Saturday 8 June 2013

औरंग्याला धडकी भरलेला गनिमी कावा !


संभाजी महाराज्यांच्या मृत्यू नंतर राज्य मोडले , सरदार फुटले, फितुरीला चेव आले. हातात सेना नाही राज्याला सेनापती हि तर दूरची गोष्ट त्यात शाही खाजाण्यात खळ-खळाट . आता करायचे काय औरंगजेब तर एखाद्या अजगरासारखा महाराष्ट्राला वेढा देवून होता. दिवसान दिवस त्याच्या वेढ्याचा फास महाराष्ट्राच्या गळ्यात आवळत जात होता. आया बहिणी नागवल्या जात होत्या. मंदिर पडून मशिदी बांधल्या जात होत्या. आता शेवटचे काय ते सोक्ष मोक्ष लावावे म्हणून राजाराम महाराज्यांनी आपल्या विश्वासू सर्दारांसोबत सभा भरवली.

सभेत कुणीच काही बोलत नव्हते. इतक्यात संताजी उठले . " महाराज माझ्या मनाशी एक निर्धार केलाय कदाचित तुम्हास्नी तो वेडेपणा वाटल पण त्यावाचून गत्यंतर नाही." संताजी." काय आहे तुमच्या मनात?" राजाराम महाराज शांतपणे म्हणाले. " इथल्या संकटाचे कारण आहे तो आलमगीर , आणि मी त्या संकटालाच संपवायचे ठरवले आहे.अकस्मात छापा घालून त्याला मारायचे म्हणतो आहे." संताजी निश्चयाने म्हणाले आणि सारे सरदार त्यांच्याकडे पाहू लागले. " छापा घालणार कोण? तुम्ही आणि तुमच्या जीवाला काही बरे वाईट झाले तर ?" राजाराम महाराज ."हो . मी निश्चय आणि मनाची तयारी केली आहे राजे " संताजी ." संताजी राव हा वेडेपणा करण्यापेक्षा त्या शेख निजामाचा बंदोबस्त केले तरी पुरेसे आहे ." धनाजी जाधव त्यांची समजूत काढत म्हणाले. "झाडाच्या फांद्या तोडून उपयोग नाही सारा झाड तोडणे आवशक आहे . आठवा तो छत्रपतींचा शाहिस्ते खानावरचा छापा . तीन वर्ष लागलेला वनवास एका दिवसात महाराजांनी संपवले होते . काबुल आहे हा वेडेपणा आहे पण उरात सुडाची आग असल्यावर हा वेडेपणा करावासा वाटतो. त्या माता भगिनींच्या लुटलेल्या अब्रूची आग, शेकडो मंदिरांच्या विध्वंसाची आग. पराजयाची आग मला स्वस्त बसू देत नाही राजे. धनसिंग वीराचे जीवन म्हणजे अळवावरचे पाणी आज आहे आणि उद्या नाही. जिंकण्यासाठी जीव उधळणे हेच त्याचे आयुष्य अस समजा आम्ही मरणाच्या शोधत आहोत हि नामर्द पानाची जिंदगी आम्हास नकोशी झाली आहे. एक संताजी मेला तर फारसे फरक पडत नाही पण हा संताजी यशस्वी झाला तर या महाराष्टाला लागलेला हा शाप कायमचा संपून जाईल.


धनाजी जाधव आणि राजाराम महाराज आवक होऊन धीरगंभीर संताजीकडे पाहू लागले. महाराज्याना परवानगी देण्यावाचून गत्यंतर नव्हते. धनाजी जाधवांना शाबदि  खान आणि रणमस्त खान हे बादशहा ला पाठवत असलेली रसद तोडायची कामगिरी देण्यात आली १२००० ची फौज घेवून धनाजी जाधव फलटण ला गेले . सोबत फक्त २००० निवडक साथीदार ठेवून संताजीनी आपला मुक्काम शंभू महादेवाच्या डोंगरात हलवला.

