Thursday 5 January 2012

आम्ही धारकरी

जीवितही तृण मानावे, जननी जनक यांच्यासाठी
तळहातावर शीर घ्यावे,आपुल्या जन्मभूमीसाठी
काळासह झुंज करावी, प्राणप्रिय धर्मासाठी |
             शिवाजी महाराज्यांच्या मृत्युनंतर मराठेशाही बुडवण्यासाठी औरंग्या महाराष्ट्रात आला. संभाजी राज्यांना फसवून त्याने त्या शंभू बाळाला हाल हाल करून मारले. त्याला वाटले मराठे आता घाबरतील त्याच्यावर आपला वचक बसेल. पण झाले वेगळेच मराठे शंभू राज्याच्या मृत्यूचा बदला घेण्याचे ठरवले.संताजी आणि धनाजी नावाचे दोन खंदे वीर उदयाला आले. रायगडावर अंतर्गत वाद निर्माण झाले. शाम्भाजी राज्याच्या मृत्यूचा सर्वाधिक आनंद कोणाला झाला असेल तर अष्ट प्रधान मंडळाला. कारण आता त्यांना बाल राजारामला गादिवर बसवून आपल्या मनासारखा राज्यकारभार चालवायला मिळणार होता. त्यांनी यशु बाईंचे अधिपत्य झुगारले कट कारवायात सर्वात पुढे होते ते न्यायाधीस प्रल्हादपंत आणि निळोपंत. नाईलाजाने यशू बाईनी राजाराम ना गादिवर बसवले.आणि मराठ्यांनी मोगली फौजेची लांगेतोड सुरु केली मराठे संताजी आणि धनाजीच्या नेतृवाखाली हल्ला करायचे गनीम सवड होण्यापूर्वी जेवढे कापता येईल तेवढे कापायचे .गनीम सवड झाला कि पळून जायचे. संताजी आणि धनाजी याच्या नेतृत्वाखाली झालेल्या ९०% लढाया या रात्री केलेल्या असायच्या त्यामुळे मोगली फौजांना रात्रभर झोप नसायची.             
             स्वराज्याला संताजी आणि धनाजीच्या नावाने नवीन आशेचा किरण मिळाला होता. पण गडावरचे राजकारण वेगळे होते. गडावर प्रधान मंडळातील प्रत्तेक अधिकारी आपली झोळी अधिकाधिक कशी भरेल याचाच विचार करत होता. संताजीने बामणी कावा कधीच ओळखला ! राजाराम महाराज प्रल्ल्हाद्जी पंतांच्या हाताचे बाहुले बनले होते. मनातून संताजी खूप तुटला होता. पण शिवाजी महाराज्यानी शून्यातून उभे केलेले स्वराज्य मुघालाच्या घशात जावू नये म्हणून तो अहोरात्र लढाई आणि छापे मारत होता. धनाजीची साथ होतीच. अंतर्गत कलहाने स्वराज्याची वीट अन वीट हलली होती. फितुरीला पेव फुटले होते. तरीही धीर खचेल ते संताजी आणि धानजी कसले ? गनिमी कावा तर शिवाजी महाराज्याकडून त्यांना वारसा हक्काने मिळालेला त्यात त्यांनी असे प्रभुत्व मिळवले कि बादशहा च्या तंबूचे कळस कापून आपण त्यात किती निपुण आहोत हे दाखऊन दिले. त्यांनी गडावरील राजकारणाकडे दुर्लक्ष केले वेळ आल्यावर सारे व्यवस्तीत होईल असा त्यांना ठाम विश्वास !आणि काही काळाने तसे झालेही. एक काल असा आला कि मंत्रिमंडळातील काही लोकांनी संताजीना सेनापदी पद देण्याचे आमिष दाखवून आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्नही केले पण संताजीनी ते साफ नाकारले नंतर राजाराम महाराज्यानी त्यांना ते दिलेच हि वेगळी गोष्ठ पण मित्रानो अंतर्गत कलाह झाले तरी संताजी आणि धानजी त्याला कधीही बळी पडले नाहीत
             आज आपल्यात मराठा आणि ब्राह्मण वादाचे हि असेच आहेत आपल्यात काही अंतर्गत कलाह आहेत पण त्या राजकारणाला बळी पडून आपण आपले सर्वनाश करू नका. वेळ आल्यावर वाद मिटतील जसे त्या काळी मंत्रिमंडळ अंतर्गत कलाहला जीमेद्दार होता तसे आज आपल्यात काही राजकारणी करत आहेत प्रल्ळाद्पंत आपल्यात राजकारण्यांच्या रुपाने आज हि भांडण लावून स्वत्ताची झोळी भरण्याचे काम करत आहेत. त्यांना आपण त्यांची जागा वेळ आल्यावर नक्की दाखवून देवू पण तत्पूर्वी या वादाला आपण सामोपचाराने एकमेकांना समजावून घेवून सोडवूया. आपण फक्त आणि फक्त स्वराज्याचे धारकरी आहोत फक्त स्वराज्याचे धारकरी !           

No comments:

Post a Comment