Saturday 24 December 2011

मी मराठा ...आणि ब्राह्मण हेच आमचे पारंपारिक शत्रू !



                          मराठा जात धर्माला जगणारी, दिलेला शब्द पाळणारी , भगव्यासाठी आपल्या घरा- दारावर तुळशीपत्र ठेवून मारता मारता मरणारी. अशी माझी मराठा जात आजपर्यंत आमचे कित्तेक पूर्वज या वचनाला जागले. शिवरायांच्या एका शब्दावर साऱ्या घरा-दारावर पाणी सोडले. आज मी गर्वाने सांगतो आमच्या पुर्वाजामुळे आज आम्ही हिंदू आहोत नाहीतर, कधीच आम्ही कुठल्यातरी मशिदीत नमाज अदा करत असतो.आज जी परिस्थती आहे आम्ही तलवारी सोडून ब्राह्मण द्येश सुरु केला आहे. आम्ही आमचा खरा शत्रू विसलो आहोत . शिवाजी महाराज्यानी ज्या इंग्रजांना आपल्या स्वराज्यात फिरकू हि दिले नव्हते ते क्रिश्चन आज आम्हाला प्रिय आहेत. आम्हाला मुसलमान आणि क्रिश्चन जवळचे वाटतात पण आपल्याच धर्मातील ब्राह्मण दूरचे वाटतात. कारण ब्राम्हणांनी आम्हाला खूप त्रास दिला आमच्या पूर्वजांना मंदिर प्रवेश नाकारला .कोणत्याही धार्मिक कामात आम्हाला सहभागी करून घेतले नाही म्हणून त्यांची आज असणारी पिढी हि आमची शत्रू !
                   बाजीराव पेशव्यांच्या जोडीला मल्हार राव होळकर मांडीला मांडी लावून लढले ते हि आम्ही विसरलो. बाजीप्रभू देशपांडे यांनी स्वराज्यासाठी दिलेले प्राण आम्ही विसरलो. " तुझा बादशहा आणि तुझी जहागिरी तुला लाख-लाभ होवो "म्हणून दिलेर्खानावर दात ओठ खावून चालून जाणारे मुरारबाजी आम्ही विसरलो. संभाजी राजा विरोधात राजकारण करणाऱ्या  दीड शहाण्या अण्णाजी दत्तो  हा एकटाच ब्राह्मण आम्हाला दिसतो त्याला साथ देणाऱ्या सोयरा बाई आम्हाला माहीतच नाहीत. ब्राम्हणांनी शंभू राज्यांना फसवले तर त्यांच्यासोबत शेवटपर्यंत मारायाताना भोगून मारणारे कवी कुलेशाचे वीर मरण आम्ही का  विसरलो.असे आम्ही आज चे मराठे, ज्यांची तलवार नेहमी म्यान असते पण जीभ नको तो खोटा इतिहास सांगायला पुढे धावते. कारण आम्हाला काही नालायक राजकारण्यांची साथ आहे. एक एक काळी शिवाजी महाराज्यांसोबत एका छोट्याश्या वतनाच्या तुकड्याची आशा न करता आमचे पूर्वज कांदा आणि भाकर पाठीशी बांधून एका पायावर स्वराज्यासाठी बाहेर पडायचे पण आम्ही नालायक राजकारण्यांच्या काही चिल्लर पैस्यापुढे आमचे इमान विकतो आहोत.













