Monday 5 September 2011

मी असा कसा

मला चांगले आठवते आहे गावात १० थी पर्यंत मराठी शाळा होती. महा विद्यालय आमच्या गावात नवते.निरोप समारंभाचा दिवस होता. शाळेच्या मुखायाद्यापाकानी  सर्वाना वर्गात बसवले आणि विचारले "मुलानो ,या पुढे  तुम्ही काय करायचे ठरवले आहे ?" वर्गात हा प्रश्न त्यांनी सगळ्यांना विचारला प्रत्येक जन आपल्या आपल्या परीने उत्तर देत होता.कोणी सांगत होता मी डॉक्टर होणार,कोणी सांगत होता मी इंजिनिअर होणार माझी पाळी आली मला मी सांगितले "सर् ,मी क्रांती कारक होणार"
अर्थात माझ्या या उत्तराने शाळेतील साऱ्या मुलांनी हसायला सुरवात केली .त्यातील एका वर्ग मैत्रिणीने मला विचारले "कसली क्रांती करणार आहेस? हा देश कधीच स्वतंत्र झाला आहे."तिच्या या प्रश्नाने वर्गातील पुन्हा एकदा हास्य्कालोल झाला.मी मुख्याद्यापाकांकडे पहिले ते गंभीर होते.
त्यांनी मला विचारले तुला काय म्हणायचे आहे व्यवस्थित सांगू शकतो का?
"सर् ,माफ करा पण आपल्या शाळेतील पाठ्य पुस्तकातला इतिहास अतिशायाक्ती केलेला आहे,मी शाळेच्या ग्रंथालयातील काही पुस्तके वाचली आहेत.आणि माझे वयक्तिक मत आहे आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य खरे स्वतान्त्या नाही आहे. हा स्वतान्त्या म्हणजे आपली शुद्ध फसवणूक आहे. "मी म्हणालो.
"पण क्रांतिकारक बनून तुझे पोट भरणार आहे का,तुझे भविष्य सुधारणार आहे ?सर्.
"नक्कीच नाही.पण माझ्या मुले नक्कीच दुसऱ्यांचे पोट भरेल.नक्कीच गरीब लोकांचे भविष्य सुधारेल मग जर देशातील लोकांचे भविष्य माझ्यामुळे जर बनणार असेल तर माझे आयुष्य बिघडले तर मला आनंदच होईल ."मी ठाम पाने म्हणालो.
सरांनी मला जवळ बोलावले आणि छातीशी कवटाळले आणि आपला पेन मला भेट दिला
"क्रांती कर पण बंदूक उचलून नको. या पेनाने कर.जगातील सर्वात घातक शस्त्र मी तुला देत आहे हे शस्त्र एवढे प्रभावी आहे कि याचा वेग बंदुकीच्या गोलीपेक्षा जास्त आहे.आणि याच्या योग्य वापराने खूप मोठी क्रांती होवू शकते. मला अभिमान आहे असा विद्याथी माझ्या शाळेत होता." सरांनी असे म्हणतात साऱ्या वर्गात टाळ्यांचा कड-कडाट झाला.ज्या मुलीने मला हा प्रश्न विचारला त्या मुलीने माझी माफी मागितली आणि हो काही काल ती मुलगी माझ्या आयुष्यात आली प्रेयसी बनून पण पहिला प्रेम कधीच यशस्वी होत नाही.ज्याचे होते तो खरा भाग्यवान! जावू दे हा सांगण्याचा विषय नाही आहे.
हि गोष्ठ सांगून मी माझा मोठेपणा सांगायचा अजिबात उद्देश नाही आहे.उद्देश एवदाच आहे माझ्या आयुष्यात नं जाणो का ज्या देशात ज्या हिंदू धर्मात ,आपण जन्म घेतला आहे त्या मातीसाठी आपल्याला जीव द्यायला लागला तरी हरकत नाही असे होते आणि शेवट पर्यन हाच उद्देश राहील.








No comments:

Post a Comment