Thursday 22 December 2011

लोकपाल बिल ....लोकांच्या तोंडाला पुसली पाने !

आज लालूचा भाषण ऐकलात का लोकपाल बिल विषयी म्हणे "जर प्रधान मंत्री जर लोकापालाच्या कक्षेत आले तर कोणीही उठेल आणि प्रधानमंत्री वर आरोप करेल त्यांना न्यायालयात खेचेल मग आमचा प्रधानमंत्री विदेशात जाईल मग तेथील कोणीही म्हणेल अरे हा तर हिंदुस्थानचा भ्रष्ट्र प्रधानमंत्री आहे याला यार जेल होणार आहे मग विदेशी लोकांच्या दृष्टीने आपल्या देशाची प्रतिमा काय होईल ?" हे आहे लालू चे विधान !
              मला वाटते आज काल लालू ला प्रधानमंत्री बनायचे स्वप्न पडत आहेत किवा लोकपाल ला विरोध करून आपली कातडी वाचवू पहात आहे. अरे लालू तुला जर थोडी अक्कल असती तर समजले असते देशातली जनता वेडी नाही आहे किवा रिकामटेकडी नाही आहे उठ सुट प्रधानमंत्रीला लोकपाल न्यायालयात खेचायला. या देशातल्या लोकांना तुझ्यासारखे ठेकेदाराकडून लाच येत नाही त्यांना आपल्या पोटासाठी मेहनत करावी लागते. आणि तुला जर प्रधानमंत्री चा एवढा कळवळा येत असेल ना तर विचार त्या गरीब लोकांना जे हातावर कमावून पोटाला खातात टी लोक जेव्हा एखादी वस्तू खरेदी करायला जातात तेव्हाच त्याच्या किशातून व्याट कापलेला असतो, विचार त्या लोकांना जे महिन्याचा पगारही मिलान्यागोदर त्याचा टँक्स कापलेला असतो. आणि हा पैसा तुमच्या किशात बिनबोभाट जातो. 
            हि झाली लालू ची चालबाजी आता जरा कॉंग्रेस कडे जाऊ या कोंग्रेस म्हणत आहे आम्ही हा सक्षम बिल पास करत आहोत अरे घन्त्याचा सक्षम बिल या बिल मध्ये असा कोणताच मुद्दा सक्षम दिसत नाही. एखाद्या कंपनी ने घोटाळा केल्यास तिला दंड ठोठावण्याची तरतूद यात नाही. तसेच एखादा सरकारी अधिकारी यात दोषी आढळला तर त्याला नोकरीवरून काढून टाकण्याचा अधिकार फक्त त्या खात्याशी संबंधित मंत्र्याला दिला आहे
अहो ९५ % प्रकरणात हि लोक मंत्र्यांना आपल्या खात्यातील हप्ते पुरवत असतात मग अश्या लोकांविरुद्ध आमचे सज्जन मंत्री कारवाई करतील का? 
             हा लोकपाल पास होऊ नये आणि फक्त गोंधळ वाढवा म्हणून कॉंग्रेस ने अजून एक नवीन चाल चालली त्यात अल्प संख्याकाना ५०% आरक्षण द्यावे असा मुद्दा आणला. अहो इथे भ्रष्टाचाराच्या मुद्द्यात आरक्षणाचा मुद्दा कुठून आला भाई ? म्हणजेच लोकांना आणि संसदेला गोंधळात टाकून लोकांना फसवून वेळ काढायचा आणि नंतर तो संसदेत पास नाही झाला म्हणून कोपऱ्यातील केराची टोपली दाखवायची ही या नालायक कोंग्रेस ची नीती
शेवटी काय लोकांच्या तोंडाला पाने पुसायची हीच सरकारची नीती 

No comments:

Post a Comment