            शिवरायांच्या तोंडात दर काही मिनिटाला जगदंबेचा नामघोष असायचा ती जगदंबा आम्हाला नको आहे कारण ती ब्राम्हणांची आहे, आणि आमचे दुर्दैव कि आम्ही शिवाजी महाराज्यांच्या काळात नाही जाम्हलो नाहीतर त्यांना हि बाब नक्की लक्षात आणून दिली असती " राजे, तुमच्या तोंडात जगदंब हा शब्द उच्चारू नका, जगदंबा बामनाची देवी आहे." कदाचित त्यावेळी शिवाजी महाराजांनी आम्हाला कडेलोट केली असती पण नालायक राजकारण्यांनी त्या अगोदरच आम्हाला काही चिल्लर घरपोच केली असती .
        "आम्ही मराठा शिवरायांचे भक्त , वाटेला जाऊ नका नाहीतर कापून टाकू " असे वाक्य प्रत्तेक जनाच्या फेस-बुक वोल वर दिसतो पण आम्हाला शिवाजी महाराज अगोदर समजले आहेत का? अहो आम्ही कधी तलवार कशी असते ती पहिली नाही . फक्त फुशारक्या मारायला काय जाते म्हणा. शिवाजी महाराज्यानी आम्हाला असे शिकवले का छोट्या मोठ्या कारणावरून आपल्याच बांधवाना कापून काढा म्हणून?
          अहो आमच्या मराठ्यांच्या काही संगठना हि आहेत बर का! मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड पण या संगथानाना मराठा लोकांची काही पडली नाही आहे या संगथानातील प्रत्तेक जन स्वत्ताला महात्मा फुले , शाहू महाराज , आणि बाबासाहेब आंबेडकर समजू लागले आहेत. या संगठना मराठा सामाज्याचे हित कसे होईल हे पाहायचे सोडून आम्हाला फक्त सरसकट  ब्राह्मण द्येश कसा करावा  हेच शिकवतात. आमच्यासाठी या फक्त संगठना नाही आहेत मोठी महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयात प्रवेश विनामूल्य आहे हा पण एक अट आहे इथे प्रवेश घेणारा विध्यार्थी ब्राह्मण नसावा. या विद्यालयात तुम्हाला खरा इतिहास सांगायच्या नावाखाली ब्राह्मण द्येश कसा करावा हे शिकवले जाते. आणि या विध्यालायातून बाहेर पडणारा विध्यार्थी हा कट्टर ब्राम्हन्द्येशी असतो .या महाविध्यालायातून बाहेर पडताच त्या विध्यार्थ्याच्या नावापुढे 'शिवश्री' नावाची डिग्री लागते 'शिवश्री' म्हणजे तुम्हाला ब्राम्हणांना शिव्या देण्याचे लायसन आहे. या महाविद्यालयात तुम्हाला अक्षरश शिवी या विषयात तुम्ही PHD करू शकता. असा मी मराठा जो काही चिल्लर साठी आपल्याच धर्मातील एका जातीचा द्येश करतो. यापुढेही करेन आणि प्रत्तेक्षात शिवाजी महाराज जरी समोर येवून म्हणाले हे चुकीचे आहे तरी मी त्यांना सांगेन "मी जे म्हणतो आहे ना ब्राह्मण द्येश करा  तेच खरे आहे. आणि  महाराज, तुम्हाला जर पटत नसेल तर तुम्ही शिद्ध करून दाखवा !" 

7 comments:

  1. आपला उद्देश चांगला आहे, मनात देशाचे भले व्हावे अशी इच्छा आहे हे वाचून कळते. जाती-जातींमध्ये देशाला - हिंदूंना फोडण्याची परंपरा जुनी आहे. यावर आजपर्यंत पाठवलेल्या १४ इ-मेल आपल्याला पाठवायला "खरा विद्रोही" ला आनंद वाटेल. ही माहिती / मजकूर आपण वापरू शकता. realvidrohee@gmail.com ला आपला इमेल आयडी कळवा.

    ReplyDelete
  2. खुप छान लेख आहे. हां आता ही गोष्ट खरी आहे कि प्रत्येक मराठा ब्राह्मण द्वेष करतो असे नाही.तर द्वे्ष कोन करतो जो स्वत: काही प्रगति करु शकत नाही तो. आणखी एक कारण म्हणजे "ब्लोग" काही ब्लोग वर तर नुसते द्वेष मग तो मराठा द्वेष (http://kohamblogger.blogspot.in) असो किंवा ब्राह्मण द्वेष (anita-patil.blogspot.com) यांमुळेच द्वेष वाढ्त जातो. तेव्हा आपले लिखाण त्यांचे तोंड बंद करायला पुरेसे आहे.

    जय शिवराय ! जय जिजाऊ ! जय महाराष्ट्र !

    ReplyDelete
  3. तुमच्यासारख्या विचारी लोकांची आज गरज आहे. लेख अप्रतिम आहे.

