Sunday 27 November 2011

माझे तात्यारावांच्या चरणी एक पत्र .



कै.हिंदू क्रांतीसुर्य स्वातंत्र्य वीर सावरकरांस,
माझे स्राष्ठांग दंडवत .
           मी तुमच्याबद्दल शालेय पाठ्यपुस्तकात वाचले होते पण आज तुमच्या लेखनाची प्रचीती आली साक्षात सरस्वती तुमच्यावर या कलीयुगात प्रसन्न झाली असावी असे मला वाटले. ज्याला गणेश वाणी सोबत लेखणीची बेजोड ताकद असलेले साक्षात देवाचे अवतार पुस्तक रूपी आपल्या सोबत बोलत आहेत कि काय असा भास आपले पुस्तक वाचताना मला होतो.
        तात्या हिंदुच्या देवाने प्रत्तेक वेळी हिंदूंचाच घात केला हो ते मग १८५७ राष्ट्रीय उठाव  असो किवा पानिपत चे युद्ध असो देवाने आपल्या नशिबी अपयशच दिले. पण त्या अपयशावर मात करण्यासाठी तुमच्यासारखे योद्धे हि दिले पण जे हिंदू भगवान रामाला समजू शकले नाही ते तुम्हाला समजून घेतील हि आशा कारणेच मला अतिशयोक्ती वाटते.मला दुखः वाटते मी तुमच्या काळी जन्मला का नाही आलो. तुमच्या पायाला हात लावायचे भाग्य मला लाभले नाही पण तुमचे  अखंड हिंदू राष्ट्र घडवण्याचे स्वप्न मी पूर्ण करायचे स्वप्न मीही पहात आहे.
       कदाचित मी निवडलेला मार्ग काही लोकांना मुर्खपणा वाटेल. पण त्यांना हिंदू म्हणजे काय हे नाही समजले तरी त्याच्या पुढच्या पिढीला नक्की समजेल कारण जेव्हा माणसाच्या अस्तित्व्हावर कुरड कोसळते तेव्हा माणसाला आपण काय आहोत हे समजते आणि माणसाचे अस्तिव म्हणजे धर्म असतो जो समाजात जगायला शिकवतो. आणि या देशात हिंदू अस्तित्वर येणारे संकट या लोकांना दिसत नाही आहे.कोणी मला कदाचित माथेफिरू किवा लोकांच्या भावना भडकावणारा वेडा ठरवेल मला त्याची पर्वा नाही मी आयुष्यात तुमच्या शिकवणुकीवर चालायचे ठरवले आहे. तुमच्या हिंदुत्वादी वाङ्मयाची जगात तोड नाही त्यामुळे आपले आभार मानावेत तेवढे थोडे !तुमचे विचार मी देशातील प्रत्तेक हिंदू पर्यंत पोचवण्याचे प्रयत्न करेन कदाचित माझे प्रयत्न तोकडे पडतील पण माझी हिंदुत्वाची धुरा सांभाळून ती पुढे नेणारा एक तरी सच्चा हिंदू नक्की घडवेन.
     यात अपयश पचवता यावेत   म्हणून तुमच्याकडून फक्त आशीर्वादाची अपेक्षा आहे. आणि ते माझ्या पाठीशी आहेत हे समजून मी काम चालू केले आहे
तुमचा आणि फक्त तुमचाच ,
एक हिंदू धर्मसेवक,
प्रशांत शिगवण.

No comments:

Post a Comment