इतिहास हा फक्त जेत्याला लक्षात ठेवतो त्यामुळे युद्ध कसा लढला यापेक्षा तो कसा जिंकला याला महत्व आहे.. मुघल आक्रमकांनी या देशावर राज्य केले त्याला कारणीभूत होते त्यांनी जिंकण्यासाठी युद्धनियम मानले नाही किंवा ते धाब्यावर बसवून फक्त धर्मासाठी लढले आणि जिंकले.. पूर्वीच्या काळात राजपूत राजे हे महाभारतातील धर्मशास्त्राच्या नियमानुसार लढाई करत.. उदारणार्थ सुर्यस्थानंतर शस्त्र उचलायचे नाही, निहत्यावर वार करायचा नाही.. शरण आलेल्याला माफ करायचे..पाठीवरती वार करायचे नाहीत इत्यादी.. मोघलांनी याच धार्मिक पद्धतीचा फायदा घेऊन हिंदू राजांना फसवून हरवले मग ते पृथ्वीराज सिंह असो, महाराणा प्रताप असो किंवा राजा रतनसिंह सगळे युद्धाच्या मैदानात फक्त आपले मुंडके कापून घेण्यासाठी जात असत.. वरील राजे शूर होते निसंदेह पण त्यांनी केलेल्या चुका मोघल आक्रमकांना राज्य करण्यासाठी आणि इथल्या प्रजेवर अत्याचार करण्यासाठी पुरेश्या होत्या. युद्ध संपल्यावर त्याचे परिणाम हा युद्ध हरलेल्या राज्याला भोगावे लागतात. आणि आपल्या राज्यपासून हजारो किलोमीटर लांब आलेले मुघल लुटारू, लिंगपिसाट आणि धर्मवेडे होते हे सांगायला नकोच.. त्यांनी भारतातील अमूल्य हिरे, जवारात, रत्ने,सोने, चांदी लुटली, त्यांनी आया बहिणींवर बलात्कार केले.. धर्मपसारसाठी प्रचंड नरसंहार केला.. याला कारण फक्त आणि फक्त हिंदू राजांचे ' मोडेन पण वाकणार नाही' हा आडमुठेपणा... युद्ध फक्त शहीद होण्यासाठी लढायचे तसेच प्रचंड धार्मिक आस्था ' माझा देव मला तारेल.. मला मृत्यू नंतर स्वर्ग प्राप्त होईल ही खोटी आस्था.. देवाला प्रचंड घाबरणारे राजे .. मग जसा राजा तशी प्रजा .. मोघलांनी याचाच फायदा उचलला... युद्ध लढण्यासाठी आपल्या हिंदू राजांनी फक्त पारंपारिक युद्धाचा आणि धर्माचा आधार घेतला जो युद्ध हरण्यासाठी पुरेसा होता..मोघलांनी याचाच फायदा उचलला त्यांनी सर्वात प्रथम हिंदू मंदिरे तोडली मूर्त्यांवर घणाचे घाव घातले.. त्यांनी हे दाखवले ज्या देवाला तुम्ही घाबरता त्या देवावर आम्ही घणाचे घाव घातले.. त्याची मूर्ती आम्ही आमच्या। मशिदीच्या पायरीला दगड म्हणून लावली .. त्या शक्तिशाली देवाने आमचे काहीही वाकडे केले नाही तर तुम्ही काय करणार?? याचा परिणाम असा झाला की लोकांचे त्या हिंदू राजांचे मानसिक हार होऊ लागली.. ज्यांचा देव काही वाकडे करू शकत नाही त्यांचे आपण काय वाकडे करणार ही भावना वाढू लागली.. पण एक हिंदू राजा यापेक्षा वेगळा होता.. त्यानेही लहानपणी रामायण आणि महाभारताचे धडे घेतले होते ..पण त्याने त्यातील युद्धाचे धर्मशास्त्र किती घेतले ते माहीत नाही पण त्यातली कृष्णनीती नक्कीच आत्मसात केली होती.. त्या हिंदू राजाचे नाव होते छत्रपती शिवाजी महाराज . अफजलखान आपली फौज घेऊन वाईला आला वाटेत त्याने पंढरपूरचा विठोबा आणि तुळजा भवानी चे चिनी आणि हातोडीने तुकडे केले . अपेक्षा होती शिवाजी महाराज देव वाचवायला बाहेर येऊन युद्ध करतील.. पण महाराज किल्ला सोडून बाहेर आलेच नाही.. मराठा सरदार मात्र घाबरले.. मूर्तीभंजकांना पाहून त्यांचे हौसले फस्त झाले.. धर्माचा आणि देवभोळे पणाचा जबरदस्त पगडा असलेल्या मराठा सरदार मनातून खचले होते..