Tuesday 27 December 2011

थोर क्रांतिकारक स्वातंत्र्यनंतर हि उपेक्षितच

               विनायक दामोदर  सावरकर एक वेगळ्याच मातीचा गोळा या गोळ्याला आकार घरातून वडील दामोदर सावरकरांनी दिला. तात्या टोपेंच्या प्रेरणेने देशप्रेमाने भट्टीत भाजून पक्का झाला .आणि देश स्वातंत्र्य करायला हा महान क्रांतिकारक  शत्रूच्या घरात इंग्लंड मध्ये घुसला . वाघाच्या जबड्यात मान  घातली होती. दैव परीक्षा घेत होता. परस्थिती प्रतिकूल होती. पण अजोड वाणी आणि बेजोड लेखणीने शेवटच्या क्षणापर्यंत त्यांची साथ सोडली नाही.
              प्रखर बुद्धिमत्तेची देणगी तर निसर्गाने लहानपणीच बहाल केली होती. बोटीतून इंग्रजांच्या पहाऱ्यातून उडी मारून फ्रांस च्या किनाऱ्यावर जाण्यासाठी वाघाचे काळीज असावे लागते. एक साधारण किरकोळ शरीर यास्ठीचा असणारा एक सामान्य माणसाची दाखल फ्रांस सरकारला घ्यावी लागली फ्रांस ने सावरकरांनी मारलेल्या आपल्या देशाच्या समुद्र किनाऱ्यावर मोठ्ठा सावरकर स्मारक बांधायचे ठरवले आहे.ज्यालामुखी (१८५७ चा स्वातंत्र्य समर ) हे त्यांचे प्रकाशित होण्यापूर्वीच ब्रिटीश सरकारने बंदी घातली. ग्रंथ प्रकाशित होण्यापूर्वीच बंदी घातलेला जगातील पहिला लेखक !
               न्यायालयाने त्यांना २ जन्म ठेपेच्या शिक्षा सुनावल्या तरीही डगमगून न जाता "मी हिंदू आहे त्यामुळे मला पुनर्जन्म वर विश्वास आहे पण ब्रिटीश लोक कधीपासून पुनर्जन्मावर विश्वास ठेवू लागले" असे अंदमानच्या जेलर ला हसून फक्त सांगणारे सावरकर . १९३८ चा काल सावरकरांनी ओळखले आता खूप काल ब्रिटीश सरकार या देशात नाही राहू शकत. त्यांनी  दलितांवर होणारे अन्याय एक ब्राह्मण असूनही निवारण्याचे ठरवले. नजरकैदेत असताना दलितांना रत्नागिरीच्या विठ्ठल मंदिरात प्रवेश देणारे सावरकरच होते. जेव्हा त्यांना समजले प्रत्तेक ठिकाणी जाऊन मंदिर प्रवेश आपण नाही देवू शकत तेव्हा त्यांनी रत्नागिरीत दलितांसाठी पहिले पतित पावन मंदिर बांधले.आणि त्याच्या शंकराचर्य हि दलित बनवला.
खूप लोकांना मी सांगितलेला सावरकरांचा इतिहास माहित असेल पण आज तरीही सांगतो कारण आज आपलीच मराठा लोक संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघ यासारख्या विकृत संगथानंच्या नादाला लागून या महान पुरुषाची बदनामी करत आहेत. सावरकरांनी कधीही जातीभेद केला नाही पण या दोन संगठना ब्राम्हन्द्येश करायचा म्हणून या थोर नेत्याला बदनाम करत आहेत.
                 गुजरात मध्ये भारतातील सर्वात मोठा सावरकरांचा पुतळा आहे पण आमच्या महाराष्ट्र सरकारला त्यांची होणारी बदनामीही थांबवता येत नाही आहे. 'अभिनव भारत ' हि त्यांची स्वातंत्र्य पूर्व काळातील संगठना जी भारताला स्वातंत्र्य देण्याच्या कार्यात मोलाची भूमिका होती अशी संगठना कोणताही आरोप शिद्ध झाला नसताना सुद्धा दहशद वादी म्हणून आपलाच भारत सरकार तिची उपेक्षा करत आहे . मित्रानो सरकार आणि विकृत संगाथानांकडून सावरकरांना न्याय मिळेल याची आशा नाही आहे पण आपल्याकडून अश्या थोर नेत्याची उपेक्षा होऊ नये म्हणून आपण काळजी घेवू या आपण यांना न्याय नसेल देऊ शकत पण बदनामी तर नका करू.
सावरकर फक्त ब्राह्मण आहेत म्हणून त्यांची बदनामी होऊ नये असे मला वाटते.

No comments:

Post a Comment