    ReplyDelete
  4. द्विजाची कैफियत

    हल्ली मी दहशत वाद्यांच्या विरोधात बोलायचे टाळतो,
    कारण बुरसटलेली विचारसरणी अशी हेटाळणी होईल
    हल्ली मी आंदोलनात भाग घ्यायचे टाळतो,
    कारण आंदोलनाचा पाठिंबा कमी होईल
    हल्ली मी आरक्षणावर बोलायचे टाळतो,
    कारण राजकारणी त्याचा फायदा घेतील
    हल्ली मी समाजसुधारकांचे नाव ही घ्यायचे टाळतो,
    कारण खोटा इतिहास सांगण्याचा खटला होईल
    हल्ली मी टिळक, सावरकरांचे लिखाण वाचणे टाळतो,
    कारण सनातनी विचारांचा शिक्का बसून जाईल
    हल्ली मी सभ्य, सुसंस्कृत पणे बोलणे टाळतो,
    कारण त्याला नपुंसकता समजले जाईल
    हल्ली मी समाजसेवा करण्याचे टाळतो
    कारण त्यातच आमच्या घरांची बरबादी, कुटुंबांची ससेहोलपट झाली
    हल्ली मी आडनाव घ्यायचे टाळतो,
    कारण त्यातून माझी जात ओळखली जाईल
    हल्ली मी चारचौघात विचार मांडणे टाळतो,
    कारण त्यात कुणालाही जातीय कावा दिसतो
    हल्ली मी देशभक्तीच्या घोषणा देणे टाळतो,
    कारण त्यात संघाचा प्रभाव दिसतो
    नाही दादोजींना इमान, रामदासांना चारित्र्य,
    शहिदांची जात येते वृत्तपत्रात मात्र
    हळू बोला,आपल्या जातीचे नाव कुणी घेवू नका,
    कृष्णाजीशिवाय कोणाचाही वारसदार स्वतःला मानू नका
    आम्हाला शिव्या दिल्या शिवाय इतर मागासलेले ठरत नाहीत,
    रात्री पुतळे हलवल्याशिवाय भ्रष्टाचारावरून जनतेचे चित्त हटत नाही
    ही जात इतकी बदनाम कशी,प्रश्न मला पडला आहे,
    जातीयतेच्या राजकारणात सारा देश सारा देश सडला आहे
    जरी म्हटलं या साऱ्या अफवा खोट्या आहेत,
    पण विषमता मिटली तरी आमच्या मनात मोठ्या दऱ्या आहेत
    आमचा जप करून पोट काहींचे भरते यात आनंद आहे,
    शेवटी त्यांच्या कडेही द्यायला शिव्या उरत नाहीत
    आतातर यासाठी विशेष धर्म, संघटना निघाल्या आहेत,
    भावी देशासाठी त्यांच्या आपापल्या घटना निघाल्या आहेत
    त्यांच्या या घटनांमध्ये एका जातीला स्थान नाही,
    म्हणून तिथे कवी कलशाला उल्लेखाचा ही मान नाही
    काय करणार शेवटी ही जातच बदनाम आहे,
    मान वर करून चालण्याची आमची काय बिशाद आहे
    धर्म तोडणार्यांना, सत्ताधीशांना आगीत तेल ओतावे लागते,
    त्यांच्या कडेही दुसरा फायद्याचा उपाय नाही
    वाघ, सिंहाच्या वाटेला कुणी भक्त जातो काय,
    यज्ञात बळी होतो बकरा, राजकारणात कोण होते पाहा,
    धरली तर चावते, सोडली तर पळते अशी ही जात आहे,
    ही तर कट्टरतेची माणुसकी वर मात आहे
    स्वातंत्र्यानंतरही घरे जळाल्यावर आम्ही मागे हटलो आहोत,
    समाजसेवा,परमार्थ करण्याला घाबरू लागलो आहोत
    सोडा आता विचार सारे, पूर्वजांच्या चुका पुन्हा करू नका,
    अहंगंडाच्या कोशात राहून वाट वाकडी धरू नका
    जिभेवर असली सरस्वती तरी सत्य बोलावत नाही,
    मानाने जगण्याचा हक्क ही आम्ही मागत नाही
    आम्हाला आदर न दिल्याने समाज कुठे चालला आहे,
    शिक्षणात पावित्र्य, समाजात नैतिकता, राजकारणात सौजन्याची ऐशी तैशी,
    जीवनात रामापेक्षा दामाची जागा झाली मोठी
    द्वेषाला द्वेषाने आम्ही उत्तर देत नाही,
    द्वेषाचा धंदा करणार्यांचे दुकान बंद होत नाही
    वोट बँक बनवल्याशिवाय प्रश्न कधी सुटणार नाहीत,
    पैसा, सत्ता आल्याशिवाय समाजाला तुम्ही चांगले वाटणार नाहीत
    शेंडी आणि जानव्याची ताकद अजून कमी झालेली नाही,
    हार मानण्याइतकी परिस्थिती हाताबाहेर गेली नाही
    सोडून सारे न्यूनगंड,हताशा, वर्तमानात जगूया,
    गेली संकटे, झाल्या चुका, बदलण्याची वेळ आहे.
    हिम्मतीने जगण्याचा हा काळ आहे.
    उज्ज्वल भवितव्य घडवायचे आहे,
    यश खेचून आणायचे आहे
    होऊन गेला भूतकाळ, भविष्य बाकी आहे,
    द्वेष कुणीही करो, राम आमच्या पाठीशी आहे

    - कवी योगेश

    ReplyDelete
  5. Replies
    1. Prashant , I really appreciate your thinking .. It seems that you are very matured person and well thinker. Keep it up. Such matured personality can only lead to nation well.

      Delete
  6. Good keep writing such a fact full things which open eyes of peoples which are under wrong impression created by their surrounding people

    ReplyDelete