Friday 1 June 2012

बुंदेलखंड इतिहास आणि मराठ्यांची महाराष्ट्राबाहेरची भरारी !


बुंदेलखंड मराठ्यांच्या इतिहासातील महत्वाचे राज्य. कारण याच बुंदेलखंडाने मराठ्यांना महाराष्ट्राबाहेर आपले राज्य वाढवून दिल्लीपर्यंत मजल मारण्यासाठी मदत केली. मग कसे आहे हे बुंदेलखंड जे मराठा इतिहासात प्रचंड उलाढाल केली ते कसे आहे ते पाहू.

प्रदेश-बुंदेलखंड हा मुलुख विन्ध्य पर्वतापासून उतरत यमुना नदीपर्यंत गेला आहे. या प्रदेशात झाशी,ओर्चा ,पन्ना , लांदा, रेवा अशी लहानमोठी संस्थाने येतात. हा प्रदेश वैराण आणि खडकाळ आहे. त्या कळतो तो दात जंगलांनी व्यापला होता. अनेक डोंगराच्या माथ्यावर बुंदेले आणि मराठ्यांनी भक्कम दुर्ग बांधले होते. पण १८५७ च्या क्रांतीने इंग्रज इतके घाबरले कि त्यांनी त्यातले बरेचसे दुर्ग उद्वस्थ केले.

इतिहास-  या प्रदेशाचे नाव तेतील मूळ बुंदेला जमातीवरून पडले.हि गाधीवळ राजपुतांची जमात होती. कित्तेक दशके त्यांनी मोघालांशी संघर्ष केला. शेवटी जहागीर आणि शहजान च्या  च्या काळात त्यांना नामावण्यात आले.स्तानिक राजांनी मोघालांचे स्वामित्व स्वीकारले. मोघाळणी त्यांना लहान लहान राज्यांचे राजे म्हणून मिरवण्यास परवानगी दिली.

पण मेहवाच्या दऱ्या-खोर्याच्या जाळ्याने भरलेल्या लहानशा संस्थानाचा राजा चंपतरायने आपल्या मुलासह मोघालांचे स्वमित्व्हा मानण्यास नकार दिला. या राजाचा मुलगा होता छत्रसाल! चंपतराय ने तर सरळ सरळ शहजान विरोधातच बंड पुकारले. त्याने मोघलांच्या कित्तेक ठाण्यांवर छापे मारले. मोघल काही स्थानिक मंडलिक राज्यांच्या मदतीने ते चंपतराय ला संपवायचे ठरवले पण चंपतराय ने त्यांना दाद लागून दिली नाही अश्या प्रकारे कितेक वर्ष युद्ध केल्यानंतर चंपतराय ने मोघालांशी संधान साधले.

चंपतराय ला दिल्लीत बोलावून शाही चाकरीत घेण्यात आले. 1656 च्या अफगाणिस्थानातील कंधार वेढ्यातला तो एक प्रमुख सेनापती होता. पण नंतर फितुरीच्या आरोपावरून त्याला त्याची जहागिरी काढून घेण्यात आली. तो परत बंडाच्या मार्गाला लागला. अखेर त्याला विश्वासघात करून मारण्यात आले. त्याची पत्नी त्याच्या मदतीला आली तिलाही मारण्यात आले. त्या वेळी छत्रसाल केवळ ११ वर्षाचा होता त्याला ३ वडील भाऊ होते पुढे त्यांचे काय झाले याची इतिहासात नोंद नाही आहे.

छत्रसाल-एखाद्या ढाण्यावाघासारखा तो ताकदवान आणि तेवढाच शूर होता.तो एक कुशल घोडेस्वार होता. घोड्यावरून खेळला जाणारा पोलो  या खेळात तो निष्णांत होता. चंपतराय च्या मृत्युनंतर हा मिर्झाराजे  जयसिंग याच्या सैन्यात गेला. हो हाच मिर्जराजे जयसिग जो दक्षिणेस शिवाजी महाराज्याना संपवायला आला होता.

पुरंदरच्या वेढ्यात हा दिलेरखानाच्या हाताखाली १००० सैन्याची तुकडी घेऊन सोबत होता. पण दिलेर खानकडून मिळालेली तुच्छतेच्या वागणुकीला कंटाळला होता.त्याला शिवाजी महाराज्यांनी आदिल शहा आणि निजाम शहा यांच्या नाकावर टिच्चून शून्यातून उभे केलेले स्वराज्य त्याने पहिले तो इतका भरवला कि त्याला स्वत बादशहा कडे नोकरी करण्याची लाज वाटू लागली. त्याच्या मनात पुंन्हा स्वातंत्राची आग धग - धागु लागली.

