Monday 19 December 2011

मुंबई आमच्या बापाची पण बेळगाव सावत्र आईचा .......!

             आज काही नालायक राजकारणी बेळगावातील लोकांच्या जखमेवर मीठ चोळत आहेत. स्वतान्त्यापासून बेळगाव आणि सीमा भागात मराठी माणूस उपेक्षित आहे. इकडे कुत्र्याला किंमत पण मराठी माणसाला माणसाला इथे कवडीची किंमत नाही आहे. कुत्र्याचे जगणे नशिबी आहे मराठी माणसाच्या जीवनात!
          इथे स्वत्ताला हिंदुत्वादी म्हणवणारे भाजप मुग गिळून गप्प बसले आहे आणि या भाजप पक्षाकडून आम्ही अखंड हिंदू राष्ट्र बनवण्याच्या अपेक्षा करणे म्हणजे माकडाच्या हातात कोलीत देणे होय ! राजकीय फायदा उठवण्यासाठी अजून किती काल गरीब जनतेला वेठीला धरणार आहात? स्वत्ताला माराठा ह्रिदय सम्राट म्हणणारा राज ठाकरे यांनी तर आज हद्दच केली बेळगावातील मराठी जनतेला आज आधाराची गरज होती. मुंबईतून भय्ये लोकांना पळवणारी मनसे बेळगावात आपला सारा फौज फाटा घेवून कधी उतरते याकडे साऱ्या महाराष्ट्राचे डोळे लागले होते. जसे टिपू सुलतानाच्या अत्याचाराला कंटाळून हैद्राबाद मधील हिंदू मराठ्यांच्या आगमनाची अगदी चातकाप्रमाणे वाट पहात होती. पेशवे येतील आणि आपल्याला या नरक यातानातून सुटका करतील अशी भोळी आशा तेथील गरीब हिंदू जनतेची होती.
           मराठे आले नराधम टीपुला पेशव्यांनी त्याच्या कबरीत कायमची  पाठवली. आणि टिपूच्या नरक यातना मधून सुटका केली.आज हीच अपेक्षा शिव सेना आणि राज सेना यांच्याकडून होती. शिवसेना प्रमुख आपल्या शब्दाला जागून हा लढा चालू  हि ठेवला आहे. पण काही कारण नसताना फक्त राजकीय विरोध करायचा म्हणून राज सेनेने गेले अनेक वर्ष नरक यातना सहन करत असलेल्या गरीब जनतेच्या जखमेवर मलम लावायचा सोडून मीठ चोळले. राज ठाकरेंना वाटले आज आपण खूप मोठा तीर मारला पण लक्षात ठेवा जसा मराठी माणूस तुम्हाला डोक्यावर बसवू शकतो तोच मराठी माणूस रस्त्यावरही बसवू शकतो. अजून वेळ आहे तुमच्या राजकारणात गरीब भोळ्या जनतेला पायाखाली तुडवू नका.
          तरुणांना विचारा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणे कोणाला आवडणार नाही .येवू नये म्हणणारा कदाचित कोणी नसेल . तुमचे घरगुती वाद तुमच्या घरात ठेवा त्यात मराठी माणसाची बळी देवू नका वरील पोस्त मी मनसे विरोधी आहे किवा शिवसैनिक आहे असे मुळीच समजू नये मी एक सच्चा मराठी आहे.  शिव सेना आणि मनसे वादात मराठी माणूस भरडला जात आहे .आपल्याच माणसाकडून आपल्याच माणसांवर होणारे दुख पहिले जात नाहीत म्हणून लिहितो बाकी काय सांगावे आपण सुज्ञ आहातच  

No comments:

Post a Comment