Tuesday 15 May 2012

आदर्श बलिदान - शंभू राजे

              औरंग्याने शंभू राजना कपटाने पकडले आणि त्यांचे हाल हाल करून मारले. हाल हाल करून मारण्यामागे त्याचा एक कपटी कावा होता कि परत या महाराष्ट्राच्या भूमीत कोणी मर्द उभा राहू नये आणि मुघली साम्राज्यापुढे जर कोणी परत मान वर करून पहिली तर त्याने शंभू राज्यांचे मरण पाहून १०० वेळा विचार करावा. पण त्याला माहित नव्हते या मातीत मातीशी धर्माशी इमानी माणसे मरणाला भीत नाहीत शंभू राजे याचा जिता जगता उदाहरण होते. मराठ्यांचा वारस राजाराम महाराज्यांच्या रूपाने जिवंत होता. राज्याला राजा होता पण सारे सरदार फुटले होते सैन्य नाही सेनापती नाही . राज्य चालवायला खजाना नाही आता सारे राज्य संपले आता परत मोघाल्शाही येणार असेच सार्यांना वाटत होते.
                शंभू महाराज्याना ज्या वेळी पकडले त्या वेळी एक वीर तेथे होता वडील म्हलोजी घोरपडे रणांगणात पडलेले त्याने पहिले होते तरी वडिलांच्या मृत्यू बाजूला ठेवून तो आपल्या राजा वाचवा म्हणून आपल्या भावासहित लढत होता. मृत्य काही बोटांच्या अंतरावर होता कवी कलश एक विषारी बाण लागून घोड्यावरून पडले आणि शंभू राजेही आपला घोडा थांबवून त्यांना उचलण्यासाठी थांबले गनीम जवळ आला होता शंभू राजे आता कोणत्याही क्षणी पकडले जाणार होते. इतक्यात त्यांची नजर एका वीरावर गेली तो शंभू राजांना वाचवण्यासाठी वेड्यासारखा लढत होता. शंभू राजांनी हेरले आता काही आपण वाचत नाही त्यांनी त्या वीराला हाक मारली त्या वीराचे नाव होते संताजी ! " संताजी आता आम्ही काही वाचत नाही पण तुझ्यासारखा वीर गमावणे या मातीला परवडणारे नाही तू बहिर्जीला गेवून निघ हि आमची आज्ञा आहे आणि या स्वराज्याचा शेवटचा मावळा शिल्लक असे पर्यंत लढा स्वराज्य वाढवा ते संपू  देवू नका राजारामला गादीवर बसावा.  " शंभू राजांचे शेवटचे वाक्य ते , पण संताजीने ते आपल्या मनात कोरले आणि रायगडावर आले आल्या आल्या येशु बाईनी प्रश्न केला " राजाला दुश्मनांच्या हवाली करून पळालात तुमचे मराठा रक्त आटले का?" एका पत्नीचे आपल्या नवर्याच्या बाजूने असलेले ते वाक्य त्यांच्या जागी दुसरे कोणी असते तरी असेच म्हणाले असते. पण संताजीचे रक्त थंड झाले नव्हते ते आतल्या आत उफाळत होते आणि काही दिवसांनी जेव्हा शंभू महाराज्यांच्या मृत्यूची वार्ता समजल्यावर त्या रक्ताने उसळी घेतली आता थांबायचे नाही आपल्या राजाच्या मृत्यूचा बदला घ्यायचाच हा पण केला आणि केवळ १००० मावळे घेवून बादशहाच्या तंबूत छापा टाकला. बादशहा मरता मरता वाचला पण त्याला मराठे म्हणजे काय याची ओळख राहावी म्हणून तीन सोन्याचे कळस कापून आणले त्या वेळी औरंग्या म्हणाला " मराठे है या खाबिस ? इन्हे मरनेका डर  नाही लागता क्या? " यानंतर संताजीने १४ वर्ष औरंग्याला स्वराज्य संपवू दिला नाही आणि संताजीच्या मृतुनंतर १३ वर्ष मराठ्यांनी तो सांभाळला २७ वर्ष औरंग्या मराठ्यांना मातीत मिळवण्याच्या प्रयत्नात होता आणि शेवटी याच मातीत मिसळून राख झाला हा कामाल  होता शंभू राज्यांच्या स्वाभिमानी मरणाचा त्यातून प्रेरणा घेवून अनेक मराठे निर्माण झाले घडले. आणि यापुढे घडतील ज्या ज्या वेळी या देशावर संकट आले त्या त्या वेळी या महाराष्ट्राच्या मातीने एक नवा वीर दिला आहे. कारण या मातीच्या सापुतांमध्ये एक शिवाजी राजे आणि संभू  राजे वसले. आणि जोपर्यंत जगाचे अस्तित्व्हा असेल तो पर्यंत शंभू राज्यांच्या धर्म अभिमानी मृत्युच्या कथा या देशात सांगितल्या जातील तो पर्यंत क्रांतीची ठिणगी या महाराष्ट्रात पडेल.जय शंभू राजे.

No comments:

Post a Comment