Thursday 9 February 2012

स्वराज्याचा माहित नसलेला शिलेदार -नारो महादेव.


              नारो महादेव हा संताजी घोरपडे यांचा मानसपुत्र याबद्दल आपल्याला माहिती असेल कि नाही माहीत नाही पण ज्या शिवाजी संभाजी महाराज्यांचे आपण अभिमानाने नाव घेतो त्या मराठयांच्या स्वराज्यात असे कित्तेक खंदे मावळे होते ज्यांची आपल्याला माहिती सुद्धा नाही.नरो महादेव हि त्यातलाच एक !     
              संताजीं, बहिर्जी आणि मालोजी या तिघांची नुकतीच लग्ने झाली होती या तिघांचे कुटुंब कर्नाटकातून देशावर येत होते आंबोली घाट पार केल्यानंतर गंगाबाईची भेट झाली. एका आमराईत एका लहानग्या मुलाला कुशीत घेवून बसली होती. तिच्याकडे पाहून ती  खूप दिवस उपाशी असावी असे दिसत होते आराम करावा म्हणून संताजीचा परिवार ती  जेथे बसली होती तेथे थांबला काही हशामानी गंगाबाईना हटकले "ये बाई निग इथून येथे शाही तंबू ठोकायचा आहे."गंगाबाई बावरली. पोटाजवळ असलेल्या मुलाला घट्ट आवळून इकडे तिकडे पाहू लागली. तश्या एक दोन बटाक्या पुढे सावरल्या " ये बाई सांगितलेले समाजात नाही तुला इथे मालकीण बाईचा तंबू बसवायचा आहे चाल निग इथून.""खबरदार तिला कुणी काही बोललात तर , बसू दे तिला "संताजी चढ्या आवाजात म्हणाले.तोवर संताजीच्या आई उमाबाई मेंयातून खाली उतरल्या आपल्या धाकट्या मुलगा बहिर्जीला हाक मारली बहिर्जी धावत आला "कोण आहे बघ तरी रानांत एकटीच बसली आहे भुतासारखी , पदरात मूल हाय " उमाबाई घामाजलेले तोंड पुसत म्हणाल्या.
              बहिर्जी विचारपूस करायला गेला. थोड्या वेळाने परत आला "आईसाहेब कोकणातून आली आहे ती, नुकतीच घाट उतरून इथे पोचली आहे." बहिर्जी." एकटीच, सोबत कोणी पुरुष नाही?" उमाबाई " नाही बहुदा." बहिर्जी " तुझे मेल्या कामच अर्धवट , दाजी तू जाऊन तिची पुरी चौकशी करून ये " उमाबाई संताजीकडे पहात म्हणाल्या. संताजी गंगाबाईकडे गेला. संताजीला पाहताच गंगाबाई ने आपला पदर ओढून घेतला. बाजूला ठेवलेला बोचका आपल्या पायाखाली घेवून आपल्या ४-५ वर्ष्याच्या मुलाला घट्ट कुशीत पकडले.
" घाबरू नका बाई आम्ही चांगल्या घरातील माणसे आहोत,आईसाहेबांनी आपली चवकशी कराया आम्हास धाडले आहे." संताजी. हि माणसे चांगल्या घरातील दिसत आहेत हे पाहून गंगाबाई नि आपली माहिती सांगायला सुरवात केली.
                मी म्हापण च्या जोश्यांची सून , माझ्या पतीचे नाव महाद्जीपंत  एका दीर्घ आजाराने ते मरण पावले घरात आम्ही दोघेच राहिलो कर्ता कमावता कोणी नाही लोकांची भांडी घासून चरित्र चालवायचा प्रयत्न केल पण नाही चालले मग भीक मागितली पण रोज पोट भरेल एवढी भीक मिळेनाशी झाली. उपास होऊ लागले नाईलाजाने म्हापण सोडून देशावर चालले आहे जीव जगला तर ठीक नाहीतर एखादी नदी जवळ करेन मुलाला घेवून.