आज जी मी नोट्स लिहित आहे ती लिहू कि नको लिहू याचा खूप वेळ मी विचार केला कारण यावर लोकांच्या प्रतिक्रिया येतील याबद्दल मला खूप भीती वाटत होती नंतर ठरवले लोकांच्या प्रतिक्रिया काही येवोत पण मी हि सत्य घटना लोकांना सांगणारच!काल नेहमीप्रमाणे मी एका कस्टमर कडे lcd tv रिपेरिंग करायला गेलो होतो दुपारची वेळ असल्याने थोडा घामाघूम झालो होतो मी किशातील रुमालाने घाम टिपत "मला थोडे पाणी मिळेल का म्हणून त्या कस्टमर ला विचारले. त्यावर तो कस्टमर मला म्हणाला "आम्ही दलित आहोत तुला आमच्या घरातील पाणी चालेल का?"त्याच्या या उत्तराने मी प्रथम हादरलोच नंतर स्वत्ताला सावरले आणि म्हणालो "काय संगता अहो मीही भंगी जातीतील आहे तुमच्या घरात पाणी प्यायल्याने तुम्हाला चालत असेल तर मी नक्की पाणी प्यायला तयार आहे."माझा उत्तर ऐकून तो थोडा खजील झाला आणि म्हणाला माफ कर मित्रा तुही माझाच भाऊ निघालास मला वाटले तू ब्राम्हण असतील म्हणून थोडी चेष्टा केली"मी म्हणालो "मी भंगी नाही आहे पण मी माझी जात सांगणार नाही माझी ओळख मी एक हिंदू अशीच आहे तुम्हाला पाणी द्यायचे असेल तर द्या नाहीतर नाही दिलेत तरी चालेल."त्या कस्टमर ने मन खाली घालून मला पाणी आणून दिले. त्यावर मी त्याला म्हणालो "साहेब दलित हे सुद्धा हिंदू आहेत पण आपण हिंदू आहोत हे सांगण्यास ते का लाजतात हेच मला समजत नाही. मी तुमच्यापासून वयाने नक्की लहान आहे पण मी आपणास एक विनंती करतो तुम्ही आजपासून आपली ओळख दलित न सांगता हिंदू म्हणून सांगावी."मित्रानो मला यामध्ये जातीद्येश करायचा नाही आहे पण हा अनुभव मला नवीनच होता तो तुमच्या सोबत वाटला.
अजूनही असे विचारणारे लोक आहेत हे वाचून आश्चर्य वाटले. तुमचा मुद्दा अगदी योग्य आहे.
ReplyDeleteछान उत्तर दिले आहे.
ReplyDelete