तुळापुर च्या छावणीत संताजी घोरपडे यांचे विश्वासू गुप्तहेर कोकानोबा आणि हरबा केव्हाच निघून गेले होते. काही दिवसातच ते बातम्यांचा खजाना घेवून आले. " दाजी बादशहाचा दलाम्बा लय मोठा हाय सहा -सात कोसाचा घेर करून छावणी पसरली हाय. छावणीच्या मध्यभागी गुलालबार तंबू ठोकला हाय .त्याभोवती दोन परस उंचीचे बांबू ठोकून लाकडी फळ्यांचे कुंपण हाय. यावर गुलाबी कापडाची कानात पंघारालीया. तंबूच्या चारी अंगाला लाल निशाण ......"

जावू दे रे मला पहार्याची काय व्यावास्ता हाय ती सांग. "संताजी. " छावणीत पहारा चोख हाय .गुलालबार तंबूच्या मुख्य प्रवेश द्वारावर पहारा करणाऱ्या मुख्य अधिकाऱ्यांची निवास स्थाने आहेत. त्यांचे पहारे रोज बदलतात. खासे आणि जनाना यांची जबाबदारीही त्यांच्यावरच आहे. इथेच बाजाराची जागा आहे. प्रवेश द्वाराच्या दुतर्फा व्यापार्यांनी आपली दुकाने थाटली आहेत. इथेही चोख पहारा आहे. बाजार ओलांडून पुढे आलो कि दिवाने आम चा दरबार लागतो. मग पुढे दिवाने खास चा दरबार त्याला लागुनच जनान खाना हाय. त्याला लागून बादशहाची ख्वाबगहा आहे. तंबूच्या आत बाहेर शेकडो अहादी, शेखजादे यांचा कडक पहारा आहे. झोपण्याच्या जागी पाळलेले गुलाम चेले यांचा खडा पहारा असतो जनान खाण्यात शेकडो शशास्त्र स्त्रियांचा खडा पहारा हाय .संताजी घोर्पद्यानी घनश्याम राम कडून छावणीचा नकाशा तयार करून घेतला. कधी निघायचे, कोणत्या वाटेने जायचे , कुठे मुक्काम करायचे , शेवटच्या मुक्कामापासून तुलापुराचे नेमके अंतर किती तिथे पोहचायला नेमका किती वेळ लागेल या सार्याचा अंदाज बांधला .


