Saturday 16 February 2013

माझी भटकंती भाग २ ( किल्ले जंजिरा )

माझा मित्र राहुल च्या घराच्या लोनचे काम करण्यासाठी मी आणि राहुल सकाळी माझ्या होंडा स्टनर बाईक ने १० वाजता विरारहून निघालो. तसे जंजिर्याला जाण्याचा आमचा बेत नव्हता. आमचे काम साधारण २ वाजता संपले. दोघे हॉटेल ला बसून जेवत होतो मी राहुल म्हणालो " राहुल कल छुट्टी है क्यो ना हम काही घुमने जाये? " तो म्हणाला "पर किधर?" मी म्हणालो "इधरसे अलिबाग जायेंगे और उधर से जंजिरा किला " त्याने समत्ती दिली आणि  आम्ही निघालो.


अलिबाग ला आम्ही साधारण ५ वाजता पोहचलो. तेथून मुरुड ५५ km आम्ही कोणत्याही तयारीने आलो नव्हतो. आज आंम्हाला इथेच मुक्काम करावा लागणार होता. मला जंजिरा पहायची खूप उत्सुकता होती राहुल उत्तर प्रदेशातील रहिवाशी पण त्याला शिवाजी महाराज्यांविषयी खूप उत्सुकता जेव्हा मी त्याला सांगितले जंजिरा शिवाजी महाराज्याना कधीच जिंकता आले नव्हते तेव्हा तो म्हणाला " जो किला शिवाजी महाराज नही जीत पाये उसे हम क्यो देखे?" मी त्याला समजावले " शिवाजी महाराज ये किला क्यो नाही जीत पाये यहि तो हमे देखना है|"


आम्ही अलिबाग हून मुरुड साठी निघालो. काही ठिकाणी रस्ता खूप खराब होता. तर काही ठिकाणी मुंबई लाही लाजवेल असा सिमेंटचा रोड होता. वाटेत काशीद बीच लागले आणि आम्हाला बीच वर जाण्याचा मोह आवरता आला नाही. बीचवर काही काळ घालवला आणि अंधार पडला. आता आम्ही परत मुरुडकडे निघालो.


मजल दर मजल करत साधारण ७ वाजता मुरुडला पोहचलो. एका लॉजवर मुक्काम केला रात्री घरगुती पद्धतीने बनवलेले चिकन खाताना गावची आठवण आली रात्री परत थोडावेळ मुरुड बीचवर फिरलो. सकाळी ९ वाजता आम्ही जन्जीर्यावर जायला निघालो.

मुरुद्पासून साधारण ५ km वर एका गावातून शिडाच्या बोटीतून आम्ही जंजिरा किल्ल्यावर निघालो. समुद्रात छोटासा दिसणारा हा किल्ला आम्ही जस जसे जवळ जावू लागलो तसे भव्य वाटू लागला किल्ल्याचा दरवाजा जोपर्यंत आम्ही जवळ गेलो नाही तोपर्यंत आम्हाला दिसलाच नाही .लांबहून रोखल्या गेलेल्या तोफा आमच्याकडे संशयाने पाहत आहेत कि काय असे वाटत होते

आम्ही ज्या शिडाच्या बोटीने जात होतो त्या बोटीत शाळेची मुलेही सहलीला आली होती त्यांचे शिक्षक त्यांना जेव्हा सांगत होते कि हा किल्ला शिवाजी महाराज्यांनी बांधला तेव्हा मी त्यावर आक्षेप घेतला मी म्हणालो " सर तुम्ही  मुलांना चुकीची माहिती देत आहात. हा किल्ला शिवाजी महाराज्यांनी बांधला नसून या किल्ल्यावर शिवाजी महाराज्यांचे पाय हि लागले नाहीत इतर कोणी बोलला असता तर ठीक आहे पण तुम्ही शिक्षक असून तुमचे इतिहास एवढे कच्चे असेल असे वाटले नव्हते " त्यावर ते शिक्षक महाशय म्हणाले " मी इतिहासाचा शिक्षक नसून गणिताचा शिक्षक आहे" त्याच्या या वाक्यावर बोटीतील सारी मुले हसू लागली.

आम्ही किल्ल्यात प्रवेश केला. अजस्र प्रवेशद्वार आणि त्यावर सिद्धीची कोरलेली राजमुद्रा आत प्रवेश करताच एक दर्गा लागला इथेच आंम्हाला एक मुस्लीम गाईड मिळाला. सर्वात प्रथम त्याने आंम्हाला ज्या तोफेच्या जोरावर सिद्दी जोहर निर्धास्त किल्ल्यात राहत होता ती तोफ ' कलाल बांगडी ' दाखवली. पंच धातूपासून बनलेली हि तोफ ६ किलोमीटर पर्यंत मारा करू शकत होतीतिच्या जोडीला असणारी सुंदर गायमुख तोफ. किल्ल्याचे बुरुज सुंदर दिसत होते त्यानंतर किल्ल्यातील भुयारी मार्ग, किल्ल्याच्या मध्यभागी असणारे सुंदर तलाव, राजदरबार आणि किल्ल्यावरच्या बालेकिल्ल्यातून दिसणारे सुंदर दृश्य पाहून आम्ही परतीच्या वाटेला लागलो वाटेत मी गाईड ला जंजिरा जिंकण्यासाठी संभाजी महाराज्यांनी ज्या खाडीत भाराव टाकून बुजवण्याचा प्रयत्न केला होता ती खाडी दाखवण्यास सांगितली तर तो म्हणाला " हि अफवा आहे , संभाजी राज्यांनी अशी कोणताच पूल बांधला नव्हता "साधारण दुपारी २ वाजता आम्ही एका हॉटेलात जेवून पुंन्हा मुंबईच्या वाटेला लागलो.

No comments:

Post a Comment