Sunday 27 May 2012

शंभू महाराज्यांच्या मृत्यूचा बदला पूर्ण झाला

   
पन्हाळ्याहून  राजाराम महाराज सुखरूप निसटले आणि शेख निजाम हादरला. आता आपण पातशहा ला काय जवाब देणारा काही झाले तरी राजाराम ला पकडयाचेच 'जिंदा या मुर्दा.' त्याने पाठलागाची जोरदार तयारी चालवली. हि बातमी संताजीला लागली.

याच शेख निजामाने गणोजी शिर्क्याच्या मदतीने शंभू महाराज्याना दगा करून पकडले. तसेच आपल्या पित्याच्या आणि शंभू राज्यांच्या मृत्यूचा बदला हि घ्यायचा बाकी आहे. संधी चांगली आहे. याला जिता सोडायचा नाही असे संताजीने मनोमन ठरवले.

निजामाला सामोरा समोर अंगावर घेणे कठीण !सैन्याबालाने तो आपल्यापेक्षा भारी. पण काही झाले तरी त्याचा कोथळा काढायचाच मग त्यासाठी वाट्टेल ते करायचे  असे मनोमन ठरवून  संताजीने आपली युद्धनीती ठरवली.

पन्हाळा ते कोल्हापूर या भागात तुरळक डोंगर पसरलेले झाडीही दाट संताजीने आपली फौज या झाडीत आणून ठेवली. विठोजी चव्हाण, मकाजी देवकाते , बाबुसाहेब पवार, रखमाजी मोहिते, शितोळे, महादजी नारायण या आपल्या प्रमुख सरदाराना त्यांनी कामगिरी वाटून दिल्या.पुत्र रानोजीला त्यांनी आपल्या सोबत ठेवले.

कोल्हापूरच्या  तीन कोसाच्या   अंतरावर आपले सारे सैन्य ठेवून हजारभर सैन्य घेवून संताजी मोघली सैन्याच्या तळाकडे निघाले. " कशाला हा वाढाचार दाजी सरळ चाल करून मोघलांचा फडशा पाडू " सोबत असलेला रखमाजी शिन्तोले म्हणाला .
" नाही रखमा, लढाईत फक्त मारायचे किवा मारायचे नसते. लढाई डोक्याने खेळायची असते. आपली ताकद राखून गनिमाला गाडायचे असे शिवाजी राजांनी आपल्याला शिकवले." संताजी." मग तुम्ही राहा कि मागे डोके लढवत मी  आणि विठोजी जाऊन डाव साधतो." रखमा."त्यामुळे डाव साधणार  नाही. " संताजी." कसे काय ?" रखमा गोंधळून म्हणाला.
" बादशहाचे कळस आपण सार्यांनी कापून आणले पण नाव कुणाचे झाले?" संताजी."तुमचे ""बरोबर कि नाही , संताजी म्हटले कि सारी मोघाल्शाही झोपेतून खडबडून जागी होते.कल्पना करा काही मोजक्या राऊत घेऊन संताजी आपल्यावर चाल करून येत आहे हे समजल्यावर शेख निजाम काय करील?" संताजी.
"चवताळून तुमच्यावर चालून येईल."रखमा " छे गड्या चवताळून नाही खुश होऊन येईल. " संताजी "खुश का होईल?" रखमा "अरे शंभू राजांना धरल्याने नाव मोठे झाले आहे त्याचे. मग संताजीला पकडून देवून बादशहाची  आणखी मर्जी साधण्याचा मोका तो कसा सोडेल ? मलाही हेच हवे आहे त्याला लढवत आपल्या तळआहे तिथे न्यायचे आणि फडशा पडायचा हि माझी सरळ रणनीती आहे." संताजी.
हल्ला -
मध्यरात्र उलटली . संताजी भल्या पहाटे  मोघलांच्या  छावणी जवळ आले बारीक पावसाच्या सारी कोसळत होत्या. आजू बाजूला उसाचे रान होते ढग दाटून आल्याने लक्ख काळोख होता. संताजीने तिन्ही दिशेने आपले सैन्य मोघलांच्या छावणीत घुसवले. एकाच कापा कापी सुरु झाली .झोपलेले मेंधारागत कापले गेले.

निजामाला हा हल्ला अपेक्षित नव्हता. त्याला फक्त राजाराम महाराज्यांची पाठलाग करायची हेच डोक्यात होते. त्यासाठी तो जय्याद तयारी करत होता. घोड्यावर बसून तो खानेआलामच्या तंबू जवळ आला. त्याने त्याला पुढे जा मी मागून येतो असे सांगितले. (खानेआलाम हा निजामाचा मुलगा याचे खरे नवा इखालास खान. यानेच शंभू राजांना खेचत आणून बादशहाच्या पुढ्यात टाकले होते म्हणून औरंगजेब ने याला खानेआलाम हा किताब दिला होता.)

