Tuesday 5 June 2012

बेन्नूर ची लढाई- शांत डोक्याने लढलेली गनिमी काव्याची लढाई



राजाराम महाराज मोघलांच्या वेढ्यातून सुटून सुखरूप निघाले ते कर्नाटक मधून महाराणी चन्नम्मा  च्या राज्यातून पुढे निसटले. औरंगजेब ला याची माहिती लागली त्याने राणीचे राज्य संपवण्यासाठी आपला सर्वात कबिल शहजादा आपल्या तीन शूर सरदाराना घेवून निघाला. आणि राणीने संताजीची मदत मागितली. तिने शिवाजी महाराज्यांनी आपल्याला दिलेल्या आश्वासनाची आठवण करून दिली.

संताजींचे आगमन -त्या वेळी संताजी केलदीला होते. ते केलादिहून एक्केरीला आले. हि सुद्धा बिदनूर चीच राजधानी! तिथे एक  भुई कोट होता. ५०० शिव बंदी जीव मुठीत घेवून लढण्यासाठी तयार होती. मराठे आपल्या मदतीला आले आहेत हे समजल्यावर त्यांच्या जीवात जीव आला.राणीचा प्रधान व्यंकोजी भीत भीत संताजीच्या भेटीला आला. संताजीनी त्याला धीर दिला. जोपर्यंत संताजी जिवंत आहे तोपर्यंत काही झाले तरी जीत आपलीच आहे. हे सांगून त्याची थोडीफार भीती दूर केली.

गनिमी काव्याला प्रारंभ-  संताजीने व्यंकोजीला राणीची भेट घेवून युद्ध नीती ठरवू असे सांगितले पण व्यंकोजी मोघलांच्या सेना रोज राज्याच्या जवळ येत आहेत त्यामुळे भेटी गती करण्यात वेळ घालवू नये असे सांगितले आणि शांत डोक्याने विचार करणारे संताजी चिडले. "युद्ध आम्ही आमच्या मर्जीने आणि आमच्या रणनीतीने लढणार आहोत. राणी साहेबांशी भेटून फक्त आमची रणनीती सांगणार आहोत." असे बोलताच व्यंकोजीला राणीची भेट घडवण्यावाचून गत्यंतर उरले नाही.

राणी चन्नम्मा ची भेट - राणी चान्नाम्माने संताजीचे स्वगत केले. " खरे तर आम्ही इथे कोय्गडावर आलो आहोत ते आमच्या धाडशी बहिणीची भेट घेण्यासाठी.आमचा राजा तारालास आता तुझे राज्य वाचवणे माझे कर्तव्य " संताजी राणीला मुजरा करत म्हणाले. राणी गहिवरली  तिच्या  डोळ्यात  अश्रूंची धार लागली. " माझ्यावर विस्वास ठेवा राणी साहेब हा संताजी तुमच्या राज्याचा एक इंच हि मोघालाना मिळवू देणार नाही. मला तुमचे सारे राज्य पाहायचे आहे " संताजी असे म्हणताच व्यंकोजी चवताळला " राज्य पाहण्यात वेळ नका घालवू शत्रू तोंडासमोर येत चालला आहे दिवसेन दिवस." " व्यंकोजी राव युद्ध  आम्ही आमच्या पद्धतीने लढणार त्यासाठी मला तुमचा मुलुख पहावाच लागेल."संताजी असे म्हणताच राणीने तुम्ही तुमच्या पद्धतीने युद्ध लढा असा कौल दिला आणि व्यान्कोजीचा नाईलाज झाला. सारे प्रदेश पाहून संताजीनी आपली रान नीती ठरवली. इकडे शहजाद  आलम राणीकडून कोणी तहाची बोलणी करावयास येतो का याची शिमोग्याला  वाट पाहत होता. " त्या अस्वलीचे राज्य बुडवण्याचा हुकुम आहे शहजादे आलम , काहीही झाले तरी तह करायचा नाही" सर्जाखान आलम ला म्हणाला. " हो आणि ते आम्ही बुडवाणारच." जानिसार खानाने आपला निर्धार सांगितला.