शिवाजी राज्यांशी भेट- एका भल्या पहाटे तो आपल्या पत्नीला आणि आपल्या विश्वासू सहकार्यांना घेवून मोघलांच्या छावणीतून निघाला.तो थेट शिहगडाच्या पायथ्याशी आला. त्याने महाराज्यांची भेट घेतली. "तुम्ही आमच्या स्वतंत्र होण्याची आशा आहात. म्हणून सारा मुलुख पालथा घालून इकडे आलो आहे. मला तुमच्या बाजूने लढण्याची संधी द्या."

महाराज्यांनी शांत बसून त्याच्याकडे पहिले त्याची तळमळ. त्याचे साहस त्यांना आवडले. ते त्याला म्हणाले " माझ्या शूर मित्रा तुझ्या शत्रूंना नामव त्यांच्यावर विजय मिळव. मी माझ्या तलवारीने मोघालाना पाणी पाजले नमवले. तू तुझ्या प्रदेशात जा तिथे त्यांची धूळ दान कर मोघल अनेक ठिकाणी लढा देवू नाही शकत. आपण वेग वेगळे लढून त्यांना शह देवू शकतो. शत्रू तुझ्या किवा माझ्या मुलखात असताना आपण दोघे त्याचे लक्ष विभागून टाकू."

महाराज्यांचा उपदेश घेवून छत्रसाल आपल्या प्रदेशात आला. त्या वेळी तो फक्त २१ वर्षाचाच होता. तेव्हा त्याच्याकडे फक्त ५ घोडेस्वार आणि २५ पायदळ आणि रिकामा खजाना एवढेच होते. त्याने परत सार्या संस्थानिकांना  एकत्र करायला सुरुवात केली. बुन्देल्खान्दाची जनता तशीही औरंगजेबाच्या धर्म विरोधी कारवायांनी त्रस्त झाली होती.शुभाकर्ण,वीर बलदेव आणि बिच्चू हि येवून छत्रसाल ला मिळाला इतकेच नव्हे तर एक बाकीरखान  नावाचा अफगाण बंडखोर हि त्यांना सामील झाला. पुढील २० वर्षात छत्रसाल इतका बलाढ्य झाला कि औरंगजेब ने पाठवलेल्या सार्या सरदाराना त्याने धूळ चारली.

१७२० साली सय्यद बंधूंच्या ऱ्हासानंतर महमदशहा गादीवर आला. या वेळी छत्रसाल ७० च्या पुढे पोचला होता. महमदशाने आपला सेनापती बंगश ला छत्रसाल चा पूर्ण बिमोड करायला पाठवले.१७२१ च्या मी महिन्यात त्याने दिलेर खानच्या नेतृत्व्हाखाली एक फौज पाठवली पण छत्रसाल ने त्याचा धुव्वा उडवला. मग बंगश स्वत्त चालून आला. म्हातार्या छत्रसाल ने त्याला अशी काही झुंज दिली कि बंगाशाला आपली मोहीम ६ महिन्यासाठी मागे घ्यावी लागली. छत्रसाल ने त्याचा फायदा घेत पाटण्या पर्यंत मुसंडी मारली.

त्यानंतर ६ वर्ष मोघल सत्ता छत्रसाल च्या वाट्याला गेली नाही. १७२७ साली पुन्हा  बंकाश छत्रसाल वर चालून आला पण यावेळी त्याने मोठा फौज फाटा जमवला. किल्ल्यावरील तोफा काढून त्या मोहिमेत वापरल्या. त्याने सारा बुंदेलखंड व्यापला छत्रसाल च्या गाभ्यावरच घात केला. तुंबळ युद्ध झाले दोन्हीकडे मोठी हानी झाली. छत्रसाल ला किल्ला सोडून जैतापूर जवळच्या जंगलाचा आधार घ्यावा लागला.

