Wednesday, 16 November 2011

आम्ही सुटलो तेही जिंकूनच!

आम्ही सुटलो तेही जिंकूनच!

आज मी पंडित नथुराम गोडसे बलिदान मास साठी मी संध्याकाळी ४ वाजता बोरीवालीतून ठाण्याला निघालो. संध्याकाळी ६ ते ८ असा कार्यक्रम होता. काही तांत्रिक समस्याला तों देत मी साधारण ५:४५ ला मी ठाण्याच्या सहयोग गल्लीमध्ये पोहचलो पण गल्लीच्या कोपऱ्यावर पोलिसांची गाडी होती मला ठाण्याचा भाग नवीन असल्याने त्या गाडी जवळ उभ्या असलेल्या हवालदाराला मी सहयोग हॉल कुठे आहे असे विचारले तर त्या हवालदाराने मला कार्यक्रमाला आला आहेस का? असे विचारले मी हो सांगताच तो हवालदार म्हणाला "कार्यक्रम रद्द झाला आहे तू परत घरी जा असे सांगितले मला थोडी निराशाच झाली मी माझा मित्र आणि हिंदू महा सभेचा कार्यवाह स्वप्नील जागुस्ठे याला फोन केला तर त्याने मला हॉल वर येण्यास सांगितले आणि कार्यक्रम रद्द न झाल्याचे सांगितले मी हॉल वर गेलो हिंदू महासभेने उत्कृठ रीतीने आयोजन केले होते इतक्यात माझे मित्र कुमार आणि सुनील भूमकर हि पोचले आम्ही खुर्च्यांवर बसलोच होतो साधारण ६ वाजून ५ मिनिटे झाली अचानक मागून काही पत्रकार आणि पोलीस हॉल मध्ये घुसले त्यांनी आयोजकांना अटक करण्याचा प्रयत्न कोणत्या कारणासाठी अटक करत आहात असा सवाल कार्यक्रमाला आलेल्या लोकांनी आणि आयोजकांनी केला तर पोलिसांनी पोलीस टेशन ला सांगतो असे सांगितले अचानक गलका वाढला 'वंदे मातरम,नथुराम गोडसे अमर रहे, हिंदू राष्ट्र बनके रहेगा|' अश्या घोषणा लोक देवू लागले पोलिसांनी आयोजकांना अटक करून घेवून गेले मी, सुनील भूमकर ,आणि कुमार अजूनही हॉल वर होतो. आम्ही स्टेज वरचे भगवे झेंडे काढले व हॉल च्या बाहेर पडू लागलो इतक्यात पत्रकारांनी आम्हाला घेरले आणि ओन कॅमेरा बोलू शकता का म्हणून विचारले आम्ही आमचे मत मांडले आणि पोलिसांनी आम्हाला गाडीत कोंबले आम्ही भगवा ध्वज घेवून हसत हसत गाडीत चढलो.पोलीस टेशन ला ३ तासानंतर पोलिसांनी आम्हाला सोडले सर्व मिळून आम्ही १२ जन होतो. आम्ही नथुराम गोडसेंच्या मृत्यू पत्राचे वाचन पोलीस टेशन च्या बाहेरच केले आमचा लढा आम्ही हरूनही जिंकलाच होता!

2 comments:

  1. आम्ही जिंकलो तेही सुटू नच।

    असा (अ)वि४ केला की नक्की सत्य काय ते आकळेल...

    ReplyDelete
  2. तुमच्या यशाबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन...!!!
    मलासुद्धा बोलावले होते त्या कार्यक्रमाला माझ्या एक मित्राने, पण मी नाही येउ शकलो. पण अंधेरीत अजून एक कार्यक्रम आहे असं ऐकण्यात आला आहे माझ्या रविवारी २० तारखेला.. तिथे जाण्याचा प्रयत्न करेन मी...

    ReplyDelete