प्लान-संताजीनी फलटण च्या बाजूने नीरा नदी ओलांडली. जाजुरीच्या खंडेरायाचे दर्शन घेतले. सासवडच्या दिवा घाटाच्या झाडीत ठरल्याप्रमाणे पहिला मुक्काम झाला . ओल्या रानात सैन्याने पहिली विश्रांती घेतली. संध्याकाळी संताजीनी छावणीचा नकाशा पसरला. " गड्यानो नकाशा नीट पाहून घ्या. हा तंबूचा प्रवेशद्वार इथून आंत घुसायचे पाऊस खूप पडत आहे सारे सरदार दारू पियुन गाढ झोपले असतील याच संधीचा आपल्याला फायदा उचलायचा आहे. " सारे सरदार एक-मेकांकडे भीतीयुक्त नजरेने पाहू लागले संताजींच्या डोक्यात असा आत्महत्या करायचा विचार असेल असे त्यांना मुळीच वाटले नाही. संताजींचा त्यांच्याकडे अजिबात लक्ष नव्हते. ते आपला प्लान पुढे सांगू लागले. " आपण सैन्याचे ५ तुकडीत विभाग करू दोन तुकड्या बाहेर थांबतील तीन तुकड्या छावणीत घुसतील. त्यातले एक एक पाथक बहिर्जी ,मालोजी , विठोजी आणि त्यांच्यासोबत आम्ही स्वत्ता जावू . काम झाले कि चारही तुकड्या वेग वेगळ्या मार्गाने बाहेर एक मेकाला इशारा देत बाहेर पडतील . यात जराशीही चूक जीवावर बेतेल. आम्ही दिलेले हुकुम तुंम्ही आणि तुमची मनसे तंतोतंत पळतील तरच आपण यशस्वी होऊ लक्षात ठेवा.या मोहिमेबद्दल सारे नाखूष असले तरी संताजीना नाही बोलायची कुणाच्यात हि हिम्मत नव्हती.वाघाच्या गुहेत - ठरल्याप्रमाणे दोन तुकड्या बाहेर थांबल्या तीन तुकड्या घेवून संताजी स्वत्त तंबूत जाऊ लागले एवढ्यात छबिन्याच्या पहारेकर्यांनी त्यांना हटकले. " ठहरो, कोण हो तुम लोग?""आम्ही व्हय आपल्याच लष्करातील शिर्के आणि मोहित्यांचे स्वार रातच्या छाबिण्यासाठी बाहेर गेलो होतो. मुबादाल्यासाठी मानसे आली म्हणून परत आलो आहोत. " संताजीनी ठोकलेली थाप वर्मावर लागली. त्यांना आत जावू दिल गेले मोक्याच्या ठिकाणी आल्यावर दोन तुकड्या तिथेच आडोश्याला थांबल्या. ६०० मावळ्यांची निवडक तुकडी घेवून संताजी गुलालबारच्या दिशेने निघाले. जोरदार पावसाने मशाली विझल्या होत्या थंडीने कडाडलेले पहारेकरी आपल्या तंबूत दारू डोसून पडले होते. नगारखाना पार करायला संताजीना कोणतीही अडचण आली नाही ते बाजारातून पुढे जात असताना कुणीतरी त्यांना हटकले "रुक जाव " दुसर्या क्षणाला विठोजीच्या हातातल्या तलवारीने त्याचे मुंडके धडा-वेगळे केले. तंबूच्या मुख्य प्रवेश द्वाराशी असलेल्या पहारेकर्यांना संशय आला ३००-४०० लोक थेट तंबूत घुसत आहेत हे त्यांना जाणवले. त्यांनी गोंधळ सुरु केला. मराठे तयार होतेच गलका वाढायच्या आताच त्यांनी त्यांचे काम तमाम केला. दिसेल त्याला मारत मराठे दिवाने इ आम मध्ये घुसले.


गनीम आया , भागो भागो एकाच गलका झाला. पण याच वेळी निसर्गानेही रौद्र रूप धारण केला विजा आणि ढगांची गडगडाट जोरात सुरु झाली. पाऊस होळी खेळू लागला. गुलाम ,चेले खासे मारून मराठे पत्शाहाच्या शयनगृहा कडे वळले. संताजी संतप्त नजरेने औरंगजेबाला शोधू लागले पण बादशहा कुठे दिसत नव्हता. लपून बसला असेल म्हणून त्यांनी सारा शयनगृह उलटा -पालट केला. पण सारे प्रयत्न व्यर्थ गेले. सर्वांनी आता लवकर निघाले पाहिजे नाहीतर सार्यांच्या प्राणावर बेतेल म्हणून निघू लागले तेवढ्यात कोपर्यात काहीतरी हलले बहिर्जीने हललेल्या जागी हात घालून खसकन ओढून काढले पण तो एक साधा चेला होता. मृत्यूचे थोडे भय दाखवल्यावर त्याने बादशहा जनान खाण्यात पाळला असल्याचे सांगितले " चला जनानखान्यात ' विठोजी पुढे जाऊ लागला संताजीनी त्याला अडवले . " जावू दे वूठू , बादशहा वाचला खरा पण सारा इतिहास बायकांच्या आसर्याला लपला म्हणून त्याची छी थू करेल.


सारे पटकन बाहेर पडले . बाहेर सारे गोंधलेले होते. मराठे त्यात बेमालूम मिसळले. बहिर्जीने तंबूच्या सार्या रस्या कापल्या आणि तो अवाढव्य तंबू एक जोरदार ढगफुटी आवाज करत जमीन-दोस्त झाला. बहिर्जीने त्यावर लावलेले सोन्याचे कळस कापून घेतले. तंबू कोसळतच भगदड  माजली सार्यांना वाटले बादशहा तम्बुखाली मेला असावा. पावसाचा जोर अचानक वाढला. मराठे मोघल सैन्यात घुसून एक मेकांना इशारा देत कधीच निसटले होते.

No comments:

Post a Comment