तिन्ही खानांची धूळ दान -  संताजीने सारे पाणवठे विष टाकून दुषित केले. मतलब खान एक्केरी पर्यंत आला. त्याने एक्केरीच्या किल्ल्याला वेढा दिला. नंतर फिरत फिरत सर्जा खान आला. थोडेसे पुढे जाऊन त्याने केलादीच्या किल्ल्याला वेढा दिला. पण कुठेच विरोध होत नाही हे पाहून जानिसार खानाला प्रश्न पडला एवढी हिम्मत या राणीच्या अंगात  मध्ये कुठून आली. इतक्यात एक काळा  ब्राम्हण बाहेर आला.त्याने राणी केलदी सोडून कोयगड ला गेली असल्याचे सांगितले हा ब्राम्हण दुसरा तिसरा कोणी नसून संताजीचा हेर 'कोकानोबा' होता. मतलब खान आणि सर्ज्या खानकडे वेढा चालावाण्यापुर्ते सैन्य ठेवून. जोनिसार खान १० हजार घोड दल आणि ५ हजार पायदळ घेवून कोय गडाकडे निघाला. वाटेत विषारी पाणी पिवून त्याचे सैन्य जनावरे मारत होती तरी तो पुढे जातच होता.

झाडीत, डोंगर दर्यात दाबा धरू बसलेली बिन्दूर चे सैन्य आणि मराठ्यांचे सैन्य या सार्या हालचाली टिपत होती. जस जसा  शत्रू जवळ येत होता तस तसा प्रधान व्यंकोजी बैचन होऊ लागला. शत्रूला आपल्या दारात आणण्याची हि कसली रणनीती तुमची म्हणून तो संताजीला विचारू लागला. संताजीने त्याला धीर धरण्याचा सल्ला दिला. आता संताजीने आपले पत्ते खोलले. "अगोदर सर्ज्या खान आणि मतलब खान yanana पाणी पाजू मग जोनिसार खानाला अंगावर घेवू " संताजी असे म्हणताच व्यंकोजी रागावला " नाही नाही , अगोदर राणी वरचे संकट संपवा जोनिसार खानाला अजून जवळ येवू देवू नका. नाहीतर अनर्थ होईल." " व्यान्कोजीराव राणी ची काळजी जेवढी तुम्हाला आहे त्यापेक्षा अधिक आम्हाला आहे कोयगड हा डोंगराळ किल्ला आहे खानास तो दाद लागू देणार नाही पण जर आपण जोनिसार खानवर हल्ला केला तर ते दोन खान किल्ल्याचा वेढा वूठवून जोनिसार खानच्या मदतीला येतील. मग आपले काम अवघड होईल व्यंकोजी राव पण जर आपण मतलब खान आणि सर्ज्या खानवर हल्ला केला तर या किल्ल्याचा वेढा वूठवून जोनिसार खान त्यांच्या मदतीला जाणार नाही कारण कोणत्याही परस्थितीत राणी हाताची घालवणे त्याला जमणार नाही आणि गेलाच तर वाटेत त्याचा जीव नकोसा करू आपण . शांत राहा विजय आपलाच आहे. मला फक्त तुम्ही साथ द्या!" संताजी. व्यंकोजीने हि मनात विचार केला एक सेनापती असूनही किती शांत डोक्याने विचार करतो याला आपण याच्या पद्धतीने लढून देवू या. इथे आपली मुस्सादेगिरी व्यर्थ आहे.

इकडे एक्केरी आणि केलदीला संताजीने राणीच्या सैन्याच्या साथीने एकाच वेळी भर सकाळी झडप टाकली. मराठी सैनिकांपेक्षा राणीचे सैनिक क्रूर होते ते मिळेल त्याला ठार मारत होते.दिवसाचा गोंडा फुटेपर्यंत दोन्ही खान पळून गेले होते. सैन्याने शरणागती पत्करली राणीचा सेनापती सुडाने पार पेटला. त्याने सरसकट कत्तल करायचा हुकुम दिला. पण संताजीने त्याला थांबवले. या युद्धाची वार्ता लवकरात लवकर जोनिसार खानाला समजेल याची व्यवस्था केली.

खानाने कोय गडावर जम्बुक्याचा मारा केला. राणी कडे  तोफा नव्हत्याच पण बंदुकधारी बरकंदाज होते बिदनूर चे बानाईत त्याच्या मदतीला होते. खानच्या लक्षात आले गडावरची शिव बंदी महीन २ महिने किल्ला सहज लढवेल. तसेच हर्कार्यानी खबर आणली मराठ्यांचा सेनापती संताजी राणीच्या मदतीला आला आहे. " या खुदा ये खाबीस कब कैसे आया" हि खबर ऐकून खानाचे अर्धे अवसानच गळले.

