Saturday 3 March 2012

लोकांना लुटण्याचा नवीन फंडा...........


by Prashant Shigwan on Sunday, March 4, 2012 at 10:53am ·
        काल परवा साऱ्या न्यूस चायनल वर नवीन ट्राफिक नियम बिल पास कोंग्रेस सरकार पास करणार असे सांगितले जात होते. हा कायदा पास झाला तर म्हणे कोणी ट्राफिक नियम तोडण्याची हिम्मत करणार नाही कारण यामध्ये केले जाणारे दंड ५००ते ५००० रुपये एवढे असू शकते. पण माझा मुद्दा असा आहे कि खरेच यामुळे ट्राफिक नियम तोडणाऱ्या लोकांची संख्या कमी होईल का? लोक खरेच नियम पाळतील का? हो यामुळे नक्कीच ट्राफिक नियम धाब्यावर बसवून रस्त्यावर धावणाऱ्या लोकांची संख्या निश्चित कमी होईल पण  जे लोक नियमाप्रमाणे दंड भरत होते जे ट्राफिक पोलिसांना लाच देत नसत त्यांचा काय ? कारण १०० ते १००० रुपयाचा दंड भरणे मिडलक्लास लोकांच्या किश्याला परवडण्यासारखे आहे.पण जेव्हा ५००ते ५०००० रुपयाच्या दंडाचा प्रश्न येईल तेव्हा नक्कीच माझ्यासारखा माणूस मधला रस्ता काढेल कारण येवढा दंड भरणे माझ्यासारख्या मिडलक्लास लोकांना परवडण्यासारखे नाही. आणि कोणताही पोलीस १०० रुपये घेवून सोडेल असे वाटत नाही तो १००० खाली बोलणार नाही.मला सांगा ट्राफिक पोलिसांना खरोखरच नियम तोडणाऱ्या लोकांवर जबर बसवायचा असेल तर ते सिग्नल वर उभे न राहता दूर एका कोपऱ्यात चोरासारखे उभे का राहतात. म्हणजे जेवढी लोक जबाबदार आहेत ट्राफिक नियम तोडायला तेवढेच हे पोलीस जबाबदार नाही आहेत का?
हे लाच घेतलेले पैसे कोणाच्या किशात जातात
-
           माझा एक मित्र पोलीस हवालदार आहे.एकदा त्याला पोलीस लोक घेत असलेले हप्ते तसेच लाच कोणाच्या किशात जाते याबाबत चर्चा केली त्या वेळी त्याने जे मला सांगितले ते ऐकून मला तर धक्का बसला तो म्हणाला सारा मंत्री लोकांचा किया कराया आहे एक ट्राफिक हवालर एका सिग्नल वर उभे राहून त्याच्या वरिष्ठाने दिलेले टार्गेट संध्याकाळ पर्यंत पूर्ण करायचे असते टार्गेट च्या वर मिळणारे पैसे हे त्याच्या किशात जातात पण टार्गेट पूर्ण झाले नाही तर त्याला त्यातील काहीही हिस्सा मिळत नाही. मग त्या साठी आमच्यासारखे हवालदार मोक्याच्या टिकाणी ड्युटी लागावी म्हणून आपल्याच वरिष्ठांना लाच देतो आणि ती लाच दोन प्रकारची असते १) पैश्याच्या माध्यमातून आणि दुसरा पर्याय ऐकून माझे कानच सुन्न झाले तो म्हणाला २) ज्या हवालदाराकडे पैशे नसतील तो हवालदार आपली बायको नाहीतर बहिण एका रात्रीसाठी आपल्या वरिष्ठाकडे पाठवतो. कारण त्या हवालदाराला आपल्याला नोकरीला पोलीस खात्यात लागण्यासाठी लाखो रुपये लाच दिलेली वसूल करायची असते. खरेच हे  ऐकले कि वाटते लोक पैश्यासाठी किती खालच्या थराला जातात. मी माझ्या पोलीस मित्रासोबत या नवीन कायद्याबाबत बोललो म्हणालो आता तर तुमची मजा आहे नाही खूप जास्त पैसे तुम्हाला कमावता येतील त्यावर तो म्हणाला हो पण या पैश्यातील आम्हाला फक्त खारीचा वाटा मिळेल सारे पैसे तर आमच्या वरिष्ठांच्या आणि मंत्र्यांच्या किशात जातील कारण जसे आम्ही आमच्या वरिष्ठांना हप्ता देतो तसे आमचे वरिष्ठ त्यांच्या कमाई मधला फार मोठा हिस्सा मंत्र्याकडे पोचवतात आणि योग्य त्या शहरात आपली पोस्टिंग होण्यासाठी पैसे तसेच आपली नाबालिक मुलगीही मंत्र्याच्या खाली झोपवायला कमी करत नाहीत.
चोरी करायचा नवीन फंडा हा सरकारचाच
-
           खरे सांगायचे झाले तर कोंग्रेस सरकार आता समजून चुकले आहे यापुढे आपली सरकार राहणार नाही म्हणून ज्या पद्धतीने कमावता येईल त्या पद्धतीने कमवायचे आणि लोकांच्या पुढ्यात आपण किती चांगले आहोत हे दाखवायचे. म्हणून  यावर एकच उपाय या कायद्याला विरोध करा जो मार्ग मिळेल त्या मार्गाने आता वेळ आली आहे सरकार बदलण्याची त्यासाठी ' तुम्ही बदला मग आपोआप सरकार बदलेल '

No comments:

Post a Comment