Sunday 8 January 2012

राजकारणाचा बळी 'सेनापती संताजी'



               'काका विधाते' यांची संताजी हि कादंबरी माझ्या नुकतीच वाचनात आली. कादंबरीची सुरवातीपासूनच मला एक प्रश्न सतावत होता संताजी आणि धानजी या दोघांचा पराक्रम तोडीचा पण काका विधाते यांनी फक्त संताजीनवरच कादंबरी का लिहिली ? त्याचे उत्तर मला कादंबरीच्या शेवटी मिळाले. धनाजीच्या पराक्रमाला तोड नाही त्यात ते संताजीनजे खास मित्र ! लोक म्हणतात राजाराम महाराज्यांच्या काळात अनेक खडे वीरांना आपले पराक्रम दाखवण्याची संधी मिळाली. पण संताजी नसते तर कदाचित औरंगजेबाने राजाराम महाराज्यानाही पकडून बाटवले असते नाहीतर मारले असते. जरी संताजी आणि धनाजी यांच्या पराक्रमाला तोड नव्हती तरी यामध्ये संताजीच शेवटपर्यंत श्रेष्ठ होते. धनाजी सेनापती पदाच्या हव्यासासाठी गद्दार झाले. धनाजी फक्त आणि फक्त गद्दार होता. एवढेच मी म्हणेन याच्यामुळे संताजीसारखा मोहरा निखळला.
           शंभू महाराज्याना मुबरक खानाने संगमेश्वरात पकडले. संताजीचे वडील म्हळोजी म्हळोजी यात कमी आले शंभू राजे लढत नदीच्या पळत होते. संताजी त्यांच्यासोबत होते. राजे घोड्यावरून खाली पडले. संताजीनी त्यांना आधार दिला राजे म्हणाले "संताजी आता आम्ही नाही वाचत तुम्ही आपले जीव वाचवून रायगड कडे निघा ! तुंम्हाला जगायचे आहे आणि शेवटपर्यंत औरंगजेबाला धुळीस मिळवायचे आहे." राजआज्ञा घेवून संताजी आणि बहिर्जी निसटले. आपल्या राज्याने आपला जीव वाचवून स्वत्ताचा जीव धोक्यात घातला.याच्या ऋणी ते शेवटपर्यंत राहिले. शंभू राज्यांची हत्या झाली आणि त्याच्या मनातील ठीणगीने वणव्याचे रूप घेतले. आणि गनिमीकावा म्हणजे काय हे त्यांनी मोघलांना दाखऊन दिले. संभाजी राज्यांना पकडून देण्यात गणोजी शिर्के होता पण औरंगजेबाला आतून मंत्री मंडळ हि पत्रव्यवहार करून संभाजी महाराज्याना पकडण्यासाठी मदत करत होते. प्रल्हाद निराजी सारखा नालायक माणूस त्यात सामील होता. 
             संताजीनी शांत डोक्याने खेळी केली कोणतीही लढाई करण्याअगोदर ते त्या ठिकाणचा प्रदेशाची खडान खडा माहिती मिळवत शत्रूशी कोणत्या ठिकाणी लढाई योग्य होईल याची माहिती मिळवत. आपले सैन्याची विभागणी ते चार भागात करत लढाईच्या जागी ते अगोदरच आपल्या सैन्याचे ३ तुकड्या आजू बाजूच्या जंगलात लपवून ठेवत. आणि एक छोटी तुकडी घेवून ते शत्रूवर चालून जात. सत्रुशी छोटी मोठी लढाई करून ते जंगलाकडे पळत मोघल त्यांचा पाठलाग करत मग योग्य ठिकाणी आल्यावर ते मागे फिरून परत लढाई करत आणि बाकीच्या ३ तुकड्या मागून आणि ३ बाजूनी  हमला करत शत्रू चारही बाजूने घेरला जाई मग आपो आप कापला जाई.ते कधीच हरले नाहीत. हरले फक्त गडावरील राजकारामुळे            संताजी संभाजी महाराजांसारखे सरळ आणि लष्करी शिस्तीतले त्यांनी मंत्राच्या दरबारातील ब्राष्टचाराविरोधात भर दरबारात मोहीम उघडली. जी चूक संभाजी महाराज्यानी केली ती चूक आता संताजीनी केली. आणि त्याचा फळ त्यांना त्यांचा खुनाने मिळाला.प्रल्हाद निराजीनी राजाराम महाराज्यांचे कान भरून त्यांना सेनापदी पदावरून काढून टाकले.