Friday 21 October 2011

माझी बाबासाहेब पुरंदरे शी झालेली अस्मार्नीय भेट!



माझ्या फेस बुक acc वरील माझा बाबासाहेब पुरंदरे यांच्या सोबतचा फोटो पाहून अनेक माझे शिवप्रेमी मला चात्तिंग किवा फोन करून विचारतात बाबासाहेबांशी आपली भेट कशी झाली. त्या माझ्या शिवप्रेमी मित्रांसाठी मि त्या भेटीची माहिती देत आहे.हो तो एक योगा योगाच होता.मला काही महिन्यापूर्वी फेस बुक कर अजय नाईक नावाचे हिंदुत्वादी मित्र भेटले तेही मी राहतो त्या विरार मधलेच निघाले आम्ही दोघांनी हिंदू धर्मासाठी काहीतरी धर्म सेवा करायची असे ठरवले. दोघांचे विचार जुळले आणि एक दिवस अजय नाईक यांचा रात्री मला फोन आला "प्रशांत उदया बाबासाहेब पुरंदरे यांचा ९० वा वाढ दिवस आहे आम्ही मित्र मित्र जाणार आहोत पुण्याला तुला यायला जमेल का?"मी क्षणाची वेळ न लावता होकार दिला . सकाळी ५ वाजता आम्ही  गादी करून पुण्याला निघालो वाटेत निसर्गरम्य वातावरण पाहत काही तांत्रिक अडचणीचा सामना करत पुण्यात पोचलो मनात हुर हुर होती बाबासाहेब आमची भेट घेतील कि नाही ?आम्हाला त्याच्या पायाला हात लावायची संधी मिळेल कि नाही ? साधारण ११ वाजता आम्ही पुण्याला बाबासाहेब पुरांदारेन्च्या पार्वती च्या निवास्थानी पोचलो. लोकांची रिघ लागली होती काही पत्रकार हि आले होते आम्ही आतमध्ये गेलो बाबासाहेब सर्वांचे अभिनंदन स्वीकारत होते आम्ही सर्वानी पुष्प गुच्छ घेतले आणि रांगेत जावून पाया पाडून फोटो काढू लागलो सर्वात शेवटी माझी पाळी होती मी त्याच्या पायाला हात लावून नमस्कार केला येवढा वेण मोजकेच बोलणाऱ्या बाबासाहेबांनी मला विचारले "नाव काय तुझे बाळा"" प्रशांत " मी "आयुस्य्वंत हो " बाबासाहेब  असे म्हणाले आणि त्यांनी आपला हात माझ्या पाठीवर ठेवला आणि त्याच शनी माझ्या मित्राने बरोबर माझा फोटो काढला.बाबासाहेबांचा तो हात माझ्या पाठीवर आला आणि असे वाटले शिव प्रतिमेतील शिवाजी महाराज माझ्याकडे पाहून मंद हसले असा मला भास झाला खरेच तो दिवस माझ्या आयुष्यात घर करून गेला. मला माझ्या वर विश्वासच बसत नवता चक्क बाबासाहेब पुरंदरे यांचा हात माझ्या पाठीवर होता. हो तेच बाबासाहेब ज्यांनी शिवाजी महाराज्यांच्या कार्यासाठी आपले सारे आयुष्य अर्पण केले. आणि बाबासाहेब पुरंदरे सारक्या माणसाने ठेवलेला पाठीवरचा हात मला धर्म सेवेला नक्कीच प्रेरणादाई ठरेल यात काही शंका नाही

No comments:

Post a Comment