मराठ्यांच्या १०००० सैन्याने जोनिसार खान  हल्ला केला नाही. जोनिसार खानाचे सैन्य हल्ला होण्याची वाट पाहत दिवसभर रणांगणात उभे होते पण मराठ्यांकडून हल्ला झाला नाही. जोनिसार खानाचा सारी फौज रात्रभर जागरण करून काढली. दुसर्या दिवशीही हाच प्रकार झाला. जोनिसार खान वैतागला. सैन्याची हरवल सांभाळणारा नाजाब खान संतप्त झाला " आता किती अजून इंतजार करणार ? दोन दिवस आपण मैदानात नुसते उभे आहोत. ratri nit zop हि lagat नाही आहे. नाजाब  खान. " काय करणार आपण घेरले गेलो आहोत ." खानाचा स्वर हताश होता . नाजाब खान त्याचा स्वर पाहून भय चकित झाला कारण हाच खान मोहिमेवर निघताना मोठ मोठ्या बढाया मारत होता.

इकडे संताजीचे सरदार हि गोंधळले होते. तीच हालत प्रधान व्यंकोजी आणि सेनापती कुमार संग्गापा ची झाली होती. संताजी लढाईचे हुकुमाच देत नव्हते.इकडे मोघल सैन्य गोंधळले होते. शिपायांची समजूत घालणे सरदाराना कठीण झाले होते. दुपारपर्यंत सारे शांत होते सूर्य माथ्यावर आल्याने उन्हाने अंगावरची पोलादी चिलखते तापू लागली. डोक्यावरची शिरस्त्राणे तापली. मोघल सैन्याच्या अंगातून घामाच्या धारा लागल्या . त्यांची हिम्मत जवाब देवू लागली आणि इथूनच मोघलांच्या आघाडी घोड दलाने चूक केली. 'या आली ..'अशी गर्जना देत ते घुसले मराठे तयारीतच होते. रखमाजी मोहिते पुढे होते त्यांनी मागे सारून त्यांना खोलवर आत येवून दिले. बहिर्जी घोर्पद्याच्या सैन्याने लगेचच त्यांना घेरले. शिकार्यांनी सावजाची शिकार करावी तसे मराठे आणि राणीच्या सैन्याने घोड दलाची कत्तल उडवली.

पुढच्या फळीची वात लागलेली पाहून डावी आणि उजवी फळी बिचकली दोनी फळ्या पुढे चाल करून आल्या मराठ्यांनी त्यानाही आपल्या योजने प्रमाणे कत्तल केली जोनिसार खान शौर्याने लढला. पळणाऱ्या सैन्याला थांबवण्याचे त्याने शरतीने प्रयत्न केले पण सारे प्रयत्न फ्होल ठरले. नाजाबत खानाला कुमार संगप्पा ने ठार मारले. आता मराठा सैन्य जोनिसार खानाला जिवंत पकडण्यासाठी धड पडत होती. आता जोनिसार खान घाबरला. त्याने अंगावरचे कपडे काढून एका शिपायाचे कपडे घातले. आणि पळणाऱ्या जत्त्यात सामील झाला. मराठे पळणाऱ्या सैन्यावर हल्ला करत नव्हते.

कोय गडावर विजयाचा जल्लोष साजरा झाला. राणीने दरबार भारावून संताजीचे संम्मान केला. राणीने राजाराम महाराज्याना जिंजीला आपल्या परीने योग्य मदत करू असे आश्वासन हि दिले. संताजीने जाता जाता बादशहा शी समेत घडवून वेळ मारून घ्या असा उपदेश करून निघून गेले.

वीर सर सेनापतीच्या या नियोजन बद्ध गनिमी काव्याला मी इतका प्रभावित झालो आहे कि त्यांच्या प्रत्तेक लढाईचा आपल्याला थोडक्यात आढावा सांगताना छाती भरून येते.

2 comments:

  1. हे हिंदू राष्ट्र व्हावे हि तर श्रींची इच्छा
    शिवाजी महाराज आणि तात्या तर ह्या आज्ञेचे आयुष्यभर पालन केले.
    तुमचा ब्लॉग त्यांच्या उदिष्ट व रुपड्या सह आवडून गेला.

    ReplyDelete