Friday 21 October 2011

संस्कार

मि lg कंपनीत asसर्विस इंजिनिअर म्हणून lcd ,plazma दिपार्टमेंट मध्दे जवळ जवळ ३ वर्ष काम करतो आहे. मला आज एक नवीन अनुभव आला.
एक lcdरिपेरिंग करायला मला एक पत्ता देण्यात आला. मि आणि माझा हेल्पर मोटार बाईक वरुण त्या customarच्या घरी जायला निघालो.पण त्या customar चा घर एका झोपड पट्टीत होता ती झोपडपट्टी जी अनधिकृत पद्धतीने बांधलेली होती. तिला व्यवस्तीत दरवाजा हि नवता. भिंती प्लास्टिक च्या कागदाच्या होत्या आणि त्या प्लास्टिक ला आधार देण्यासाठी आतून बांबू लावले होते. सगळीकडे अशीच झोपडपट्टी पसरलेली होती.
मि वाटेत जाताना माझ्या हेल्पर ला म्हणालो "अमित ,अशी माणसेही ३० हजाराचा tv घेवू शकतात?" "सर् ,नाही हो कुणाच्या तरी घरातून चोरून आणली असेल त्याने, तुमच्या गळ्यातील चैन काढून ठेवा नाहीतर ती हि चोरातील हि लोक" हेल्पर असे म्हणताच मि माझ्या गळ्यातील चैन काढून ठेवली. थोडा मनातून घाबरलो हि होतो. थोड्या वेळाने त्या customarचे घर आले आम्ही घरात गेलो.त्या customarने पाणी आणून दिला. हेल्पर ने tv काढून खोलू लागला त्यावर तो customar म्हणाला "साहेब थांबा ,माझा नातू थंडा आणायला गेला आहे. थंडा प्या आणि नंतर कामाला सुरवात करा."
तेवढ्यात त्याचा नातू थंडा घेवून आला. आम्ही थंडा पिवून tv खोलला. मि त्याला कोणता पार्ट खराब आहे आणि त्याला किती खर्च आहे ते सांगितले. त्यावर तो  customar म्हणाला "साहेब एक वर्ष्याची वोरंती आहे ना? माझ्याकडे बिल आहे." customarमि माझ्या हेल्पर कडे पहिले ,त्याने आपली मन खाली घातली. जो हेल्पर tv चोरीची असावी म्हणत होता त्याला सणसणीत चपराक होती.आम्ही lcdरिपेअर करून निघू लागताच त्या customar ने १०० नोट काढून माझ्या किस्यात टाकली . आणि जेवून जाण्याचा आग्रह करू लागला.मि आताच जेवून आलो सांगून ती १०० ची नोट हेल्पर ला दिली आणि तेथून निघालो.बाहेर येताच हेल्पर मला म्हणाला "सर गरीब माणसालाच देव मोठा मन देतो पहा ना आपण करोडपती लोकांच्या घरात जावून lcdरिपेअर केल्या आहेत पण घरात गेल्या गेल्या कंपनीच्या नावाचे वूद्धार करणारे लोक आणि पाणीही न विचारता किती वेळात काम होईल असे विचारणारे लोक कुठे आणि सध्या झोपडीत राहून आदरातीत्या करणारे लोक कुठे?
मि बाईक ला किक मारत विचार करू लागलो खरे संस्कार झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांमध्ये असतात कि मोठ मोठ्या टॉवर मध्ये राहून स्वत्ताला सु संस्कृत म्हणून बापाच्या बाजूला बसून दारू पिणाऱ्या लोकांमध्ये असते !

No comments:

Post a Comment