Tuesday 2 December 2014

शिक्षा

मित्रानो परवा हरियानातील बस मधील दोन मुलींची बहादुरी साऱ्या देशाने पाहिली त्यावरून एक गोष्ट आठवली.

          एका घनदाट जंगलातून माणसांनी भरलेले लग्नाचे वराड निघालेले होते. अचानक त्यांची बस अडवण्यात येते.  तीन डाकू  बस मध्ये चढतात. बस मधील लोकांच्यात दहशत बसावी म्हणून चढल्या-चढल्या बसच्या ड्रायव्हरचा लोखंडी सळी  डोक्यात मरून खून करण्यात येतो. सारा लग्नाचा वराड लुटून ते निघून जावू लागतात. एवढ्यात त्यांच्या मधील एका म्होरक्याचे लक्ष खिडकीच्या बाजूला बसलेल्या सुंदर तरुणीवर जातो.

         तिघंही पुंन्हा बस मध्ये चढतात. तिला ओढत-खेचत बसच्या खाली उतरवता. ती मुलगी बसमधील लोकांना विनवण्या करते पण माणसांनी खचा-खच भरलेल्या लोकांमधील कोणीही तिच्या मदतीला येत नाही.
बस मधील एक तरुण बस मधील लोकांना विनवतो त्यांना सांगतो "ते फक्त तिघे आहेत आणि आपण ४०लोक आपण त्यांना सहज हरवू शकतो" पण तरीही कोणी त्याच्यासोबत मदतीला येत नाही. शेवटी नाईलाजाने तो तरुण त्या तिघांशी एकटाच लढायचे ठरवतो. आणि बसबाहेर पडतो पण त्या तिघांच्या पुढे त्याचा निभाव लागत नाही त्याच्या डोक्यावरच्या एका गंभीर आघाताने तोही तिथेच बेशुद्ध पडतो.

रस्त्याच्या त्या बाजूच्या झाडामागेच त्या मुलीचा बलात्कार होत असतो आणि बसमधील लोक लाचार होऊन तमाशा बघत असतात. काही वेळेतच त्या तीन नराधमांची भूक मिटते. ते निघून जातात. आपले फाटलेले कपडे आणि अर्ध नग्न अवस्थेत ती तरुणी पुंन्हा बसकडे वळते. एवढ्यात बेशुद्ध झालेला तो तरुणही शुद्धीवर येतो. बसमध्ये सारे तिच्याकडे सहानभूतीने पाहत असतात तर काही निर्लज्ज तिच्या शरीराकडे पाहून नयनसुख घेत असतात. 

बसचा ड्रायव्हर मेल्याने बस पुढे कशी न्यावी हा साऱ्या लोकांपुढे पेच पडतो. कारण त्यातील एकालाही बस चालवता येत नसते. ती मुलगी उठते. बसच्या ड्रायव्हर सीटवर बसते. एव्हाना तो मुलगाही बसमध्ये चढू लागतो ती पुन्हा बसमधून दरवाज्या जवळ येते. त्याला बसच्या बाहेर ढकलते. बसचा दरवाजा आतून लॉक करते. सारे वराडी हैराण होतात. ती काय करत आहे हे कोणालाच समजत नाही. ती बसचा स्टार्टर लावून बस चालू करते पुढे उतार असतो बस भरधाव वेगाने पळवते आणि अचानक नुटल करून दरवाजा उघडते आणि बसच्या बाहेर उडी मारते. बस खोल दरीत कोसळते. 

मित्रानो हि गोष्ट आहे. अचानक रात्री सुचली. देशात एका त्रीच्या अब्रू वाचवू न शकलेले नामर्द नसलेलेच परवडले असे माझे स्पष्ट मत आहे.तुम्हाला काय वाटते जरूर कळवा

No comments:

Post a Comment