Friday, 2 September 2011

निस्वार्थी माणसे आजही या महाराष्ट्रात आहेत !



खूप दिवस भिडे गुरुजीच्या विषयी ऐकत आलो होतो पण हि व्यक्ती नक्की दिसायला कशी आहे हिचा नेमका उद्देश काय हे माहित नव्हते. परवा अचानक माझा मित्र प्रशांत मंडपे यांचा फोन आला. भिडे गुरुजींचा व्याख्यान आयोजित केला आहे तू आलास तर बरे होईल. आपले काही कट्टर हिंदू मित्र हि भेटणार आहेत.मी उद्याचा दिवस कधी उजाडते आहे आणि मी कधी गुरुजींना भेटतो असे मला झाले.

दुपारी २ वाजता व्याख्यान चालू होणार होते. मी आणि माझा मित्र कुमार साधारण १.३० ला परळच्या हिंदू महासभेच्या सभागृहात पोचलो.हळू हळू गर्दी वाढू लागली थोड्या वेळात गुरुजींचे आगमन झाले.

डोक्यावर गांधी टोपी सफेद सदरा (जो खूप वेळा धुतल्याने त्याची कॉलर ब्रश मुळे थोडी उसवली होती.)आणि धोतर अशी वेश भूषा केलेले एक साधारण ६५  वय वर्ष असणारी व्यक्ती सभागृहात आली आल्या आल्या त्यांनी साऱ्या खुर्च्या काढून टाकून द्यायला सांगितल्या आणि शिवाजी महाराज्यांच्या प्रतिमेचे पूजन करून सर्वाना अर्ध वर्तुळ करून बसायला सांगितले.

व्याख्यानाला सुरवात झाली आणि भिडे गुरुजींच्या प्रत्तेक शब्धाने मी अक्षरश मंत्र मुग्ध झालो जवळ जवळ ४ तास गुरुजी न थकता बोलत होते.
वेळेच्या अभावामुळे व्याख्यान आटोपते घ्यावे लागले त्याच्या व्याक्यानाने माझ्यावर अशी जादू केली जशी २ वर्ष पूर्वी स्वातंत्र्य वीर सावरकरांच्या पुस्तकांनी! व्याख्यान संपले कुणीतरी त्यांना म्हणाले "गुरुजी मला आपल्या सोबत फोटो काढायचा आहे."त्यावर गुरुजी म्हणाले "नको माझ्यासोबत नका फोटो काढू! मी बदमाश माणूस आहे,फोटो काढायचा असेल तर शिवाजी महाराज्यांनच्या फोटो सोबत काढा "
नक्की मी माझ्या मनात देवाचे आभार मानले अश्या निस्वार्थी माणसाच्या व्याक्यानाची संधी मला दिली.

मी घरी आलो तेव्हा माझा मित्र महेश जाधव याला झालेली सारी घटना सांगितली तो सांगलीचाच आहे गुरुजींच्या गावातला.त्याने मला गुरुजींचा एक नवीन किस्सा सांगितला तो म्हणाला "काही वर्षा पूर्वी सांगलीत काही मुसलमानांनी सनातन प्रभात या संस्थेच्या कार्यालयाची तोड-फोड केली त्यासाठी गुरुजी आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी मिरज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी मोर्च्या काढला.आणि त्यांना विरोध करण्यासाठी त्या पोलीस ठाण्याजवळ जवळ-जवळ २ ते ३ हजार मुसलमान जमले.गुरुजी पोलीस ठाण्याच्या आत होते जसे गुरुजी बाहेर आले तसे तेथील एक मुसलमान गुरुजींना शिव्या देऊ लागला आणि ते पाहून त्याच्या एका कार्याकारात्याने पुडे जाऊन त्या मुसलमानाच्या कानशिलात दोन लावल्या आणि आपल्या पायातील कोल्हापुरी चप्पल काढून चोपायला सुरवात केली.आणि हे दृश्य पाहून तेथील साऱ्या मुसलमानांनी पळ काढला."

सांगलीत या वयातही गुरुजी सायकल घेऊन फिरतात पायात कधीही चप्पल घालत नाहीत आणि प्रशिद्धी पासून नेहमी लांब राहतात.आणि आपला सारा आयुश्या शिवाजी महाराज्यांच्या हिंदवी स्वराज्याची थोरवी गाउन ते लोकांपर्यंत पोचवतात.त्यांचे व्याखान शक्य झाल्यास आपणही ऐकावे असे मला वाटते.

पण य प्रशिध्दीपासून लांब जाऊन शिवाजी महाराज्यांचे कार्य कोणतेही मन धन न घेता सांगणाऱ्या या महान वक्त्याच्या कार्याची महती आपणास समजावे यासाठी केलेला हा एक छोटासा प्रयत्न धन्यवाद प्रशांत मंडपे.आपण मला अश्या महान माणसाची भेट घडवून दिल्या बद्दल आपले आभार!

1 comment:

  1. नमस्कार,
    आपले लेख वाचून छान वाटल, भिडे गुरूजींच व्याख्यान ऐकण्याचा प्रयत्न नक्की करीन, माहिती प्रकाशित केल्या बद्दल धन्यवाद.

    ReplyDelete