बाजीराव च्या मराठी फौजेचे बुंदेलखंडात आगमन -हे युद्ध १७२७ च्या जानेवारीपासून १७२८ पर्यंत सलग चालले. ८० वर्षाचा छत्रसाल स्वत तलवार घेवून लढत होता हे कोणाला सांगितले तरी खरे वाटणार नाही. आता बंगश ने जैतापुरला वेढा दिला. आता हताश छत्रसाल ला शिवाजी महाराज्यांनी मदत करायचे आश्वासन अचानक आठवले. त्याने पुण्याला एक पत्र पाठवून शिवाजी महाराज्यांनी आपल्याला ६० वर्ष्या पूर्वी दिलेले आश्वासन बाजीरावाला आठवण करून दिले. बाजीराव या वेळी जेवत होते. ते तसेच ताटावरून उठले. वाढप्याने कारण विचारातच बाजीराव म्हणाले "जर माझ्या जेवणाचा उशीर छत्रसाल च्या पराभवाचे कारण बनले तर शिवाजी महाराज मला कधीच माफ करणार नाहीत."

छत्रसाल ने असे काय लिहिले होते पत्रात? ते पत्र दोह्याच्या स्वरुपात होते. त्याचा संदर्भ देण्याचा मोह मलाही आवरला नाही
जो गती ग्राह गाजेन्द्रकी सो गत भाई है आज, बाजी जात बुंदेल कि , रखो बाजी लाज |(मी गजेंद्र आज दुर्दैवाने बंगश च्या सापळ्यात सापडलो असून तू विष्णू प्रमाणे धावत येवून माझे रक्षण कर.)

बाजीराव अजिबात विलंब न करता ३० मार्च १७२९ ला जैतापूर ला पोचले. २४ महिने खडतर प्रदेश आणि जंगलात युद्ध करून बंगश ची फौज थकली होती. शिवाय छत्रसाल चा पाडाव झाला होता फक्त त्याकला ताब्यात घ्यायची होती अश्या भ्रमात बंगश होता त्याने छत्रसाल च्या नातवाना आणि मुलांना आपल्या कैदेत ठेवले होते पण एका रात्री अचानक त्यांनी शस्त्र मिळवून पहारेकर्यांना कापून बाजीरावाच्या सैन्याला येवून मिळाले. त्यांनी बाजीरावाला बंगश च्या सैन्याची पूर्ण माहिती दिली. इकडे बाजीत्रावाचे सैन्य २५ मैला पर्यंत येई पर्यंत बंगश ला समजले सुद्धा नाही.बाजीराव च्या गतीचा त्याला स्वप्नातही माग लागला नाही. बाजीरावांनी बंगश ला असा मार दिला कि तो जैतापूर च्या किल्ल्यात लपला.मग बाजीरावाने किल्ल्याला वेढा दिला. बाजीरावांचा हाताखाली असणारे मल्हार राव होळकर , पिलाजी जाधव. दावलजी सोमवंशी, वित्तल विन्चुकर यांनी बंगश ला कोणत्याही प्रकारची रसद मिळणार नाही याची खबरदारी घेतली.  अन्नासाठी दही दशा झालेला बंगश याने तोफा ओढणारे  बैल आणि घोडे कापून खाल्ले.

बंगश ची सोडवूणूक करण्यासाठी त्याचा मुलगा   ३० हजार फौज घेऊन आला पण मराठ्यांच्या पुढ्यात त्याचा निभाव लागला नाही. पावसाळ्याची वेळ झाली मराठे परत जाण्याची वेळ झाली. छत्रसाल ने बंगश ला काही अटी  घालून सोडून देण्यात शहाणपण समजले.

छत्रसाल मोठ्या थाटात परत राजधानीत आला.छत्रसाल ने आपल्या राज्याचा  तिसरा हिस्सा  बाजीरावांना दिला. बाजीरावांनी तो रीतसर शाहू महाराज्याना दिला. छत्रसाल बाजीरावाच्या पराक्रमावर इतका भाळला कि त्याने आपली सुंदर मुलगी मस्तानी त्याला दिली .पण ती मुसलमान होती याचा कुठेही पुरावा नाही. मग तिच्याबद्दल पेशवे घराण्यात 'यावनी ' का म्हणत हेच समाजात नाही.

बाजीराव १७२९ च्या दरम्यान परत पुण्याला आला त्याने त्या अगोदर गोविंदराव खेर ( बुंदेले) यांना मुलखाची व्यवस्था पाहण्यासाठी ठेवले. पुढे  १७३१ साली छत्रसाल मृत्यू पावला. त्याच्या मुलांनी हरदेव राय आणि जगत राय यांनी बाकीचे राज्य वाटून घेतले. पुढे या दोघांनी बाजीरावासोबत अनेक मोहिमेत भाग घेतला.

4 comments:

  1. भावा मस्तानी मुस्लिम होती . जय राजपुताना .
    ठाकूर रोहन सिंग तोमर

    ReplyDelete