कसला काळीज घेवून हा पोर घोर्पाद्यांच्या घरात जन्म्हला आला. काही काळ हा पठाणांना थोपवून धरेल हि पण असा जावा मर्द वीर मृत्युच्या दारात लोटणे म्हणजे शुद्ध मूर्खपणा आहे त्यापेक्षा पराभव परवडला. नाही नको महाराज्याना जे उत्तर द्यायचे ते देवू पण हा मूर्खपणा नको.
"कसला विचार करत मामासाहेब ? मला परवानगी देत आहात ना?" संताजी हंबीर रवाना विचार करताना पाहून म्हणाले.
"पोरा माझा मन नाही करत रे तुला मृत्युच्या दाढेत लोटण्याचा ." हंबीर राव निराश होत म्हणाले.
" माझ्या एकट्याच्या जीवासाठी सार्या फौजेला संकटात नका टाकू मामा , लवकर  गनीम अंगावर भिडण्या अगोदर  करण्याअगोदर मला चाल करून द्यायची परवानगी द्या. संताजी.
" जा बाळानो , रण  देवतेने आज जणू हट्टाच धरला आहे. पण जपून तुमच्या जीवाला काही झाले तर मी महाराज्याना तोंड दाखवायच्या हि लायकीचा राहणार नाही.

संताजींची रणनीती- केवळ काही मोजक्या लढाईत भाग घेतलेले  संताजी घोरपडे तसे नवशिके म्हटले तरी वावगे ठरणार नाही. पण गनिमी कावा जणू त्यांच्या रक्तातच भरला होता गनीम इतक्या जवळ आलेला असून त्याच्या सारख्या नवरख्या मावळ्याने डोके शांत ठेवून रणनीती ठरवली.

संताजीनी आपल्या मुठ भर सैन्याचे तीन तुकडे केले. २ तुकड्या टेकडीवर ठेवल्या. त्यातली एक तुकडी गोकुळ आणि अजना यांच्या बंदुकधारी बर्कांदार बहेलिया पायदळाची होती. ती डोंगराच्या कपारीत दबा धरून बसली. गोफण मारे दगड गोट्याच्या राशी जमवू लागले. दुसरी तुकडी घोड दलाची होती. तिसरी तुकडी घेवून स्वत्त संताजी पाठनांवर चालून गेले.

आमना सामना- संताजीच्या नेतृत्वाखाली येणारी छोटीशी तुकडी पाहून काशीम खान आनंदित झाला.
" काट डालो  सारे काफारोन्को एक भी जिंदा नाही निकालना चाहिये | "
काशीम खानशी जराशी झटापट करून मराठे पळाले मग सुरु झाला पाठलाग! टेकडीशी येवून मराठे थांबले आणि अचानक काशीम खानच्या फौजेवर बंदुकीचा मारा होऊ लागला. डोंगरावरून  गोफनिचे दगड अचूक पठाणांना हेरु लागले. वादळी वाऱ्याने  पिकलेली टरफले जशी पडवीत तसे पठाण पडू लागले. काशीम खानच्या सैन्यात बंदूक धरी नव्हतेच. त्याने बानाईत पुढे आणले पण त्यांचे बाण मराठ्यांच्या पुढे पोचतच नव्हते.

खानाची पहिली फळी पांगली. त्याच्या एकसंघ सैन्याची पंगा- पांग झाली. आणि हि माहिती हंबीर राव मोहित्याना समजली. मग त्यांनी आपले कुल लष्कर परत मागे फिरवले आणि खानाच्या मागून हल्ला केला. लढाई जोमात आली. संताजी, बहिर्जी, मालोजी हे तिन्ही घोरपडे सूर्यासारखे तळपत होते. नागोजी जेधे पठाणाच्या काब्ज्यात शिरून अभूमान्यू सारखे लढू लागले. धनाजी जाधवांनी तर थेट काशीम खानावरच  हल्ला केला.

नागोजी जेधे रणांगणात पडले- खानाला आता त्याचा पराभव दिसू लागला. त्याचा संरक्षण करणारे पठाण कधीच पळून गेले होते. धनाजी जाधवांच्या मदतीला आता संताजी आले त्यांनी कासीम खानाला जिवंत धरला. आपला सरदार पकडला गेला हे समजताच उरले सुरलेले पठाण पळू लागले त्यांना थाबावाण्यासाठी हुसेन खान हत्तीच्या हौदातून आपला बाण खाली ठेवून शर्तीने प्रयत्न करू लागला. हे नागोजी जेध्याने पहिले आणि नागोजी जेधे तडक हुसेन खानवर चालून गेले. त्यांनी आपल्या हातात असलेला भाला हुसेन खानाच्या हत्तीच्या गान्द्स्थालात मारला. हत्ती भयंकर चीत्क्काराला. गोल गोल फिरू लागला. आता दुसरा भाला घेवून नागोजी हुसेन खानाला टिपायला सज्ज झाला. आता आपण मारले जाणार या भीतीने खानाने धनुष्य उचलला आणि नागोजीच्या हातातील भाला तिथेच राहिला. सर सरत आलेले बाण त्यांच्या कपाळात शिरून हनुवातीतून बाहेर आले.

नागोजीच्या मृत्यूने मराठे भारी भडकले. त्यांनी पठाणांची कत्तल चालू केली. हुसेन खानाला हत्तीच्या अंबारीतून खाली खेचले. सारे मराठे त्याला मारायला धावले पण हंबीर रावांनी त्यांना अडवले कोप्पार चा मजबूत कोट घ्यायचा होता. त्यासाठी खान त्यांना जित्ता हवा होता.

दोन्ही मियाना बंधू कैद झाले होते. संताजी, मालोजी, बहिर्जी या घोरपडे पराक्रमाची शर्थ केली त्यांच्या सोबत धनाजी जाधव विठोजी चावण सर्जेराव जेधे या ताज्या दमाच्या पोरानीही अतुल पराक्रम दाखवलं. पण नागोजी जेध्यान्सारखा वीर या लढाईत कमी आला.

गानिमांचे २ हजार  घोडे , अनेक हत्ती , कापड चोपड तसेच शस्त्र अशी प्रचंड लुट हाती लागली.

येल्गुर्ब्यात संताजी  घोर्पद्यानी दाखवलेला गनिमी काव्याने हंबीर राव आश्चर्य चकित झाले. जिथे जिंकण्याची बिन्कुल शक्यता नव्हती तिथे विजय मिळाला यावर त्यांचा अजिबात विस्वास बसला नाही. त्यांनी संताजीला सम्मान करून ५ जुमाल्याचा अधिकारी बनवला. संताजींची वयक्तिक हि पहिलीच जीत होती पण हा गनिमी कावा त्यांनी आयुष्यभर वापरून यशस्वी करून दाखवला.

गनिमी काव्याचा शांत डोक्याने यशस्वी वापर कुणी केला असेल तर ते म्हणजे संताजी पुढे हीच रणनीतीत काही बदल करून ती खुल्या मैदानावर हि वापरू शकतो हे अजिंक्य योद्धा बाजीरावांनी दाखून दिले.

No comments:

Post a Comment