पण महाराजांकडे यावर जालीम उपाय होता ... त्यांनी या मराठा सरदारांचा देवभोळेपणा त्यांच्याच विरोधात वापरला.. त्यांनी दरबार भरवून सांगितले काल साक्षात भवानी मातेचे मला दर्शन दिले आणि विजय तुझाच आहे असे सांगितले तसेच तलवार ही भेट दिली.. सर्वाना खरे वाटले... आता साक्षात भवानी माता महाराजांच्यासोबत असताना आपण हरुच शकत नाही ही भावना त्यांच्या मनात घट्ट झाली त्यानंतर अफजलखानाचे काय झाले हे तुम्हाला सर्वानाच माहीत आहे.. महाराजांनी युद्धात धर्मशास्त्राचे नियम कधीच वापरले नाहीत.. महाराजानी महाभारत अभ्यासाला होता पण त्यातून काय घ्यायचे काय टाकायचे आहे हे महाराजांना परफेक्त माहीत होते. महाराजांनी महाभारतातून काही घेतले असेल तर ते आहे श्री कृष्णनीती..आणि इतिहास साक्षीला आहे ज्यांनी ज्यांनी श्रीकृष्णनीती वापरली तो जिंकला आहे... दुर्दैवाने कोणत्याही हिंदू राजाने श्रीकृष्णनीती फॉलो केलीच नाही.. पारंपरिक कालबाह्य शस्त्राने पारंपरिक पद्धतीने लढले गेलेले युद्ध जिंकणे कठीण च नाही अशक्यच होते.. देशाचा हिंदू इतिहास हा शौर्याचा नक्कीच असेल पण एक शिवाजी महाराज सोडले तर जेत्यांचा नक्कीच नाही आहे हे आपले दुर्दैव आहे. ज्या भगवत गीतेचा दाखला दिला जातो की हिंदू धर्म सहिष्णू आणि सर्व धर्मांचा आदर करणारा आहे त्या भागवतगीतेत धर्माच्या रक्षणाची जबाबदारीही उचलावी हे सांगितले आहे हे दुर्दैवाने आपण विसरलो म्हणूनच धर्मविस्तारासाठी जेव्हा परकीय आक्रमण झाले तेव्हा तेव्हा धर्मरक्षणासाठी हिंदू राजे एक होऊन लढले नाहीत.. धर्मातून नको ते कर्मकांड घेतले पण हवे ते घेतलेच नाही..
©प्रशांत शिगवण.
8329899545
भगव्या झेंड्याखाली अखंड हिंदू राष्ट्र घडवण्यासाठी मला भगवे कफन नशिबी आले तरी हरकत नाही. एक हिंदू म्हणून ते मी आनंदाने स्वीकारेन.- प्रशांत शिगवण
Sunday 28 January 2018
युद्धनीती- कृष्णनीती
Subscribe to:
Post Comments (Atom)
खूप छान माहिती आहे. अतिशय मार्मिक शब्दांत माहिती पुरविण्यात आली आहे.
ReplyDeleteनमस्कार ,
'१०० पुस्तकांपेक्षा १ उच्च प्रतिचे माहिती देणारे पुस्तक नेहमीच चांगले' या तत्वांला अनुसरून आम्ही VISION UPSC MPSC PO ह्या संपूर्ण मराठीमोळ्या YouTube चॅनेलची निर्मिती केली आहे.
गरजू व हुशार विद्यार्थी मित्रांना व मैत्रिणींना Private Classes च्या जाळ्यातून मुक्त करून Quality Free Education देण्याच्या उद्देश्याने तसेच त्यांच्या मूल्यवान वेळात अतिशय महत्वाची माहिती एकत्रितपणे देणे हेच आमचे ध्येय आहे.
माझ्या चॅनेलच्या काही विडीओची लिंक खाली दिली आहे , एकदा आपण video पाहून स्वतः विडीओमधील माहिती आपणांस किती उपयुक्त ठरणारी आहे हे ठरवावे.
Telegram Channel name : @visionump
Youyube channel name : VISION UPSC MPSC PO
प्राचीन भारताचा इतिहास - कालक्रम https://youtu.be/ozUiFABdydA
मध्ययुगीन भारताचा इतिहास - कालक्रम : भाग १ https://youtu.be/a67cdfA3Svk
मध्ययुगीन भारताचा इतिहास- कालक्रम : भाग २ https://youtu.be/wl9Vg5KhvIA
आधुनिक भारताचा इतिहास- कालक्रम (इ.स.१६००-१८५७) https://youtu.be/h_0syxLPsbw
आधुनिक भारताचा इतिहास - कालक्रम (इ.स.१८५७–१९४७) https://youtu.be/ee79-cm1_C0
आधुनिक भारताचा इतिहास - कालक्रम (इ.स.१९४७-२०००) https://youtu.be/rbMQzjLJSIU
तुमचा मूल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.