संताजीनी सारी हकीगत आपली आई उमाबाई यांना सांगितली उमाबाईंचे मन हेलावले. त्यांनी तिला आपल्या घरात कामासाठी ठेवले आणि ५ वर्षाचा नारो महादेव एका मराठ्याच्या घरात वाढू लागला. संताजीच्या मुलासोबत शत्र शिक्षण घेवू लागला. संताजी मोहिमेवर असताना साऱ्या परिवाराची जबाबब्दारी उत्तम रित्या पर पाडू लागला.एक दिवस नारायण गावातून फिरून आला आणि खिन्नपणे एका कोपऱ्यात बसून राहिला रोज हसणारा सर्वांशी हसून खेळून राहणारा नारायण आज गप्प होता . जेवणाची वेळ झाली नारायण आणि त्याची आई ब्राह्मण असल्याने त्या दोघांचे जेवण वेगळे बनवले जायचे. संताजी जेवायला बसले. नारायण हि कोपऱ्यात बसला होता."नारायण काय झाले आज उदास उदास आहेस ?" संताजी." आबा गावातील ब्राह्मण लोक मी तलवार चालवतो, घोड्सावारी करतो म्हणून ब्राम्हणाचे नाव बुडवले धर्म बुडवले असे म्हणतात." नारायण ."खरे आहे तू ब्राह्मण आहेस मराठा थोडी आहेस "उमाबाई त्याची फिरकी घेत म्हणाल्या."मला माझ्या नावापुढे संताजी घोरपडे नाव लावायचे आहे."नारायण."त्यासाठी तुला आमच्या थालीतले उस्ठ्ठे खावे लागेल.आहे तयारी?" उमाबाई मुद्दाहून त्याला डीचावले आणि नारायण ने सरळ उठून संताजीच्या पुढ्यातली भाकर उचलून खाल्ली " आता झालो न मी घोरपडे ?"नारायणाने उमाबाईकडे पहात विचारले."अरे नारायणा हे काय केलास मी तुझी थट्टा करीत होते ." उमाबाई."आज पासून तू माझा पुत्र नारायण संताजी त्याला पोटाशी घेत म्हणाले आणि कोपऱ्यात बसलेल्या गंगाबाईचे डोळे भरून आले. राहायला घर मिळाले पोटाला भाकर मिळाली आणि अविरहात प्रेम! अपेक्षेपेक्षा जास्त मिळाले होते तिला .नारायणची संताजीवर एवढी श्रद्धा कि तो त्याच्या मागे एखाद्या सावलीसारखा राहायचा .
             संताजीच्या शेवटच्या क्षणी सारे लोक त्यांना सोडून गेले पण नारायण शेवटपर्यंत त्यांच्यासोबत राहिला एखाद्या सावलीसारखा! संताजीना आपल्याला दगा फटका होईल याची कल्पना होती म्हणून खूप वेळा आपल्याला सोडून जा असे सांगितले पण नारायण ऐकला नाही.संताजीच्या देहाला अग्नी हि या नारायानानेच दिला. इतिहासातला हा प्रसंग आठवून तरी मित्रानो ब्राह्मण मराठा वाद विसरा. आणि आतव तो काळ ज्यावेळी ब्राह्मण आणि मराठा खांद्याला खांदा लाऊन स्वराज्यासाठी लढले मग ते बाजीप्रभू असो ,मुरारबाजी असोत किवा तुम्हाला माहित नसलेला नारो महादेव असो. अगदी शेवटी ज्या बाजीरावांनी शिवाजी महाराज्यांचे स्वप्नातले स्वराज्य अटकेपार नेले. सरसकट ब्राह्मण द्येश आपल्या मुळावर उठणार.वाईट वाटते जो हिंदू धर्म मराठ्यांनी ३०० वर्ष्यापूर्वी राखला तो हिंदू धर्म आपणच बुडवणार शिवाजी महाराज्यांचे स्वप्न आपण धुळीस मिळवणार असे वाटू लागले आहे.

No comments:

Post a Comment