खानेआलाम संताजीचा बंदोबस्त करायला निघाला. त्याला येताना पाहून संताजी तेथून आपल्या साथीदारांना घेवून निसटले. ते थोड्या लांब जाऊन थांबले. सारे मराठा काही अंतरावर एकत्र येताना खानेआलाम ने पहिले. ते संखेने जास्त नव्हते. तेम्भ्याचा उजेडात संताजीला सूचना देताना पाहून खानेआलाम हसला " सालोंको लढाई का  ताजुर्भा हि नाही है  तोफोसे भून डालो सबको" पण पाठलागाच्या भरात आपण तोफा आणायचे विसरलो हे तो विसरला. एका सैनिकाने याची जाणीव  करून दिली . पिच्छा करो उनका "
" सांभाळून खान साहेब , संताजी हाय तो संताजी घोरपडे! " कान्होजी शिर्के आपला घोडा जवळ आणत म्हणाला.इतक्यात निजाम सार्या तयारीनिशी आला. " मराठ्यांना फक्त पळवून लावा पिच्छा मत करणा|" निजाम .
" समोरच्या टेकडीवर संताजी उभा हाय हुजूर " कान्होजी शिर्के म्हणाला." काय? चांगली संधी आहे तुटून पडा मला संताजी घोरपडे हवा आहे जिंदा या मुर्दा!" निजाम खुशीत म्हणाला.

निजाम मराठ्यांचा पाठलाग करू लागला. आणि मराठे पळाले. मोक्याच्या जागी येताच मराठे थांबले आणि लढू लागले हळू हळू झाडीतून त्यांची संख्या वाढू लागली. काय होत आहे हे समजायच्या आत डोंगर कपारीतून बरकंदाज बंदुकीचा मारा करू लागले. निजाम गोंधळाला. झालेला प्रकार त्याच्या लक्षात आला पण आता त्याचा उपयोग नव्हता. छावणी तोफा मागे सुटल्या होत्या. मागून ,पुढून ,डावीकडून, उजवीकडून मराठ्यांनी त्याला घेरले होते. निजाम हादरला आपल्या सैन्याला मागे व्हा अश्या सूचना देवू लागला यामुळे लढणारे सैनिकाच्यात गोंधळ वाढला. लढणारे सैन्य पळू लागले मग सुरु झाली लांडगेतोड !तोवर मराठ्यांची राखीव तुकडी निजामाच्या छावणीवर तुटून पडली. बुनाग्याना पिटून मिळेल ते लुटले तंबू, राहुट्या जाळल्या.इतक्यात कानाचे पडदे फाटतील असे तीन मोठ्या स्पोटाचे आवाज झाले. आपला दारू गोळा मराठ्यांनी पेटवून दिला हे निजामाला समजून चुकले.

१० लढाऊ हत्ती ,३०० उत्तम पैदाशीचे घोडे,खजिना , कापड , वाहतूक करणारे शेकडो बैल , उंट अशी मालमत्ता मराठ्यांच्या हाती पडली. खानेआलाम  वर संताजीचा वीर पुत्र  राणोजी तुटून पडला. बाबाजी भोसल्यांचे भालेस्वार त्याच्या मदतीला होते. तलवारी आणि भाल्याच्या असंख्य जखमांनी खानेआलाम खाली कोसळला. मराठ्यांनी त्याला घेरातच निजामाने हंबरडा फोडला. पोराला वाचावाण्यासती तो घेराव करत मराठ्यांच्यात शिरला. मराठ्यांना मागे रेटून त्याने आपल्या पोराला पालखीत घातला पण आता त्याचा किमोष डोक्यावरून खाली पडला होता. आता पाळी निजामाची होती शंभू राज्यांच्या मृत्यूचा बदला घ्यायला मराठे एकवटले निजामावर सपा सप वार होऊ लागले मराठे त्याला जिवंत पकडण्याची कोशिश करू लागले पण निजामाच्या इतर दोन मुलांनी खानेआलाम आणि निजामाला जीवाची बाजी लावून बाहेर काढले. निजाम सुटला पण कायमचा जायबंदी होऊन आयुष्यात परत त्याने कधी तलवार पकडली नाही. रात्री त्याला स्वप्नात हि संताजी दिसत असे. मराठ्यांचा राजा पकडून देण्याची सजा त्याला मिळाली होती पण इकडे आपण निजामाला मारू शकलो नाही याची खंत संताजीला चाटून गेली.

आपल्या मृत सहकार्यांचे अग्नी संस्कार करून आणि जखमी सैनिकांना औषध पाणी करून संताजी विशाल गडाच्या  वाटेला लागले.

2 comments: