Monday, 12 September 2016

दादुकाका


"कोण आहे हा दादूकाका, आणि तो त्या मुलाची बाजू का घेतोय?"
"आई खूप चांगला आहे ग तो, तू भेट ना एकदा त्याला तो समजावले सगळे आणि त्यानंतर तू म्हणशील तेच होईल." पूर्वा आपल्या भात्यातील शेवटचा बाण मारत म्हणाली.
"अजून विचार कर, मग मी म्हणेन तसेच करावं लागेल. आहे मान्य?"रमा.
"हो" पूर्वा.
"बर कुठे रहातो हा तुझा दादुकाका?" रमा.
"कॉलेजच्या बाहेर चहाची टपरी आहे ना त्याच्या समोर एक बसायला बेंच आहे तिथे." पूर्वा.
"अग घर कुठे आहे त्याच?" रमा.
"घर नाही आहे त्याच" पूर्वा.
"तू मला एका भिकार्याला भेटायला सांगते आहेस." रमा.
"आई पैसे नसतील त्याच्याकडे पण मानानं खूप श्रीमंत आहे ग."
"आता तू हट्टच धरला आहेस तर भेटते त्याला पण त्यानंतर त्या अमितचा नाद सोडायचा आणि मी सांगते त्या मुलाशी लग्न करायचे आहे मान्य?" रमा.
"हो" पूर्वा.
रात्र कधी संपते आहे असं पूर्वाला झालं होतं. ती बेड वर बसून अमित सोबत आपल्या जीवनाचे स्वप्न रंगवत होती. अमित तिच्याच कॉलेजमध्ये शिकायला होता. गेली चार वर्षे तो तिच्यावर प्रेम करत होता. हा शेवटच्या वर्षातला शेवटचा वेलेन्टाइन डे या वेळी प्रपोज नाही केलं तर कधीच नाही करता येणार हे त्याला ददुकाका 15 दिवस समजावत होता. खूप सारी मनाची तयारी करून त्याने प्रपोज केलं आणि पूर्वाने ऍक्सेप्ट हि केल.
अर्थात लाजाऱ्या अमितचे प्रपोज करायचे धाडस होत नव्हते पण चहाच्या कठड्यावरवर बसणाऱ्या दादू काकाने त्याला बळ दिले. त्याने त्याला मोटिवेट केलं.
हा दादू काका म्हणजे अजब रसायन. कोण,कुठला आणि कुठून आला हे कोणालाही माहित नाही. गेली कित्येक वर्षे तो या कठड्यावर बसतो. हा कठडा त्याचा घर.चहावाला त्याला रोज फुकट चहा पाजत असे. पण हा कॉलेज मध्ये फक्त प्रेम करायला जाणाऱ्या पोरांच्यामध्ये हा लव्ह गुरु म्हणून फेमस. याने सांगितलं की ती पोरगी तुला पटणार म्हणजे पटणार!
सकाळ झाली पूर्वा रमा ला घेऊन दादुकाकाका कडे आली दादुकाका नेहमीप्रमाणे पाठमोरा बसून चहा पीत होता.
"दादूकाका" पूर्वाने आवाज दिला आणि दादुकाका मागे वळला आणि अचानक स्तब्ध झाला तीच गत रमाची होती.
"सुहास" रमाच्या  तोंडातून अस्पस्ट आवाज निघाला. एवढ्यात पूर्वाच्या मैत्रिणीने पूर्वाला आवाज दिला.
"आई एक मिनिट आले मी" असं म्हणून पूर्वा निघून गेली.
"मला माहित होत एक दिवस तू येशील." दादुकाका.
"तू इथं कसा?" रमा.
"गेली 21 वर्ष या कॉलेजच्या कठड्यावर तुझी वाट पाहात बसलो आहे." दादुकाका.
"वेडा आहेस का?" रमा.
"एकदा मरण्याचा विचार केला होता पण मग आठवलं आत्महत्या करायची नाही असा तुला वचन दिला होता. तसाही तुझ्या प्रेमात झुरून झुरून मरायचं आहे." दादू.
"तू किती मोठी चूक करून बसला आहेस माहित आहे तुला?" रमा.
"मी चूक केली की नाही माहित नाही पण तू मात्र पुन्हा एकदा फार मोठी चूक करते आहेस." दादू.
"कोणती चूक." रमा.
"रमा पूर्वा मोठी झाली आहे तिला अमित शी लग्न करू दे. मी ओळखतो त्याला खूप चांगला मुलगा आहे . गेली चार वर्षे तिच्यावर प्रेम करतो आहे. त्याच लग्न पूर्वाशी नाही झालं ना तर अजून एक दादू काका या कठड्यावर तयार होईल ग." दादू.
एवढ्यात पूर्वा अमितला घेऊन आली.
"आई हा अमित." पूर्वा असे म्हणताच अमित तिच्या पाया पडतो.
"उद्या आई बाबाना घेऊन घरी ये." अमितची ख़ुशी गगनात मावत नव्हती दादूकाकांच्या डोळ्यात पाणी आलं आणि नेहमीप्रमाणे चाहवाल्याचा बारका पोर छोटू कोणीही न सांगता चार चहा घेऊन आला.
©प्रशांत शिगवण.

No comments:

Post a Comment