सेनापद धनजी जाधवांना देण्यात आला त्याचा त्यांना दुक्ख अजिबात झाले नाही. पण स्वात्ताचे रक्त आटवून एक एक जमा केलेला मावळा, सरदार त्यांनी धनाजी जाधवांना देण्यास नकार दिला. त्यामुळे धनाजी संतापले त्यात त्यांना दरबारी लोकांची साथ ! धनाजी जाधव आणि शाहू महाराज संताजीना मारायला मोठी फौज घेवून आले पण संताजीनी त्या फौजेचा धुव्वा उडवला. धनाजी पळून गेला राजाराम महाराज कैद झाले.पण संताजी स्वत्त आपले हात रुमालात बांधून त्याच्यापुढे हजार झाले म्हणाले आपण माझे कैदी नाही आहात मी तुमचा कैदी आहे तुम्ही जी मला शिक्षा द्याल ती मान्य आहे मला पण या भोळ्या गड्याला राजाराम महाराज कधीच समजू शकले नाहीत. राजाराम महाराज्याना डावलून संताजी आणि त्याच्या परिवाराने संभाजी राज्यांना गादिवर बसवले याची सल त्यांना शेवटपर्यत होती. दरबारातील मंत्री त्याला रोज खतपाणी घालतच होते. आता मराठे आणि मोघल दोघेही संताजीच्या मागे लागले त्यात धनाजीने त्याच्या सरदारांना फितवून आपल्यात सामील केले निम्म्याहून जास्त लोक धनाजीच्या फौजेत गेली. जे औरंगजेबाला १४ वर्षात जमले नाही ते धनाजी ने १४ दिवसात केले. ज्या मराठी वाघाचे नाव घेताच मोघलांची घोडी बिचाकायाची तो वाघ शंभू महादेवाच्या डोंगरात रानोमाळ फिरत होता. धनाजीच्या फौजा त्याच्या मागावर होत्या संताजी मिळेल तेथे पकडा 'जिंदा या मुरदा ' आता संताजी एकटे होते. सोबतीला मानसपुत्र नरो महादेव होता. एका गरीब ब्राह्मणाचा पोर पण आपल्या आईवर आणि आपल्यावर केलेला उपकार तो विसरला नवता. संताजीनी खूप वेळा त्याला आपल्याला सोडून जा म्हणून सांगितले पण ऐकेल तो नरो महादेव कसला? शेवटपर्यंत त्याने संताजींची साथ सोडली नाही.
             नागोजी माने आपल्यापैकी हि व्यक्ती किती लोकांना माहित असेल हे मला माहित नाही पण हा कुरवांटा स्वराज्यात होता.याने शंभू महाराजांना औरंग्याला पकडून देण्यासाठी गानोजीला मदत केली 'मी संताजीला पकडून देतो म्हणून यानेच बादशाह कडे साकडे घातले. त्याबदल्यात फार मोठी वतनदारी मागितली. बदशाने मान्य केली आणि याच नालायाकाने संताजीचा खून केला इतकेच नव्हे त्यांचा शीर कापून बादशहाला दिला.एक सच्चा धारकरी संपला होता. शिवाजी महाराज्यांच्या काळात म्हलाजी सारख्या खांद्या सरदाराचा पुत्र असूनही लष्करात त्याची सुरवात एक साधा शिपाई म्हणून केली हंबीर रावांनी त्याचे कौशल्य ओळखून म्हलाजीकडून त्याला आपल्या पदरी घेतले.आणि मग हा संताजी आपले शौर्य आणि बुद्धीमत्तेच्या जोरावर सेनापती झाला. संभाजी महाराज्यानी त्याचे गुणवत्ता ओळखून आपल्या प्राणापेक्षा संताजीचे प्राण वाचवले आणि शेवटपर्यंत गानिमांशी लढा असे सांगितले. त्यांना दिलेला शब्द संताजीने शेवटपर्यंत पळला. राजाराम महाराज तर मंत्री मंडळाच्या हाताचे बाहुले होते त्यांना शिवाजी महाराज्यांची सर् कशी येणार बाई आणि बाटली त्याच्या पाचवीला पुजलेली!संताजी आपआपसातील वादामुळे कंटाळले होते कित्तेक जणांनी त्यांना मोघलांना जाऊन मिला म्हणून सांगितले. पण स्वराज्याचा हा सच्चा हिरा शेवटपर्यंत स्वराज्याशी इमानी राहिला. पण या हिऱ्याची पारख करायला शिवाजी महाराजांसारखा रत्न पारखी मिळाला नाही. आप आपसातील कालह हा मराठ्यांना लागलेला शाप! आणि या शापात स्वराज्याचा एक निस्वार्थी धारकरी बळी पडला. 

वाहे 'धो धो' प्रतीसारील त्याला कोण?
शिशिराचा वारा 'सो सो' रोधील तयाला कोण 
?होता तो गंगथाडीला ,आला तो भीमथाडीला
एकाच दिवसात उडाला ,
करी दैना परसेनेची, घोदादुड संताजीची!

No comments:

Post a Comment